agriculture news in marathi, Petrol prices hiked, reaches record high in Delhi | Agrowon

पेट्रोल, डिझेलचा आगडोंब; दरवाढीची हॅट्ट्रीक
वृत्तसेवा
शनिवार, 8 सप्टेंबर 2018

नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेलच्या दरात शनिवारी प्रतिलिटर सुमारे 39 पैशांची वाढ झाली. पेट्रोल आणि डिझेलचे दर दैनंदिन स्वरूपात बदलू लागल्यानंतर 14 महिन्यांत झालेली ही सर्वांत मोठी दरवाढ ठरली आहे. 

पेट्रोलच्या दरात आज प्रतिलिटर 39 पैसे आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 44 पैसे वाढ करण्यात आली. पेट्रोलचा दर दिल्लीत आज प्रतिलिटर 80.38 या उच्चांकी पातळीवर गेला, तर मुंबईत तो 87.77 रुपयांवर गेला. डिझेलचा दर आज दिल्लीत प्रतिलिटर 72.51 आणि मुंबईत 76.98 रुपयांवर गेला. 

नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेलच्या दरात शनिवारी प्रतिलिटर सुमारे 39 पैशांची वाढ झाली. पेट्रोल आणि डिझेलचे दर दैनंदिन स्वरूपात बदलू लागल्यानंतर 14 महिन्यांत झालेली ही सर्वांत मोठी दरवाढ ठरली आहे. 

पेट्रोलच्या दरात आज प्रतिलिटर 39 पैसे आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 44 पैसे वाढ करण्यात आली. पेट्रोलचा दर दिल्लीत आज प्रतिलिटर 80.38 या उच्चांकी पातळीवर गेला, तर मुंबईत तो 87.77 रुपयांवर गेला. डिझेलचा दर आज दिल्लीत प्रतिलिटर 72.51 आणि मुंबईत 76.98 रुपयांवर गेला. 

देशव्यापी बंदचा इशारा 
देशभरात इंधनदरवाढीचा भडका उडाला आहे. विरोधी पक्षांनी सरकारला यावरून लक्ष्य केले आहे. इंधन दरवाढीच्या निषेधार्थ कॉंग्रेससह इतर विरोधी पक्षांनी 10 सप्टेंबरला देशव्यापी बंद पुकारला आहे. 

सरकारकडून दिलासा नाही 
इंधन दरवाढीतून सामान्य नागरिकांना दिलासा देणारे पाऊल उचलण्यास सरकारने नकार दर्शविला आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी नुकतीच पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात करण्याची शक्‍यता फेटाळून लावली होती. 

ऑगस्टच्या मध्यापासून भडका 
ऑगस्ट महिन्याच्या मध्यापासून पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ मोठ्या प्रमाणात होत आहे. तेव्हापासून पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 2.85 रुपये आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 3.3 रुपयांची वाढ झाली आहे. खनिज तेलाचे वाढते भाव आणि रुपयातील घसरण यामुळे इंधन दरवाढ होत आहे. 

दरात अर्ध्यापेक्षा अधिक करच 
पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ विक्री दरापैकी निम्मी रक्कम ही केंद्र व राज्य सरकारच्या करांची आहे. 

पेट्रोवरील कर (प्रतिलिटर/टक्के) 
केंद्र सरकार : 19.48 
महाराष्ट्र राज्य : 39.12 
(मुंबई) 

डिझेलवरील कर (प्रतिलिटर/टक्के) 
केंद्र सरकार : 15.33 
महाराष्ट्र राज्य : 24.78 
(मुंबई) 

पेट्रोलियम उत्पादनातून केंद्राला उत्पादन शुल्क 
आर्थिक वर्ष 2014-15 : 99 हजार 184 कोटी रुपये 
आर्थिक वर्ष 2017-18 : 2 लाख 29 हजार 19 कोटी रुपये 

कच्च्या तेलाच्या प्रतिबॅरेलचा 77 डॉलरवर पोहोचलेला भाव, डॉलरच्या तुलनेत रुपयाची 72 रुपयांपर्यंत झालेली घसरण, इराणकडून नोव्हेंबरपासून इंधन खरेदीसाठी अमेरिकेकडून घालण्यात आलेले निर्बंध, "ओपेक'कडून प्रतिदिन एक बिलियन बॅरेलवरून 1.5 बिलियन एवढे उत्पादन वाढविण्यास दाखविण्यात आलेली असमर्थतता, खुल्या केलेल्या इंधनाच्या किमती या सर्वांचा परिणाम दरवाढ होण्यावर झाला आहे. हे रोखण्यासाठी सरकारने वाढीव किमतीवर नफा घेऊ नये. कराची रक्कम निश्‍चित करावी. 
- पेट्रोलियम डीलर्स असोसिएशन, पुणे. 

इतर अॅग्रो विशेष
`चांद्रयान २' चंद्राच्या कक्षेत दाखलनवी दिल्ली ः भारताची महत्त्वाकांक्षी...
मराठवाड्यात २७ टक्केच पीक कर्जवाटपऔरंगाबाद : यंदाच्या खरिपासाठी शेतकऱ्यांना...
राज्य बँकेची ३५ हजार कोटींची उलाढालमुंबई : अहवाल वर्षात इतिहासात ३५,४४० कोटी इतकी...
नाशिक जिल्ह्यात मक्यावर अमेरिकन लष्करी...नाशिक  : चालू खरीप हंगामात मका पिकावर मोठ्या...
`अतिपावसाने होत्याचं नव्हतं झालं`; पुणे...पुणे ः शेतकरी पाणीटंचाईच्या संकटातून सावरण्याचा...
अपघात विमा योजनेत शेतकऱ्यासह कुटुंबातील...मुंबई: गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा...
राज्यात पूरप्रवण क्षेत्राबाबत संशयकल्लोळपुणे : कृष्णा व गोदावरी नदीच्या खोऱ्यात सतत पूर...
भाजीपाल्याचे आगार उद्ध्वस्तकोल्हापूर/सांगली : ज्या जिल्ह्यांनी संपूर्ण...
‘शेती तिथे रस्ता’ उपक्रमासह...सातारा जिल्ह्यातील पाटण हा डोंगराळ तालुका म्हणून...
कृत्रिम पावसासाठी अखेर विमान उडाले; ३८...औरंगाबाद  : कृत्रिम पावसाच्या प्रयोगासाठी...
पुरामुळे मका पिकाला फटकानवी दिल्ली  ः महाराष्ट्र आणि कर्नाटकात मका...
राज्यात हलक्या पावसाचा अंदाज पुणे : कमाल तापमानात वाढ होत असतानाच, बुधवारी (ता...
मंदीचा मारगेल्या वर्षभरापासून आर्थिक मंदीचे चटके देशाला बसत...
समस्यांच्या गर्तेत हरवलेली शेतीकाही वर्षांपूर्वी उत्तम शेती असण्याची अनेक कारणे...
शेततळ्याच्या प्लॅस्टिकला तूर्त अनुदान...पुणे  : शेततळ्याच्या अस्तरीकरणाकरिता...
वारणा-कृष्णा नदीकाठच्या शेतजमिनी कोसळू...सांगली ः सांगली जिल्ह्यातील कृष्णा आणि वारणा...
मार्केट केंद्रित शेडनेटची उत्कृष्ठ शेती अभ्यासवृत्ती, कायम नवे शिकण्याची आस, बाजारपेठांचा...
जालना जिल्ह्यात वीस हजार शेतकऱ्यांच्या...जालना : जिल्ह्यातील १२० गावांत हवामान अनुकूल...