अकोला, वाशीममध्ये सोयाबीनवर कीड, रोगांचा प्रादुर्भाव

सुरवातीला सोयाबीनचे पीक चांगले होते. अाता पाऊस उघडल्यानंतर खोडामध्ये अळी, पानांवर अळी सर्वत्र दिसून येत आहे. कीडनाशके फवारूनही अळी नियंत्रणात अालेली नाही. - मयूर तायडे , शेतकरी, कौलखेड जहाँगीर, ता. जि. अकोला.
सोयाबीनवर किडींचा प्रादुर्भाव
सोयाबीनवर किडींचा प्रादुर्भाव

अकोला  ः अकोला, वाशीम जिल्ह्यांत प्रमुख लागवड क्षेत्र असलेल्या सोयाबीन पिकावर किडी- रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकरी चिंतातूर झाला अाहे. कुठे लागलेल्या शेंगा परिपक्व न होताच अापोआप वाळत अाहेत तर कुठे सोयाबीनच्या खोडात, पानांवर अळीने हल्ला चढवल्याने उत्पादन घटीची शक्यता दर दिवसाला वाढत अाहे. शेंगा वाळण्याचा प्रकार हा वाशीम तालुक्यात तर सोयाबीनच्या खोडांत, पानावर अळीचा प्रादुर्भाव वाढल्याचा प्रकार अकोला तालुक्यातील कौलखेड जहाँगीर या शिवारात अधिक दिसून अाला अाहे.

चांगल्या पावसामुळे अकोला व वाशीम या दोन्ही जिल्ह्यात सोयाबीनचे पीक अातापर्यंत सुस्थितीत होते. शेतकऱ्यांनी वेळोवेळी खत व कीडनाशकांचे नियोजनही केले. अाता हे पीक शेंग धारणा, शेंगा परिपक्व होण्याच्या अवस्थेत अाहे. प्रामुख्याने वाशीम जिल्ह्यात सोयाबीनची जूनमध्येच लागवड झालेली असल्याने अाता हे पीक कुठे दोन तर कुठे अडीच महिने कालावधीचे झालेले अाहे. यामुळे सोयाबीनला शेंगा लागल्या. गेल्या अाठवड्यात सार्वत्रिक सर्वदूर पाऊस झाला. अाता उघडीप मिळाली असून शेतकरी शेतात जाऊन पिकाची पाहणी करती असताना झाडांवर लागलेल्या शेंगा वाळत असल्याचा प्रकार दिसून येत अाहे.

दर दिवसाला हे प्रमाण वाढत अाहे. अकोला तालुक्यातील कौलखेड जहाँगीर परिसरात सोयाबीनवर अळीचा प्रादुर्भाव वाढला अाहे. कीडनाशकांची फवारणी करूनही अळी नियंत्रणात येत नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. कौलखेड येथील मयुर तायडे, नंदकिशोर तायडे, प्रमोद तायडे, विठ्ठल वांडे, पंकज तायडे, संदीप तायडे, अजय घिवे, अविनाश तायडे, विवेक तायडे अशा असंख्य शेतकऱ्यांना सध्या अळीच्या प्रश्नाला सामोरे जावे लागत अाहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com