agriculture news in marathi, Pesticide producers body seeks curbs on imports of formulations | Agrowon

अनोंदणीकृत कीडनाशकांच्या आयातीवर हवे नियंत्रण
वृत्तसेवा
शुक्रवार, 13 एप्रिल 2018

हैदराबाद : भारतीय अटी व नियमावलींनुसार नोंदणी न करताच व कोणत्याही सरकारी यंत्रणेच्या देखरेखीविना देशात कीडनाशकांची मोठ्या प्रमाणात आयात होत आहे. त्यावर नियंत्रण ठेवण्याची गरज भारतातील लघू व मध्यम कीडनाशक उत्पादक कंपन्यांच्या संघाने व्यक्त केली आहे.

हैदराबाद : भारतीय अटी व नियमावलींनुसार नोंदणी न करताच व कोणत्याही सरकारी यंत्रणेच्या देखरेखीविना देशात कीडनाशकांची मोठ्या प्रमाणात आयात होत आहे. त्यावर नियंत्रण ठेवण्याची गरज भारतातील लघू व मध्यम कीडनाशक उत्पादक कंपन्यांच्या संघाने व्यक्त केली आहे.

 संघाचे अध्यक्ष महेंद्र रेड्डी म्हणाले, की दरवर्षी परदेशातून किमान १८० अब्ज रुपये मूल्य असलेल्या कीडनाशकांची आयात भारतात होते. त्यावर गुणवत्तेच्या दृष्टीने कोणतीही देखरेख वा तपासणी होत नाही. अशा प्रकारच्या आयातीचा देशांतर्गत कृषी रसायन उद्योगाला धोका पोचत आहे. केंद्र सरकारच्या प्रस्तावित कीडनाशक व्यवस्थापन कायदा-२०१७ मध्ये भारतीय कंपन्यांनाही उद्योग सुलभ करता यावा यादृष्टीने धोरण राबवणे गरजेचे आहे. 

कीडनाशकाच्या सक्रिय घटकांची नोंदणी करणे अनिवार्यच असले पाहिजे. अन्यथा ठराविक बहुराष्ट्रीय कंपन्यांची मक्तेदारी कीडनाशक उद्योगात निर्माण होईल. भारतीय कंपन्यांना त्यामुळे त्यांच्याशी स्पर्धा करणे अडचणीचे ठरेल, असेही रेड्डी यांनी म्हटले आहे.

कोणत्याही सरकारी यंत्रणेच्या अडथळ्याविना देशात दरवर्षी कीडनाशकांची आयात होते. त्याचा देशातील कीडनाशक उद्योगाला धोका पोचत आहे. 
- महेंद्र रेड्डी, अध्यक्ष, भारतीय लघू व मध्यम कीडनाशक उत्पादक संघ

इतर अॅग्रो विशेष
महात्मा फुले कृषी विद्यापीठाला देशात...नगर ः नवी दिल्ली येथील भारतीय कृषी संशोधन...
व्यापाऱ्याकडून द्राक्ष उत्पादकांची तीन...नाशिक: ओझर येथील आदित्य अ‍ॅग्रो एक्स्पोर्ट या...
‘कन्या वनसमृद्धी योजने’अंतर्गत शेतकरी...मुंबई : शेतकरी कुटुंबात मुलगी जन्माला आली तर...
ड्रोन तंत्रज्ञानाच्या वापराबाबत `...अकोला ः कृषी क्षेत्रात ड्रोन तंत्रज्ञानाचा...
जमीन सुपीकता जपत दर्जेदार संत्रा...दर्जेदार संत्रा फळांच्या उत्पादनात सातत्य राखत...
केळीत दोन हंगामात कारले पिकाचा प्रयोगजळगाव जिल्ह्यातील करंज येथील रामदास परभत पाटील...
कृषी विभागाकडून परीक्षा शुल्क परतीसाठी...अमरावती ः परीक्षा शुल्क परतीसाठी पोस्टेज खर्च सात...
सूतगिरण्या तीन दिवस बंद करण्याची वेळजळगाव ः चीन, युरोपातील सूत निर्यात जवळपास ठप्प...
राज्यात अवघा २५ टक्के पाणीसाठापुणे : जुलै महिना संपत आला, तरीही पावसाने...
गुरुवारपासून पावसाचा जोर वाढण्याची...पुणे: राज्याच्या बहुतांशी भागांत पावसाने उघडीप...
लावलेली वनवृक्षे जगवावी लागतीलनिसर्गाचा समतोल सातत्याने ढासळत असून, जगभरातच...
खजुराची शेती खुणावतेय विदर्भ आणि मराठवाड्यात सिंचनाच्या फारशा सोयी...
शेळीपालन ते दुग्ध प्रक्रिया ः महिलांनी...नाशिक जिल्ह्यातील सिन्नर हा अवर्षणप्रवणग्रस्त...
सरकारला एवढी कसली घाई?विविध मंत्रालयांसाठी अर्थसंकल्पात केल्या जाणाऱ्या...
एक पाऊल पोषणक्रांतीच्या दिशेनेशे तकऱ्यांचे कष्ट, शास्त्रज्ञांचे प्रयत्न आणि...
आधुनिक तंत्रासह काटेकोर धोरणाने अमेरिकन...पुणेः विविध जागतिक संस्थांनी एकत्र येऊन आफ्रिकी,...
मक्याच्या तुटवड्यामुळे अंडी आणि चिकन...पुणे : दक्षिण भारतासह महाराष्ट्र व मध्य प्रदेशात...
लष्करी अळीमुळे राज्यभरातील शेतकरी त्रस्तपुणेः गेल्या वर्षी भीषण दुष्काळाचा सामना करणाऱ्या...
लष्करी अळी नियंत्रणाचे जागतिक प्रयत्नपुणे : स्पोडोप्टेरा फ्रुगीपर्डा म्हणजेच...
मक्यावरील अमेरिकन लष्करी अळीचे आव्हान...पुणे ः गेल्या हंगामातील दुष्काळाच्या चटक्यानंतर...