पीएच.डी. प्रवेश परीक्षा उद्यापासून सुरू

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुणे   ः राज्यातील चारही कृषी विद्यापीठांतर्गत असलेल्या सहा विद्याशाखांमध्ये आचार्य (पीएच.डी.) पदवी अभ्यासक्रमासाठी येत्या गुरुवारी (ता. १०) प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. ही प्रक्रिया २० नोव्हेंबरपर्यंत सुरू राहील. विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज करण्यासाठी १९ ऑक्टोबर ही अंतिम मुदत असून, अंतरिम गुणवत्ता यादी २४ ऑक्टोबरला प्रसिद्ध केली जाणार आहे, अशी माहिती कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या सूत्रांनी दिली.

राज्यातील चारही कृषी विद्यापीठांतर्गत पीएच.डी. अभ्यासक्रम पाच ठिकाणी राबवला जातो. राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत ८४, अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठांतर्गत ५६, परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत ४४ आणि दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठांतर्गत ४७ अशी एकूण २३१ जागांची प्रवेश क्षमता आहे. आचार्य पदवी अभ्यासक्रम हा तीन वर्षे कालावधीचा आहे. यामध्ये कृषी १७४, गृहविज्ञान ५, मत्स्यविज्ञान ११, अन्नतंत्रज्ञान २, कृषी जैवतंत्रज्ञान ३ आणि कृषी अभियांत्रिकी ३६ अशी प्रवेश क्षमता असून, सहा विद्याशाखांमध्ये प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

आचार्य पदवी अभ्यासक्रमांतर्गत भारतीय कृषी संशोधन परिषदेचे मानांकन नसलेल्या विभागाची यादी प्रवेश माहिती पुस्तिकेतील परिशिष्ट अ येथे नमूद करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने हरकत नोंदीचा कालावधी २९ ते ३१ ऑक्टोबर आहे. अंतिम गुणवत्ता यादी ४ नोव्हेंबरला प्रसिद्ध करण्यात येणार आहे. पहिल्या प्रवेश फेरीची यादी ७ नोव्हेंबर आणि दुसऱ्या प्रवेश फेरीची यादी १४ नोव्हेंबरला प्रसिद्ध करण्यात येणार आहे. १९ व २० नोव्हेंबरला जागेवरील प्रवेशफेरी राबविण्यात येणार आहे. 

प्रवेश प्रक्रिया, कार्यपद्धती, आरक्षण आदी माहिती असलेली प्रवेश माहिती पुस्तिका http://www.mcaer.org/ maha-agriadmission.in या संकेतसंकेत स्थळावर उपलब्ध आहे. प्रवेशासाठी इच्छुक उमेदवारांनी संकेतस्थळावरून प्रवेश माहिती पुस्तिका प्राप्त करून त्यातील सूचनांचे, कार्यपद्धतीचे नीट आकलन करून संकेतस्थळावर अचूक प्रवेश अर्ज दाखल करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com