agriculture news in marathi Petition against salary cut of 'Atma' employees | Page 3 ||| Agrowon

‘आत्मा’ कर्मचाऱ्यांची पगार कपातीविरोधात याचिका

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 9 नोव्हेंबर 2021

आत्मा यंत्रणेतील कर्मचाऱ्यांचे पगार कमी करण्यात आल्याने आत्मा एम्प्लॉइज वेल्फेअर असोसिएशन (महाराष्ट्र राज्य) यांच्या वतीने गेल्या महिन्यात उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे.

नागपूर : केंद्र सरकारनेच नव्या मार्गदर्शक सूचनांच्या माध्यमातून पगाराला सीलिंग लावल्याचा हवाला देत आत्मा यंत्रणेतील कर्मचाऱ्यांचे पगार कमी करण्यात आल्याने आत्मा एम्प्लॉइज वेल्फेअर असोसिएशन (महाराष्ट्र राज्य) यांच्या वतीने गेल्या महिन्यात उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे. केंद्र व राज्य सरकारचे कृषी सचिव, कृषी आयुक्‍त, राज्याचे आत्मा संचालक यांना या प्रकरणात प्रतिवादी करण्यात आले आहे.

राज्यात आत्मा यंत्रणेत एटीएम, बीटीएम तसेच संगणक परिचालक अशी तब्बल ११०० पदे मंजूर आहेत. यातील अवघी ५४० पदेच भरण्यात आली आहेत. या कर्मचाऱ्यांच्या पगारातील ६० टक्‍के हिस्सा केंद्र, तर ४० टक्‍के हिस्सा राज्याकडून खर्च केला जातो. मात्र गेल्या दोन महिन्यांपासून राज्यातील ८० टक्‍के जिल्ह्यांमध्ये कर्मचाऱ्यांचे पगारही निधीअभावी झाले नसल्याची माहिती आत्मा संघटनेच्या सूत्रांकडून देण्यात आली. दिवाळीच्या तोंडावर पगार रखडल्याने कर्मचाऱ्यांची कोंडी झाली आहे. विशेष म्हणजे केंद्र सरकारने ६९४ कोटी रुपयांचा पहिला हप्ता पगारापोटी रिलीज केला आहे. मात्र राज्य सरकारस्तरावरच निधीची उपलब्धता होत नसल्यामुळे पगार रखडल्याचा आरोप कर्मचारी करीत आहेत. दिवाळीपूर्वी दोन महिन्यांचे पगार करण्यात यावे, अशी मागणी कर्मचाऱ्यांची आहे. दरम्यान आत्मा यंत्रणेतील कर्मचाऱ्यांचे पगार कमी करण्यात आल्याने आत्मा एम्प्लॉइज वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे. याचिका क्रमांक २८९२२ असा आहे.

पगार केले कमी
२०१४ व २०१८ च्या मार्गदर्शक सूचनांनुसार बीटीएमचे पगार २० अधिक ५ हजार व त्यामध्ये दरवर्षी १० टक्‍के वाढ अपेक्षित याप्रमाणे होते. त्यानुसार बीटीएमला ४४ हजार रुपये, एटीएमला ३६ हजार रुपये, संगणक परिचालक यांना ३२ हजार रुपये याप्रमाणे पगार मिळत होता. आता मात्र २०१८ मधील केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांचा हवाला देत पगारावर सीलिंग लावण्याचा निर्णय राज्याने घेतला. त्याअंतर्गत बीटीएम (गट/तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक), एटीएमचा (सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक) पगार प्रत्येकी ३० हजार रुपये, तर संगणक परिचालकांचा पगार ३२ हजार रुपयांवरून थेट १६ हजार रुपयांपर्यंत कमी करण्यात आला आहे. यामुळे आत्मा यंत्रणेतील कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.
-
प्रतिक्रिया...
‘आत्मा यंत्रणा कृषी विस्तारात मोलाची भूमिका बजावत असताना त्यांच्याप्रतीच दुजाभाव अवलंबिला जातो. सर्वच क्षेत्रांतील कर्मचाऱ्यांचे पगार वाढते असतात, परंतु आत्माच्या बाबतीत उलटाच प्रकार घडला आहे. यंत्रणेतील कर्मचाऱ्यांचे पगार पूर्वीच्या पगारापेक्षा कमी करण्यात आले आहेत. याबाबत केंद्र व राज्य सरकारस्तरावर पाठपुरावा करण्यात आला. आता थेट औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे.’
- विनोद रहांगडाले
अध्यक्ष,
आत्मा एम्प्लॉइज वेल्फेअर असोसिएशन (महाराष्ट्र राज्य)
-
२०१४ च्या मार्गदर्शक सूचनांनुसार कर्मचाऱ्यांना पगारासोबतच दहा टक्‍के वाढ देण्यात येत होती. २०१८ मध्ये सुधारित मार्गदर्शक सूचना केंद्राने पाठविल्या. त्यामध्ये पगारावर सीलिंग लावले आहे. त्यामुळे पगार कमी करण्यात आला. दहा टक्‍के वाढीबाबतचा विरोधाभास मात्र कायम आहे. त्याप्रश्‍नी केंद्राला दोनदा पत्र पाठविले, परंतु त्यांच्याकडून उत्तर आले नाही. नव्या सुधारित मार्गदर्शक सूचना २०२२ मध्ये येण्याची अपेक्षा असून, त्यात स्थिती स्पष्ट होईल, असे वाटते.
- किसनराव मुळे, संचालक, आत्मा 


इतर ताज्या घडामोडी
शेतकऱ्यांनाही थंडी जाणवते भाऊ!जलालखेडा, जि. नागपूर ः नरखेड तालुक्यात रब्बी...
‘मँगोनेट’ अंतर्गत सात वर्षांत ४, ५६६... रत्नागिरी : हापूसची परदेशात निर्यात होऊन येथील...
‘जलजीवन मिशन’च्या कामात सातारा अग्रेसरसातारा : जलजीवन मिशनअंतर्गत जिल्ह्यात २३७...
नाशिकमधील उन्हाळ कांद्याचा साठा अखेरीकडेनाशिक : फेब्रुवारी २०२१पासून उन्हाळ कांद्याची...
पाणीपट्टी ऊसबिलातून वसूल केल्यास आंदोलनसांगली ः  शेतकऱ्यांकडील पाणीपट्टीची रक्कम...
अकोला जिल्हा परिषदेत नववर्षातही राजकीय...अकोला ः गेले वर्षभर जिल्हा परिषदेत सुरू असलेले...
पुणे विभागात ज्वारी क्षेत्रात...पुणे : परतीच्या पावसाने चांगलाच धुमाकूळ घातल्याने...
येल्लकी वाणाच्या केळीला क्विंटलला चार...जळगाव  ः वढोदा (ता. चोपडा, जि. जळगाव) येथील...
घरच्या घरी भाजीपाल्यासाठी ‘जिजाई नॅनो...सोलापूर ः घरच्या घरी सेंद्रिय पद्धतीने आणि अगदी...
बलून बंधाऱ्यांसाठी गिरणा परिक्रमा सुरू जळगाव ः  गिरणा नदीवर प्रस्तावित बलून...
घाटणे बॅरेजमध्ये गेलेल्या जमीनीची...सोलापूर ः मोहोळ तालुक्यातील आष्टी उपसा सिंचन...
पुणे जिल्ह्यात ९ हजारांवर कुटुंबांना...पुणे ः ‘‘राज्य आणि केंद्र सरकारतर्फे जिल्ह्यात...
पाटण तालुक्यात पुराच्या धोक्याकडे...मोरगिरी, जि. सातारा : तालुक्यात वाढत्या पावसाच्या...
मराठवाड्यात २१ लाख २१ हजार हेक्‍टरवर...औरंगाबाद : मराठवाड्यात यंदा रब्बी पेरणीत आजवर २१...
परभणी, हिंगोलीत ‘शेतमाल तारण’द्वारे दोन...परभणी ः ‘‘शेतीमाल तारणकर्ज योजनेअंतर्गत परभणी...
‘सिद्धेश्वर’ च्या अध्यक्षपदी काडादी, ...सोलापूर ः कुमठे येथील श्री सिध्देश्वर सहकारी साखर...
सोलापूर बाजार समितीच्या संचालक मंडळावर... सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार...
लासलगाव येथे खत विक्रेत्याकडून जादा...नाशिक: रब्बी हंगामातील पेरण्या सुरू असून काही...
उष्णता ताणाचे वासराच्या आरोग्यावर दीर्घ...दुधाळ जनावरांवर उष्णतेच्या ताणाचा...
नांदुरा येथे कापसाचे दर नऊ हजार रुपये...नांदुरा, जि. बुलडाणा ः कॉटनबेल्ट म्हणून ओळख...