agriculture news in Marathi pest attack on turmeric crop Maharashtra | Page 2 ||| Agrowon

हळद पिकावर करप्याचा प्रादुर्भाव

टीम अॅग्रोवन
रविवार, 8 नोव्हेंबर 2020

हिंगोली जिल्ह्यातील हळद पिकावर करपा आणि कंदकूज या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे आढळून येत आहे. त्यामुळे उत्पादनात घट होऊ शकते.

हिंगोली ः हिंगोली जिल्ह्यातील हळद पिकावर करपा आणि कंदकूज या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे आढळून येत आहे. त्यामुळे उत्पादनात घट होऊ शकते. त्यासाठी शेतकऱ्यांनी वेळीच उपाययोजना कराव्यात, असा सल्ला तोंडापूर (ता. कळमनुरी) येथील कृषी विज्ञान केंद्रातील विशेषज्ञांनी दिला आहे.

हिंगोली जिल्ह्यात यंदा ३४ हजार ७३९ हेक्टरवर हळद लागवड झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून शेतातील आर्द्रता वाढल्यामुळे बुरशीजन्य करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे औंढा नागनाथ, सेनगाव, कळमनुरी, हिंगोली, वसमत तालुक्यातील अनेक गावशिवारांत आढळून आले आहे.

हळद पिकाच्या वरच्या भागातील पानावर आढळून येणारे गोल  ठिपके करपा रोगाचे लक्षण आहे. त्यामुळे पाने करपतात. अन्न तयार करण्याची प्रक्रिया मंदावते. परिणामी हळद कंदाचा आकार लहान राहतो. वजनात घट पर्यायाने उत्पादनात घट येते. कंदकुज रोगामुळे हळद पिकाच्या खालच्या बाजूची पाने पिवळी होऊन करपत आहेत. त्यामुळे उघडले पडलेले कंद मातीने झाकून टाकावेत. शिफारशीत बुरशीनाशांची आळवणी (ड्रेचिंग) करावी. व्यवस्थापनासाठी कृषी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा, असे कृषी विज्ञान केंद्राचे उद्यानविद्या विशेषज्ञ अनिल ओळंबे यांनी सांगितले.

प्रतिक्रिया
करप्यामुळे हळदीच्या उत्पादनात घट येते. त्यामुळे वेळीच शिफारशीत बुरशीनाशकांचा वापर करून या रोगाचे व्यवस्थापन करावे.
- अनिल ओळंबे, उद्यानविद्या विशेषज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, तोंडापूर, जि. हिंगोली


इतर ताज्या घडामोडी
अकोल्यात ५५ हजार हेक्टरला तडाखाअकोला ः गेल्या आठवड्यात जिल्ह्यात ५२ पैकी ३५...
रत्नागिरीत हजार हेक्टर भातक्षेत्र...रत्नागिरी : अतिवृष्टीमुळे मोठ्या नद्यांना आलेल्या...
सांगलीत ३३ हजार हेक्टर पिकांचे नुकसानसांगली : जिल्ह्यात गेल्या चार-पाच दिवसांपासून...
खानदेशात पंधरा हजार हेक्टर बाजरीची...जळगाव : खानदेशात यंदा पाऊस लांबल्याने आणि...
नाशिक बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांचे...नाशिक : नाशिक बाजार समितीसंदर्भात शासनाकडे...
खानदेशात हलक्या सरी; जोरदार पावसाचा अभावजळगाव : खानदेशात यंदा पाऊसमान अद्याप कमी आहे....
नांदेड जिल्ह्यात पीकविमा योजनेत नऊ लाख...नांदेड : पंतप्रधान पीक विमा योजनेत शेतकऱ्यांनी...
मराठवाड्यातील पशुविज्ञान केंद्राचे घोडे...परभणी ः भारतीय कृषी संशोधन परिषदेने महाराष्ट्र...
परभणी जिल्ह्यात भाजीपाला पिकांची नासाडीपरभणी ः अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेकडो एकरवरील...
पैसे थकवणाऱ्या व्यापाऱ्यांचे लिलाव बंद...सोलापूर ः शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या पट्ट्या...
पुण्यात लाख हेक्टरवर खरिपाच्या पेरण्या पुणे : जिल्ह्यात जुलै महिन्याच्या तिसऱ्या...
पीकविम्यासाठी स्वाभिमानीचा कृषी...पुणे : पीकविमा योजनेतील गेल्या खरिपाची नुकसान...
नगरमध्ये खरीप पेरण्यांनी सरासरी ओलांडली नगर : नगर जिल्ह्यात खरिपाच्या पेरण्यांनी सरासरी...
`लातूरला शेतकऱ्यांनी भरला २३ कोटीचा...लातूर : ‘‘पंतप्रधान खरीप पीक विमा २०२१...
नियमित कर्जदार शेतकऱ्यांना  मिळणार...गोंदिया : राज्य सरकारने नियमित कर्ज परतफेड...
सातारा : पाच हजार हेक्टर क्षेत्र ...सातारा : जिल्ह्यात मागील आठवड्यात झालेल्या...
सांगलीतील पूर ओसरू लागला  सांगली : कृष्णा नदीला आलेल्या महापुराचा सांगली...
सिंधुदुर्गमध्ये नुकसानीचे पंचनामे सुरू सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात अतिवृष्टीने झालेल्या...
पुराचा वारंवार फटका बसणाऱ्या घरांच्या...सांगली : ज्या भागातील घरांना आणि रहिवाशांना...
रानभाज्यांचे आहारातील महत्त्वमहाराष्ट्रामध्ये स्थानिक वातावरणानुसार, तिथे...