agriculture news in Marathi, pest attack on pomegranate , Maharashtra | Agrowon

तेलकट डाग रोगाने डाळिंबाला घेरले

अभिजित डाके
बुधवार, 15 ऑगस्ट 2018

वातावरणातील बदलामुळे आद्रर्ता वाढते आहे. यामुळे या रोगाचा प्रादुर्भाव होत आहे. यादरम्यान, शेतकऱ्यांनी पाण्याचे नियोजन काटेकोरपणे करणे गरजेचे आहे. रोगाच्या नियंत्रणासाठी निर्णायक संशोधन होणे आवश्‍यक आहे.
- अंकुश पडवळे, अध्यक्ष, महाऑरगॅनिक आणि रेस्युडी फ्री फार्मर असोसिएशन, महाराष्ट्र राज्य

सांगली ः राज्यात डाळिंबाचे सुमारे दोन लाखांहून अधिक हेक्‍टर क्षेत्र आहे. त्यापैकी डाळिंबाचा आंबे बहर २० ते २५ टक्के धरला जातो. या बहरातील डाळिंब सुमारे २५० ते ३०० ग्रॅमचे आहे. मात्र, बदलत्या वातावरणमुळे आंबे बहरातील सुमारे ५० टक्के डाळिंबाला तेकलट रोगाने घेरले आहे. यामुळे डाळिंब उत्पादक अडचणीत सापडले आहेत.

राज्यात खात्रीच्या पाण्याची सोय झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी यंदाही फेब्रुवारी आणि मार्चमध्ये बागा धरल्या होत्या. स्वच्छ हवामानामुळे या बागांचे सेटिंगही चांगले झाले. डाळिंबाची फळे पेरूच्या आकाराची झाली आहेत. त्यामुळे डाळिंब उत्पादक समाधानी होते. लवकर बहार घेतलेली डाळिंबे बाजारात दाखल झाली. दरही अपेक्षित मिळत होता. दर वाढण्याची शक्‍यता असल्याची चर्चा शेतकऱ्यांच्यात सुरू होती. मात्र, गेल्या महिन्यात हवामानात बदल झाला.

ढगाळ आणि उष्ण वातावरणामुळे आद्रर्ता वाढत गेली. यामुळे तेलकट डाग रोग बागांत शिरला. गेल्या महिन्यापासून या रोगाचा प्रादुर्भाव दिसत होता. अलीकडे अनेक बागांत तो पसरला आहे. उन्हाळी हंगामातील बहुतांश साऱ्याच बागांत कमी-अधिक रोग दिसत आहे. तो आटोक्‍यात आणण्यासाठी जीवाणूनाशकांची फवारणी शेतकरी करू लागले आहेत. तरी देखील रोग आटोक्‍यात येत नाही. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.

राज्यात दोन लाखांहून अधिक डाळिंबाचे क्षेत्र आहे. त्यापैकी सुमारे ५० ते ६० हजार हेक्‍टरवर आंबे बहर धरला जातो. त्यापैकी ५० टक्के क्षेत्रावर तेलकट डागरोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. म्हणजे सुमारे २५ ते ३० हजार हेक्‍टर क्षेत्र बाधित आहे. यामुळे डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागणार असून, झालेला आर्थिक तोटा भरून निघणारा नाही. त्यामुळे शासनाने डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी होऊ लागली आहे.

सांगली जिल्ह्यात ७० टक्‍के बाधा 
जिल्ह्यात सुमारे ८ हजार हेक्‍टरवर डाळिंबाचे क्षेत्र आहे. या रोगाने किमान ७० टक्‍के इतक्‍या क्षेत्राला बाधा झाल्याचा अंदाज आहे; तर उर्वरित क्षेत्रातही पाच टक्‍क्‍यांपासून पंचवीस टक्‍क्‍यांपर्यंत नुकसान झाले आहे. 

प्रतिक्रिया
माझी दीड हजार झाडे आहेत. दरवर्षी जुलैमध्ये बाग धरतो. तेलकट डाग रोग येतो, पण नियंत्रणात असतो. यंदा उन्हाळी हंगामात बाग धरली. चांगले सेटिंग झाले. मात्र रोगाने बाग घेरली आहे. 
- जालिंदर गायकवाड, शेतकरी, शेटफळे, जि. सांगली.

 


इतर अॅग्रो विशेष
आव्हाने खूप सारी, तरीही मधमाशीपालनात...नाशिक येथे पूर्वा केमटेक या कंपनीतर्फे नुकताच...
आकस्मिकता निधीच्या मर्यादेत तात्पुरत्या...मुंबई : महाराष्ट्र आकस्मिकता निधीच्या...
खासगी प्रवासी बसमधून शेतमाल वाहतुकीला...सोलापूर : राज्याच्या ग्रामीण भागातून मुंबई,...
राज्यात बोरं ८०० ते ४००० रुपये...सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
विदर्भात वादळी पावसाची शक्यता पुणे ः विदर्भाच्या काही भागांत हवामान ढगाळ आहे....
मूळ समस्यांशी थेट भिडावे लागेल ऑगस्टपर्यंत पावसाची वाट पाहणारा शेतकरीवर्ग...
दराबाबतचा दुटप्पीपणा घाऊक आणि किरकोळ बाजारांतील कांद्याचे वाढते दर...
खातेवाटप जाहीर : सुभाष देसाईंकडे कृषी,...मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या...
फळबागांच्या माध्यमातून प्रगतिपथावर वडकी पुणे शहरापासून जवळ असलेले वडकी हे दुष्काळी गाव...
गाई, म्हशीच्या सुलभ प्रसूतीसाठी ‘शुभम’...माळेगाव, जि. पुणे ः शेती, पशुपालन करताना येणाऱ्या...
विदर्भात गारपिटीची शक्यतापुणे ः पावसाला पोषक वातावरण तयार झाल्याने...
कांद्यानंतर 'या' पिकावर साठा मर्यादा...नवी दिल्ली: देशात यंदा कडधान्याचे उत्पादन...
‘पीजीआर’साठी जाचक नियमावली नकोपुणे : बिगर नोंदणीकृत जैव उत्तेजकांना (...
अपरिपक्व कांदा आवकेचा दरवाढीवर परिणामनवी दिल्ली: उन्हाळी आणि खरीप कांदा उत्पानातील...
भांडवली शेतीचा विळखा बघता बघता हरितक्रांतीला पन्नास वर्षे झाली. तसे,...
पशुखाद्य : नियोजन अन् नियंत्रणमहाराष्ट्रात २०१२ च्या दुष्काळापासून दुग्ध...
मराठवाड्यात साडेदहा हजार एकरांवर तुतीऔरंगाबाद : मराठवाड्यात यंदा ३० नोव्हेंबर...
विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सहा दिवस...मुंबई : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन येत्या...
विठ्ठल मंदिरात मोबाईल बंदीपंढरपूर, जि. सोलापूर ः श्री विठ्ठल मंदिराच्या...
धानासाठी क्विंटलला पाचशे रुपये अनुदानमुंबई: राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा...