agriculture news in marathi Petro, diesel Price hike in India | Agrowon

पेट्रोल-डिझेल महागले

वृत्तसेवा
सोमवार, 8 जून 2020

देशभरात ८० दिवसानंतर पेट्रोल आणि डिझेल वाढ झाली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात ६० पैसे प्रति लीटरची वाढ करण्यात आली आहे.

नवी दिल्ली : देशभरात ८० दिवसानंतर पेट्रोल आणि डिझेल वाढ झाली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात ६० पैसे प्रति लीटरची वाढ करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाचे दरही ४० डॉलर प्रति बॅरलच्या गेल्याने पेट्रोलियम कंपन्यांनी इंधनाच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. लॉकडाउन दरम्यान इंधनाची मागणी कमी झाल्याने पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल केला नव्हता.

मे महिन्यात केंद्र सरकारने पेट्रोलच्या उत्पादन शुल्कात वाढ करण्यात आली होती. त्यानंतर पेट्रोलवरील उत्पादन शुल्क वाढून २२.९८ रूपये प्रति लीटर आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क वाढून १८.८३ रूपये प्रति लीटर करण्यात आले होते. उत्पादन शुल्कात वाढ केल्याने गेल्या काही महिन्यांमध्ये कच्च्या तेलाच्या किंमतीत झालेल्या घसरणीचा फायदा ग्राहकांना मिळाला नव्हता.

महाराष्ट्रात पेट्रोल आणि डिझेलवर आकारल्या जाणाऱ्या मूल्यवर्धित करावर (व्हॅट) एक जून रोजी अधिभार वाढवल्याने राज्यात इंधनाच्या दरात आधीच वाढ झाली होती. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर दोन रुपयांची वाढ झाली होती. आता पेट्रोलियम कंपन्यांनी इंधनाच्या दरात आणखी वाढ केली आहे.

  • मुंबई – पेट्रोल ७८.९१ रूपये आणि डिझेल ६९.७९ रूपये
  • नवी दिल्ली – पेट्रोल ७१.८६ रूपये आणि डिझेल ६९.९९ रूपये
  • चेन्नई – पेट्रोल ७६.०७ रूपये आणि डिझेल ६८.७४ रूपये
  • हैदराबाद – पेट्रोल ७४.६१ रूपये आणि डिझेल ६८.४२ रूपये
  • बंगळुरू – पेट्रोल ७४.१८ रूपये आणि डिझेल ६६.५४ रूपये 

इतर अॅग्रो विशेष
राज्यात हलक्या पावसाची शक्यता पुणे : राज्यात पावसाचा जोर ओसरला आहे. आज (ता. १६...
सोयाबीनचा उच्चांकी दर मिळतोय अत्यल्प...अकोला ः सध्या बाजारात सोयाबीनला कुठे दहा हजार,...
...तर ‘त्या’ नेत्यास एकरभर जमीन बक्षीस...कोल्हापूर : केंद्र व राज्य सरकारकडून एकरकमी...
पाणलोट चळवळीचे आधारवड फादर हर्मन बाखर...नगर ः महाराष्ट्रातील दुष्काळी भागासाठी आयुष्‍य...
रब्बी हंगामात होणार ८४८३ शेतीशाळा पुणे ः रब्बी हंगामात राज्यातील शेतकऱ्यांना...
सोयाबीन उत्पादकांनी टार्गेट ठेवूनच...पुणे : मध्य प्रदेशात सोयाबीनची आवक हळूहळू वाढत...
खानदेशात केळी दर स्थिरजळगाव : खानदेशात कांदेबाग केळीची आवक दिवसागणिक...
घोटभर पाणी बेतले मायलेकीच्या जिवावरउंडवडी, जि. पुणे :  पिण्यासाठी पाणी काढताना...
हरभरा पीक करणार यंदाही रब्बीचे नेतृत्व पुणे ः राज्यात खरीप हंगामात मुख्य पीक म्हणून...
मोसंबी, शेडनेटसह सेंद्रिय पद्धतीने...पारंपरिक मोसंबी बागेतील लागवड अंतर व वाणातील बदल...
‘कोरोना’नंतर आकार घेतेय फुलांची...गेल्या दोन वर्षांपासून कोरोना संकटामुळे पुणे...
‘मामा’ तलाव रुतले गाळात साकोली, जि. भंडारा : भंडारा, गोंदिया जिल्ह्यांतील...
‘इंडो- इस्राईल तंत्रज्ञानातून संत्रा...नागपुरी संत्र्याची हेक्टरी उत्पादकता वाढण्यासाठी...
राज्यात उद्यापासून पावसाची उघडीप शक्यपुणे : राज्यात सुरू असलेला पाऊस उद्यापासून (ता....
कीडनाशके साठ्यांच्या होणार संगणकीय नोंदीपुणे ः देशातील कीडनाशके विक्री करणाऱ्या दुकानात...
ई-पीक पाहणी ॲपमध्ये आंतरपीक नोंदणीला ‘...पथ्रोट, जि. अमरावती : शासनाच्या ई-पीक पाहणी...
मानवाधिकार आयोगाची शेतकरी आंदोलनावरून...नवी दिल्ली ः राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने (...
ई-पीक पाहणीबाबत काही भागांतून तक्रारीपुणे ः आपल्या शेतातील पिकाची नोंद स्वतः...
पालघर, नाशिकमध्ये मुसळधारपुणे : पावसाला पोषक हवामान असल्याने राज्यात अनेक...
कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधारेचा इशारापुणे : पोषक हवामानामुळे राज्यात सर्वदूर पावसाचा...