agriculture news in Marathi pesticide spray on grapes through drone Maharashtra | Page 2 ||| Agrowon

द्राक्ष बागेवर ड्रोनद्वारे कीटकनाशक फवारणीचा प्रयोग

टीम अॅग्रोवन
शनिवार, 12 डिसेंबर 2020

द्राक्षाचे आगार समजल्या जाणाऱ्या मणेराजुरी (ता. तासगाव) हे सातत्याने प्रयोगशील वृत्तीने चर्चेत असते. जिल्ह्यात सर्वाधिक शेततळी याच गावात आहेत.

सांगली ः द्राक्षाचे आगार समजल्या जाणाऱ्या मणेराजुरी (ता. तासगाव) हे सातत्याने प्रयोगशील वृत्तीने चर्चेत असते. जिल्ह्यात सर्वाधिक शेततळी याच गावात आहेत. पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा योग्य विनियोग करून त्याद्वारे मोती पिकविणाऱ्या गावाने जिल्ह्यात सर्वप्रथम ड्रोन यंत्राच्या साह्याने चार एकर द्राक्ष बागेवर फवारणीचा प्रयोग यशस्वी केला. 

तासगाव तालुक्याची द्राक्ष पट्टा अशी ओळख आहे. तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचा शेतीत नवनवीन प्रयोग करण्यात हातखंडा आहे. असाच प्रयोग मणेराजुरीतील चार एकरांवरील द्राक्ष बागेवर करण्यात आला. तो प्रयोग म्हणजे ड्रोनद्वारे बागेवर औषध फवारणीचा. गावातील चार ठिकाणी हे प्रात्यक्षिक करण्यात आले. गेल्या वर्षी अवकाळी आणि अतिवृष्टी झाली. त्यामुळे द्राक्ष बागेत पाणी साचले. चिखल झाला. बागांवर रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून कीटकनाशक फवारणी सुरू केली.

परंतु चिखलामुळे ट्रॅक्टर शेतात चालत नव्हते. यासह अनेक संकटाला सामोरे जावे लागल्याने वेळेत फवारणी करता आली नाही. त्यामुळे द्राक्ष बागायतदारांना बागा सोडून द्याव्या लागल्या. 
यंदाही अतिवृष्टीमुळे फळ छाटणी उशिरा झाली. त्यामुळे शेतातील पाण्याचा निचरा करतानाच कोवळ्या फुटीवर होणारा रोगाचा प्रादुर्भाव रोखण्याचे आव्हान होते. चिखल असल्याने कोणतेही यंत्र चालत नाही. यंदा अतिवृष्टीमुळे यासमस्येत भरच पडल्याने शेतकरी चिंतेत होते. बागा वाचवायच्या कशा असा यक्षप्रश्‍न शेतकऱ्यांसमोर होता. त्या वेळी दिलीप जमदाडे, संजय जमदाजे, रामभाऊ जमदाडे, दिलीप जमदाडे (मिस्त्री) यांनी यावर उपाय म्हणून ड्रोनद्वारे फवारणीचा निर्णय घेतला. 

नाशिक येथून ड्रोनयंत्र मागवून बागांवर बुरशीनाशकांची फवारणी केली. या ड्रोन यंत्रात तांत्रिक बदल झाल्यास भविष्यात द्राक्ष बागेवर ड्रोनद्वारे फवारणी ही फायदेशीर सोईस्कर ठरू शकते असा विश्‍वास शेतकऱ्यांना आहे.

असा फवारणीचा प्रयोग

  •  तीन किलोमीटरपर्यंत फवारणी होऊ शकते
  •  चार एकरांवर ड्रोनद्वारे फवारणीचा प्रयोग
  •  दहा मिनिटांत एक एकरावर होते फवारणी
  •  औषधे आणि ट्रॅक्टरच्या डिझेलवर होणारा अतिरिक्त खर्च कमी होण्यास मदत
  •  वेळेची बचत
  •  

प्रतिक्रिया
पावसाळ्यात ट्रॅक्टरद्वारे फवारणी करण्यास मोठ्या अडथळ्यांना समोरे जावे लागते. द्राक्ष बागेवर ड्रोनद्वारे फवारणीचा प्रयोग चांगला आहे. त्यामुळे ड्रोनद्वारे फवारणी करणे सोपे जाईल. ड्रोनचा वापर झाल्याने १० मिनिटांत एक एकर क्षेत्रावर फवारणी होऊ शकते. तसेच वेळ, औषधावर होणार खर्च, ट्रॅक्टरला लागणारे डिझेल याचा खर्च वाचण्यास मदत होईल.
- दिलीप जमदाडे, द्राक्ष उत्पादक, मणेराजुरी, ता. तासगाव

मणेराजुरीत द्राक्ष बागेवर ड्रोनद्वारे फवारणीचा केलेला प्रयोग यशस्वी झाला आहे. परंतु त्यामध्ये काही तांत्रिक बदल करणे आवश्यक आहे. तो बदल झाला तर नक्कीच द्राक्ष बागेवर ड्रोनद्वारे फवारणी यंत्राचा शेतकऱ्यांना फायदा होईल. 
- चंद्रकांत लांडगे, विभागीय अध्यक्ष, राज्य द्राक्ष बागायतदार संघ, सांगली


इतर अॅग्रो विशेष
राज्यात दीड महिन्यांत धरणांत ३७३ टीएमसी...पुणे : राज्यातील बहुतांश भागात जुलैमध्ये पावसाने...
हजारो नुकसानग्रस्त दाव्यापासून वंचित नांदेड : अतिवृष्टी तसेच संततधार पावसामुळे...
कोल्हापुरात पुराचे पाणी ओसरू लागले कोल्हापूर : जिल्ह्यात पावसाने पूर्णपणे उघडीप दिली...
राज्याची फळबाग लागवड योजना बंद नगर ः फळबागेचे क्षेत्र वाढीसाठी राज्यात सध्या...
विना नांगरणी तंत्राने कपाशी, तुरीची शेतीदेवगाव (ता. पैठण, जि. औरंगाबाद) येथील प्रयोगशील,...
हिंमत, परिश्रमातून पूर्णाबाईंनी साधली...शिरेगाव (जि. नगर) येथील अल्पभूधारक पूर्णाबाई होन...
मानवनिर्मित आपत्ती!राज्यात बेफामपणे कोसळणाऱ्या पावसाने सगळीकडे एकच...
दोन लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसानपुणे : राज्यातील बहुतांश भागांत पावसाने उघडीप...
मका पिकात अमेरिकन लष्करी अळीचा...शिरपूर, जि. धुळे : जिल्ह्यात अनेक भागांत मका...
कोकणात पावसाची शक्यता पुणे : बंगालचा उपसागरात तयार झालेल्या कमी दाब...
कोल्हापुरात नद्यांचे पाणी ओसरण्याऐवजी...कोल्हापूर : सलग दुसऱ्या दिवशी पावसाने विश्रांती...
शेतकरी संसदेत आज ‘महिला राज’ नवी दिल्ली ः मोदी सरकारचे तीन कृषी कायदे रद्द...
आंदोलनादरम्यान एकही शेतकरी मृत्यूची...नवी दिल्ली ः केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात...
थेट कृषिमंत्र्यांचीच केली दिशाभूल; ‘...अमरावती : विमा कंपनीच्या प्रतिनिधीने खोटी माहिती...
सर्वंकष आढावा घेऊन नुकसान भरपाई जाहीर...रत्नागिरी : ‘‘तुम्हाला पायावर उभे करण्यासाठी...
बहुपीक पद्धतीतून साधले नफ्याचे सूत्रकोल्हापूर जिल्ह्यातील शेंडूर (ता. कागल) येथील...
पावसाची उघडीप; पूरस्थिती कायम पुणे : कोकण, सातारा, कोल्हापूर, सांगली, पुण्यासह...
सांगलीत चौदा हजार जनावरांचे स्थलांतरसांगली : जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पूर पट्यातील...
कोसळलेला प्रसंग मोठा; तुमचं पुनर्वसन...मुंबई ः तुमच्यावर कोसळलेला प्रसंग मोठा आहे....
पावसाचा जोर पंधरा दिवस कमी राहण्याची...पुणे : मुसळधार पावसाने रत्नागिरी, रायगडसह,...