agriculture news in Marathi, pest crop wise advice on village, Maharashtra | Agrowon

ग्रामपंचायतींमध्ये पीकनिहाय कृषी संदेश लावण्याच्या सूचना
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 14 ऑगस्ट 2018

पुणे: बोंड अळी तसेच पावसाचा खंड असल्यामुळे पिकांच्या वाढीवर अनिष्ठ परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना वेळीच सावध करण्यासाठी राज्यातील ग्रामपंचायतींच्या नोटीस बोर्डांवर आपत्कालीन स्थितीमधील पीकनिहाय संदेश लावण्याच्या सूचना कृषी आयुक्तालयाने दिल्या आहेत. 

कपाशीच्या पिकांमध्ये बोंड अळीने आर्थिक नुकसानीची पातळी (ईटीएल) ओलांडणाऱ्या गावांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. तसेच, राज्याच्या काही भागांमध्ये पावसाअभावी पिकांची अवस्था चिंताजनक असल्यामुळे शेतकऱ्यांना आपत्कालीन स्थितीमधील पीकनिहाय संदेश देण्याची गरज भासली, असे सूत्रांनी स्पष्ट केले.

पुणे: बोंड अळी तसेच पावसाचा खंड असल्यामुळे पिकांच्या वाढीवर अनिष्ठ परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना वेळीच सावध करण्यासाठी राज्यातील ग्रामपंचायतींच्या नोटीस बोर्डांवर आपत्कालीन स्थितीमधील पीकनिहाय संदेश लावण्याच्या सूचना कृषी आयुक्तालयाने दिल्या आहेत. 

कपाशीच्या पिकांमध्ये बोंड अळीने आर्थिक नुकसानीची पातळी (ईटीएल) ओलांडणाऱ्या गावांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. तसेच, राज्याच्या काही भागांमध्ये पावसाअभावी पिकांची अवस्था चिंताजनक असल्यामुळे शेतकऱ्यांना आपत्कालीन स्थितीमधील पीकनिहाय संदेश देण्याची गरज भासली, असे सूत्रांनी स्पष्ट केले.

‘‘हवामान बदलामुळे जिरायती शेतीत उशिरा पाऊस, पावसाचा खंड, अतिवृष्टी होते. पिकाच्या वाढीवर आणि उत्पादकतेवर परिणाम होतो. त्यातून शेतकऱ्यांना या समस्यांना तोंड द्यावे लागते. राज्यात तीन ऑगस्टपर्यंत ९१ टक्के पेरणी झाली आहे. मात्र, पावसाने उघडीप दिल्यामुळे आता शेतकऱ्यांना संदेश देणे आवश्यक आहे,’’ असे कृषी खात्याने कृषी सहायकांना कळविले आहे. 

कृषी विस्तार संचालक विजय घावटे यांनी कृषी पर्यवेक्षक आणि कृषी सहायकांसाठी लेखी सूचना जारी केल्या आहेत. ‘‘आपापल्या जिल्ह्यातील विविध पिकांबाबत सल्ला संदेश शेतकऱ्यांना ग्रामपंचायतीचे नोटीस बोर्ड किंवा गावातील दर्शनी भागात लावावेत. सर्वसाधारण व आपत्कालीन संदेश प्रदर्शित करण्याची सध्या नितांत गरज आहे,’’ असे संचालकांनी म्हटले आहे. 

भात खाचरांमध्ये पुरेसे पाणी असल्यास भाताची पुनर्लागवड करा, रोपे जास्त दिवसांची झाली असल्यास रोपांची संख्या वाढवून अंतर २० बाय १० सेंटिमीटर ठेवावे, असे आपत्कालीन संदेशात नमूद करण्यात आले आहे. उगवून आलेल्या सोयाबीनवर पाने खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव असल्यास; तसेच उडदात केसाळ अळी असल्यास दहा लिटर पाण्यातून क्लोरपायरिफॉस २५ मि.ली. किंवा क्विनॉलफॉस ३० मिली फवारावे, असे या संदेशात म्हटले आहे. 

अॅडॉप्शन रेट कळवण्याच्या सूचना
संदेशांचे शेतकऱ्यांकडून अवलंबनदेखील होण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करावी, असे आवाहन कृषी आयुक्त सच्चिंद्र प्रताप सिंह यांनी केले आहे. कृषी संदेशांचा अवलंबन दर (अॅडॉप्शन रेट) कृषी संचालकांना अर्धशासकीय पत्राने कळवण्याच्या सूचनादेखील आयुक्तांनी दिल्या आहेत.

इतर अॅग्रो विशेष
संघर्षमय हंगामगेल्या वर्षीच्या गळीत हंगामात राज्यात विक्रमी...
द्राक्ष शेतीला चालना कशी मिळेल?संपूर्ण भारत देशामध्ये द्राक्ष लागवड १.३९ लाख...
जमिनीच्या सुपीकतेतील गांडुळांचे योगदानजगभरामध्ये हजारो जातीची गांडुळे अस्तित्वात असून,...
ईशान्यकडील राज्ये का नाकारतात...कोल्हापूर : वाहतूक खर्चामुळे महाग पडत असल्याने...
जळगाव जिल्ह्यात 'येथे' सुरु झाली...जळगाव ः खानदेशात भारतीय कापूस महामंडळाने (...
केंद्रीय पथक आज करणार पीकहानीची पाहणीपुणे ः मॉन्सूनोत्तर पावसामुळे राज्यात शेतीच्या...
‘दाणेदार’ खताच्या मागे ‘मालदार’ हालचालीपुणे : राज्यात १९७० ते २००० या तीन दशकांमध्ये...
योजना, निधीची कमी नाही, मग शेतीचे प्रश्...औरंगाबाद : योजना, निधी, यंत्रणा, सुविधा,...
धक्कादाय ! चक्क दाताखाली दाणे ठेवत...उमरखेड, यवतमाळ : मॉन्सूनोत्तर पावसाच्या...
कोकण, मध्य महाराष्ट्रात गारठा कमीपुणे: विदर्भ, मराठवाड्यात तापमान कमी झाल्याने...
शेतकऱ्यांचे ३० कोटी परत करा; पुण्यात...पुणे: पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील डाळिंब...
फूलशेती देऊ शकते का उत्पन्नाचा हमखास...अकोला जिल्ह्यातील कंझरा येथील अमृतराव दलपतराव...
पुदिना उत्पादनात रवी करंजकरांची मास्टरी...मुंबईत पुदिन्यात ‘गुडवील’ मिळविलेले करंजकर नाशिक...
अचूक आकडेवारीचा काळ आठव्या आंतरराष्ट्रीय कृषी सांख्यिकी परिषदेत...
उद्यापासून हंगाम सुरु, पण ऊसतोड बंदच !मुंबई / पुणे  ः राज्यातील यंदाचा ऊस गाळप...
विदर्भ, मराठवाड्यात गारठा वाढलापुणे   : किमान तापमानात घट होत असल्याने...
खतमाफियांमुळे शेतकऱ्यांची मोठी लूटपुणे : बोगस मिश्रखतांचे उत्पादन व विक्री करणाऱ्या...
भरताच्या वांग्यासह दादर ज्वारीसाठी...खानदेशकन्या तथा आपल्या कवितेतून शेतीचे...
बॅंक एकत्रीकरण एक अनावश्‍यक पाऊलभारताने १९९० मध्ये नवीन आर्थिक धोरण स्वीकारले....
भूगर्भ तहानलेलाच!रा ज्यात या वर्षी जोरदार पाऊस झाला. अनेक भागांत...