सोसायट्यांमध्ये थेट विक्रीतून नफा; इंदापुरातील ‘पीएच प्रोग्रेसिव्ह फार्मर प्रोड्यूसर' कंपनीचा उपक्रम

इंदापूर (जि. पुणे) येथील पीएच प्रोग्रेसिव्ह फार्मर प्रोड्यूसर कंपनीने शहरातील सोसायट्यांना थेट भाजीपाला पुरविण्याचा उपक्रम सुरू केला. त्याद्वारे विविध भागातील ५२ सोसायट्यांना सर्व प्रकारचा भाजीपाला, फळे, गहू, ज्वारी व गव्हाचे पीठ आदींचा पुरवठा केला जात आहे.
सोसायट्यांमध्ये थेट विक्रीतून नफा; इंदापुरातील ‘पीएच प्रोग्रेसिव्ह फार्मर प्रोड्यूसर' कंपनीचा उपक्रम
सोसायट्यांमध्ये थेट विक्रीतून नफा; इंदापुरातील ‘पीएच प्रोग्रेसिव्ह फार्मर प्रोड्यूसर' कंपनीचा उपक्रम

पुणे : लॉकडाऊच्या काळात शहरातील नागरिकांना भाजीपाल्याचा तुटवडा भासत आहे, तर दुसरीकडे शेतकऱ्यांचा शेतमाल शेतातच सडत आहे. यातून मार्ग काढत इंदापूर (जि. पुणे) येथील पीएच प्रोग्रेसिव्ह फार्मर प्रोड्यूसर कंपनीने शहरातील सोसायट्यांना थेट भाजीपाला पुरविण्याचा उपक्रम सुरू केला. त्याद्वारे विविध भागातील ५२ सोसायट्यांना सर्व प्रकारचा भाजीपाला, फळे, गहू, ज्वारी व गव्हाचे पीठ आदींचा पुरवठा केला जात आहे. या उपक्रमातून दररोज साधारणत: एक टन मालाचा पुरवठा होतो. यातून आत्तापर्यंत ९ ते १० लाखांची उलाढाल झाली आणि बाजार समित्या, आडते, व्यापारी अशी मध्यस्थ यंत्रणा टाळली गेल्याने कंपनीला एरवीपेक्षा अधिक नफा मिळवता आल्याचे कंपनीचे संचालक तात्यासाहेब फडतरे यांनी सांगितले. लॉकडाऊनमुळे नाशवंत शेतमालासाठी पुरेशी वाहतूक व्यवस्था नसल्याने पुण्यातील बाजारपेठा, किरकोळ विक्रीची दुकाने बंद आहेत. दुसरीकडे काढणीस आलेला माल शेतातच फेकून देण्याची वेळ आल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले. शहरातील लोकांना शेतमालाचा तुटवडा भासत होता. यातूनच इंदापूर (जि. पुणे) येथील पीएच फार्मर प्रोड्युसर कंपनीने उपक्रम राबवण्यास सुरूवात केली. कंपनीचे अध्यक्ष नंदकुमार फडतरे, सचीव प्रमोद फडतरे आणि संचालक तात्यासाहेब फडतरे यांच्या कल्पनेतून तालुक्यातील वडापुरी, रामवाडी, वरकुटे परिसरातील शेतकऱ्यांकडून दर्जेदार भाजीपाला खरेदी करण्यास सुरवात केली. पंचवीस मार्चपासून हा भाजीपाला पॅकींगद्वारे शहरातील सोसायट्यांना आठवडाभर पुरेल एवढ्या प्रमाणात उपलब्ध करून दिला जातो. भाजीपाल्यांमध्ये ४०० रुपये आणि ३०० रुपयांचे पॅकींग उपलब्ध आहे. मागणीनुसार फळे, गहू, ज्वारीचे पीठ, ज्वारीपासून तयार केलेले उपपदार्थ देखील उपलब्ध करून देण्यात येतात. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या अनुषंगाने भाजीपाला खरेदी, विक्री करताना पुरेशी घेतली जाते.  ऑनलाईन पद्धतीने व्यवहार भाजी खरेदी करणाऱ्या ग्राहकांकडून रोख पैसे स्वीकारले जात नाहीत, तर ‘गुगल पे’ किंवा ‘फोन पे’सारख्या ऑनलाईन सेवांद्वारे व्यवहार केले जातात. ही सर्व रक्कम बॅंकेच्या खात्यात जमा झाल्यानंतर शेतकऱ्यांना मालाचे पैसे दिले जातात. पॅकेजिंग, वाहतुकीचा खर्च वजा शिल्लक राहिलेला नफा सभासदांच्या खात्यावर ऑनलाईन पद्धतीनेच जमा केला जातो.

