agriculture news in Marathi pest attack on onion crop Maharashtra | Agrowon

नाशिकमध्ये खरीप कांदा लागवडी बुरशीजन्य रोगांच्या विळख्यात 

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 24 सप्टेंबर 2020

खरीप हंगामातील पोळ कांदा लागवडी पूर्ण झाल्या असून लेट खरीप कांदा लागवडी सुरू आहेत. मात्र या लागवडीवर कोलेटोट्रीकम बुरशीमुळे मर रोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे.

नाशिक: खरीप हंगामातील पोळ कांदा लागवडी पूर्ण झाल्या असून लेट खरीप कांदा लागवडी सुरू आहेत. मात्र या लागवडीवर कोलेटोट्रीकम बुरशीमुळे मर रोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे यासह नगर, पुणे या भागातही होणाऱ्या लागवडी बुरशीजन्य रोगांच्या विळख्यात सापडल्या आहेत. 

सततचा पाऊस असल्याने जमिनीत अधिक जास्त ओलावा, वाफ्यांमध्ये पाणी साचून न होणारा निचरा, अधिक तापमानामुळे मर रोगाचा प्रादुर्भाव कांदा पट्टयात वाढत असल्याची स्थिती आहे. रोपांची मर होऊन लागवडी विरळ होण्यासह रोपे पीळदार होऊन आकुंचन पावत आहेत. अगोदरच अधिकचा उत्पादन खर्च झाल्याने शेतकरी वाढत्या रोगांच्या प्रादुर्भावामुळे हवालदिल झाले आहेत. 

नवीन कांदा लागवडीतील रोपे पीळदार होण्याची समस्या सध्या वाढली आहे. त्यामुळे आगामी लागवडीसह उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जमिनीतील अधिक ओलाव्यामुळे मुळांची कार्यक्षमता कमी होऊन रोपे बाधित होऊन मर रोगाचा प्रादुर्भाव वाढता आहे. 

सुरुवातीला कांद्याची पुनर्लागवड झाल्यानंतर रोपांवर डाग पडत असून हे डाग पूर्ण पानांवर पसरून डागांच्या मध्यभागी काळे, दाणेदार ठिपके चक्राकार आकारात पडत असल्याची स्थिती आहे. त्यामुळे रोपांची रोगग्रस्त पात आकुंचन पावल्यासारखी दिसते आहे. हा प्रकार  सर्वत्र दिसून येत आहे. रोपांची मर होत असल्याने कांदा पिकाचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. काही वर्षात हे प्रमाण कमी होते. मात्र चालू वर्षी प्रादुर्भाव अधिक आहे. त्यामुळे पिकांवर बुरशीनाशकांची फवारणी करणे, जैविक खतांचा वापर वाढविणे, जमिनीचे आरोग्य सुधारून मुळांची कार्यक्षमता वाढविणे महत्त्वाचे असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. 

ही आहेत लक्षणे 

  • रोपे लांबत आहेत. 
  • मातीवर रोपे लोळत आहेत. 
  • रोपे ओढल्या सारखी होत असून कमजोर झाली आहेत. 
  • पाने वाकडी होऊन पीळदार झाली आहेत. 

रोगांच्या प्रादुर्भावाबाबत दुजोरा 
सध्या नाशिक, धुळे, पुणे, नगर, सोलापूर  जिल्ह्यात खरीप कांदा लागवडीमध्ये बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे. कांदा व लसूण संचालनालयातील तज्ज्ञांनी रोगाच्या प्रादुर्भावाबद्दल दुजोरा दिल्याचे राष्ट्रीय फलोत्पादन संशोधन व विकास प्रतिष्ठानचे माजी अतिरिक्त संचालक डॉ. सतीश भोंडे यांनी सांगितले. 

प्रतिक्रिया
कांदा पिकांमध्ये मर रोगाची समस्या असतानाच सूत्रकृमी, गोगलगाय, हुमणी व कोलेटोट्रीकम बुरशी प्रादुर्भावामुळे कांदा उत्पादक हैराण झाला आहे. या विषयी शेतकऱ्यांचे प्रबोधन करणे व तातडीने मार्गदर्शन होणे गरजेचे आहे. अन्यथा हंगाम मोठ्या अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. 
- डॉ.सतीश भोंडे, माजी अतिरिक्त संचालक, राष्ट्रीय फलोत्पादन संशोधन व विकास संस्था  
 


इतर अॅग्रो विशेष
पिंपळगावला आडत्याकडून शेतकऱ्याला मारहाण नाशिक: निफाड तालुक्यातील कारसूळ येथील शेतकरी...
अवजारे अनुदानाचे निकष वाढवलेपुणे : राज्यात कृषी अवजारे अनुदानासाठी...
तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता पुणे ः कोकण व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलका...
बदल्या, मारहाण, लाचखोरीने गाजतेय राहुरी...पुणे: महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या आवारात...
मॉन्सूनच्या माघारीस पोषक वातावरण पुणे : मॉन्सून दोन दिवसांत उत्तर महाराष्ट्र व...
काही ठिकाणी जोरदार सरीपुणे ः राज्यातील काही भागांत पावसाचा जोर कमी झाला...
व्यापाऱ्यांवरील कांदा साठा...पुणे/नाशिक: पुरवठा कमी असल्याने देशभरात कांद्याची...
पावसानं पांढऱ्या सोन्याची झाली माती !औरंगाबाद: यंदा पाऊस चांगला सांगितल्याने शेतीच्या...
चौथ्या बैठकीतही ऊसतोडणी दरवाढीवर तोडगा...नगर ः ऊसतोडणी मजुरांच्या तोडणी दरात वाढ करावी...
बिस्कीट निर्मितीतून महिलांनी घेतली...सांगली जिल्ह्यातील नवेखेड (ता.वाळवा) येथील...
शेतीला मिळाली प्रक्रिया उद्योगाची जोडखोपी (ता.भोर,जि.पुणे) येथील अंजना नारायण जगताप...
राज्यात पाऊस कमी होणारसोमवारपासून ढगाळ हवामानासह पावसाची उघडीप राहणार...
कृषी सुपर मार्केट ः संकल्पना आणि संधीजागतिकीकरणाच्या पार्श्‍वभूमीवर शेती हा एक आर्थिक...
बदल हवेत दिलासादायकहवामान आधारीत फळपीक विमा योजनेत केळी पिकासाठी...
नैसर्गिक आपत्तीत पीकच नाई, तर बापही...यवतमाळः नैसर्गिक आपत्तीत आमी पीकच नाई, त आमचा...
राज्यात गाईच्या दूध खरेदी दरात कपात नगर ः लॉकडाऊन उघडल्यानंतर दुधाची मागणी वाढल्यावर...
कोरडवाहू, बागायतीसाठी हेक्टरी १० हजार...मुंबई: अतिवृष्टीमुळे राज्यभरातील शेतकऱ्यांचे...
थकबाकीदार ७१ कारखान्यांचे गाळप परवाने ‘...पुणे: राज्यात चालू हंगामात ऊस गाळपासाठी अर्ज...
शेडनेट, फळबागेतून मिळालेल्या ओळखीसह...धुळे जिल्ह्यातील फागणे (ता. धुळे) येथील उमेश व...
कष्ट, नियोजनपूर्वक उभारली आंबा, नारळ,...शासकीय योजनांचा पुरेपूर वापर करताना वरवडे (ता. जि...