केव्हीकेतर्फे कीडनियंत्रण सापळ्यांचे प्रात्यक्षिक

वाशीम : ग्रामीण भागात सुरक्षित धान्य साठवणूक तंत्रज्ञानाचा माहितीचा अभाव आहे. त्यामुळे धान्य साठवणुकीत नुकसान होते. हे टाळण्यासाठी कृषी विज्ञान केंद्राच्या गृहविज्ञान शाखेतर्फे तमिळनाडू कृषी विद्यापीठाने शिफारशीत केलेल्या कीड नियंत्रण सापळयाचे प्रात्यक्षिक घेण्यात आले.
Pest control by KVK Demonstration of traps
Pest control by KVK Demonstration of traps

वाशीम : अन्नधान्याचे उत्पादन वाढविणे जसे महत्त्वाचे आहे. तसेच उत्पादित केलेले धान्य सुरक्षित साठवणे गरजेचे आहे. धान्याची साठवणूक प्रामुख्याने खाण्यासाठी, बियाणे म्हणून इतर भागविण्यासाठी तसेच कडधान्य विक्रीतून चांगली किंमत यावी म्हणून केली जाते. परंतु ग्रामीण भागात सुरक्षित धान्य साठवणूक तंत्रज्ञानाचा माहितीचा अभाव आहे. त्यामुळे धान्य साठवणुकीत नुकसान होते. हे टाळण्यासाठी कृषी विज्ञान केंद्राच्या गृहविज्ञान शाखेतर्फे तमिळनाडू कृषी विद्यापीठाने शिफारशीत केलेल्या कीड नियंत्रण सापळयाचे प्रात्यक्षिक घेण्यात आले.

मंगरूळपीर तालुक्यातील दस्तापूर व कारंजा लाड तालुक्यातील गायवळ येथे हे प्रात्यक्षिक राबविण्यात येत आहे. दस्तापूर व गायवळ येथील ग्रामपंचायतीमध्ये कीड नियंत्रक सापळा वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास केव्हीकेचे प्रमुख डॉ. आर. एल. काळे,  दस्तापूरचे सरपंच अनिता संतोष अटपडकर, गृह विज्ञान शाखाप्रमुख शुभांगी वाटाणे, उमेद जिल्हा व्यवस्थापक  सुधीर खुजे उपस्थित होते. 

डॉ. काळे यांनी अयोग्य पद्धतीने धान्य साठवणूक केल्याने होणारे नुकसान हे आर्थिक तसेच आरोग्याच्या दृष्टीने खूप हानिकारक आहे, असे पटवून दिले. या सापळ्यांचा वापर केल्यामुळे किडींची संख्या तीन पट कमी आणि किडलेल्या दाण्यांची संख्या दोन ते अडीच पट कमी आढळून येते. हा सापळा वापरण्यास सुलभ, कुठल्याही रासायनिक घटकांचा वापर नाही, असे पटवून दिले.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com