विविध पॅकिंगमध्ये होते विक्री भाजीपाला बास्केट - दर ४०० रुपये यातील शेतमाल कांदा १ किलो, बटाटा १ किलो, वांगी ५०० ग्रॅम, टोमॅटो ५०० ग्रॅम, आले १०० ग्रॅम, भेंडी ५०० ग्रॅम, मिरची २५० ग्रॅम, कोथिंबीर  १ जूडी, लसूण १०० ग्रॅम, गवार २५० ग्रॅम, लिंबू ५ नग, बीट एक नग, भावनगरी मिरची २५० ग्रॅम, दोडका २५० ग्रॅम, दूधी भोपळा १ नग, कोबी १ नग, मेथी १ जुडी, तोंडली २५० ग्रॅम. जैन भाजीपाला बास्केट - दर ३०० रुपये वांगी ५०० ग्रॅम, टोमॅटो ५०० ग्रॅम, आले १०० ग्रॅम, भेंडी ५०० ग्रॅम, मिरची २५० ग्रॅम, कोथिंबीर १ जूडी, गवार २५० ग्रॅम, लिंबू ५ नग, बीट एक नग, भावनगरी मिरची २५० ग्रॅम, दोडका ५०० ग्रॅम, दूधी भोपळा १ नग, कोबी १ नग, मेथी १ जुडी, तोंडली २५० ग्रॅम. फळे बास्केट - दर ३०० रुपये. डाळींब २ नग, केळी ६ नग, चिक्कू ६ नग, द्राक्षे ५०० ग्रॅम, खरबूज १ नग, मोसंबी ७ नग ज्वारीचे उपपदार्थ बास्केट - दर ४०० रुपये ज्वारी पोहे २५० ग्रॅम, ज्वारी रवा ४०० ग्रॅम, नाचणी रवा ४०० ग्रॅम, रागी इडली मिक्स २०० ग्रॅम, रागी डोसा मिक्स २०० ग्रॅम, विविध कडधान्यांचे पीठ २०० ग्रॅम, विविध कडधान्यांची डाळ ४०० ग्रॅम  पीठ : खपली गहू पीठ ८० रुपये किलो, गहू पीठ ५० रुपये किलो, ज्वारी पीठ ५० रुपये किलो. प्रतिक्रिया... शेतात पिकणारा भाजीपाला वाया जाण्यापेक्षा कंपनीच्या माध्यमातून शहरातील सोसायट्यांपर्यंत पोचविण्याचा निर्णय घेतला. यातून औंध, बाणेर, मांजरी, हडपसर, मगरपट्टा यासह पुणे शहर परिसरातील ८२६ सोसायट्यांनी मागणी नोंदविली. एकाच वेळी २५ किंवा त्यापेक्षा अधिक पॅकिंग घेणाऱ्या ४५ सोसायट्यांना भाजीपाला पुरविण्याचा निर्णय घेतला. यातून लॉकडाऊनच्या काळात शेतकऱ्यांना हक्काची बाजारपेठ मिळाली आहे. - तात्यासाहेब फडतरे,  (संपर्क- ९४०४३२७८५३) 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com