Agriculture news in marathi Petrol-diesel sale banned in Solapur | Agrowon

सोलापुरात पेट्रोल-डिझेल विक्रीवर ३१ मार्चपर्यंत बंदी

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 27 मार्च 2020

सोलापूर ः कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वेळीच रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन सातत्याने विविध उपाय अंमलात आणत आहे. गर्दीचे प्रमाण अधिकाधिक टाळण्यासाठी सर्वाधिक प्रयत्न केले जात आहेत. या प्रयत्नांचा भाग म्हणून सोलापूर जिल्ह्यात अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळता अन्य वाहनांना पेट्रोल-डिझेल विक्री बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या ३१ मार्चपर्यंत हा निर्णय लागू असेल, असेही जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले. 

सोलापूर ः कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वेळीच रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन सातत्याने विविध उपाय अंमलात आणत आहे. गर्दीचे प्रमाण अधिकाधिक टाळण्यासाठी सर्वाधिक प्रयत्न केले जात आहेत. या प्रयत्नांचा भाग म्हणून सोलापूर जिल्ह्यात अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळता अन्य वाहनांना पेट्रोल-डिझेल विक्री बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या ३१ मार्चपर्यंत हा निर्णय लागू असेल, असेही जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले. 

जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी वाढती गर्दी आणि सातत्याने सांगूनही लोकांची भूमिका बदलत नसल्याने विचार करुन हा निर्णय घेतल्याचे सांगितले. या आधी वेगवेगळ्या पातळ्यांवर सुरक्षेचे उपाय प्रशासन करत आहे. त्यात आता या नव्या निर्णयाची भर पडली आहे. 

जनता कर्फ्यूनंतर लॅाकडाऊन असूनही लोक रस्त्यावर फिरत आहेत. तसेच गटागटाने आणि गर्दीने जमा होत आहेत. त्याला पूर्णपणे आळा बसवण्यासाठी आता पेट्रोलपंपांवरही पेट्रोल-डिझेल याच्या विक्रीवर बंदी आणण्यात आली आहे. मात्र, अत्यावश्यक सेवेतील वाहनांना त्यासाठी सूट दिली आहे. तरीही पेट्रोल आणि डिझेल भरण्यासाठी पंपांवर लांबच्या लांब रांगा लावल्या जात आहेत. ही वाढती गर्दी लक्षात जिल्हाधिकारी शंभरकर यांनी हे आदेश काढले. 

अत्यावश्यक सेवेसाठी मिळणार पेट्रोल-डिझेल 
या विक्रीमधून शेती, प्रक्रिया उद्योग, जीवनावश्यक वस्तू, दूध, अन्नधान्य पुरवणारे कर्मचारी यांना वगळण्यात आले आहे. ३१ मार्चपर्यंत त्याची अंमलबजावणी होणार आहे.
 


इतर ताज्या घडामोडी
काही भागात पावसाच्या उघडिपीची शक्यता महाराष्ट्रावर बुधवार (ता.२३) पर्यंत  १००४...
राज्य द्राक्ष बागायतदार संघाची ...नाशिक: महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार...
पांगरी परिसरात पिकांवर आस्मानी संकटपांगरी, जि. सोलापूर ः पांगरी (ता. बार्शी) परिसरात...
शेतमाल स्थानिक भागात विकला जाणार : भुजबळनाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यात आदिवासी समाज...
परभणी, हिंगोली जिल्ह्यात पावसाचे थैमाननांदेड : मराठवाड्यातील परभणी, हिंगोली जिल्ह्यात...
नाशिक विभागात कांदा लागवडीत ८ हजार...नाशिक : चालू वर्षी खरीप कांद्याच्या लागवडीपूर्वी...
रावेर तालुक्यात सीएमव्ही नुकसानीचे...जळगाव ः कुकुंबर मोसॅक विषाणूमुळे (सीएमव्ही)...
हिंगोली जिल्ह्यात सोयाबीनच्या पिकाला...हिंगोली : जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांपासून...
मराठवाड्यात अतिपाऊस खरीप पिकांच्या...औरंगाबाद : मराठवाड्यात गत काही दिवसांपासून...
धुळ्यात लाळ्या खुरकूत रोग प्रतिबंधक...धुळे : धुळे जिल्ह्यात ३० सप्टेंबरपर्यंत...
पावसाचा डाळींब पिकाला तडाखाआटपाडी, जि. सांगली ः अवर्षण प्रवण असलेल्या आटपाडी...
मायक्रो फायनान्सचे चक्रव्यूह...मुंबई : ग्रामीण भागातील सूक्ष्म वित्त पुरवठा...
नगर जिल्ह्यात अतिवृष्टीचा चार हजार...नगर ः यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीपासून चांगला...
कोकण कृषी विद्यापीठात बांबू कार्यशाळेचे...दापोली, जि. रत्नागिरी : जगभरात दरवर्षी १८...
अकोला जिल्ह्यातील सहा खत विक्रेत्यांचे...अकोला ः या हंगामात खत विक्रीत मोठ्या प्रमाणात...
सदोष बियाणेमुळे भेंडी बीजोत्पादक अडचणीतबुलडाणा ः लोणार तालुक्यातील शेतकऱ्यांनी या...
भातपीक कापणीत पावसाचा अडसररत्नागिरी : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने...
ठाण्यातील १४ हजार हेक्टर पिकांचा काढला...मुंबई : ठाणे जिल्हा कृषी विभागाने यंदा पंतप्रधान...
औरंगाबादमध्ये कांदा ३०० ते २३०० रूपयेऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
आरोग्यदायी विड्याचे पानकोणत्याही धार्मिक कार्यात, पूजेच्या ठिकाणी...