अॅग्रोवन सरपंच महापरिषद २०१८ क्षणचित्रे
रविवार, 25 नोव्हेंबर 2018अॅग्रोवन सरपंच महापरिषद
२४ नोव्हेंबर २०१८ क्षणचित्रे
अॅग्रोवन सरपंच महापरिषद
२४ नोव्हेंबर २०१८ क्षणचित्रे
‘कृषिकेंद्रित ग्रामविकासासाठी सरपंचांसाठी सुरू करण्यात आलेले देशातील पहिले व्यासपीठ’ अशी ख्याती मिळवणाऱ्या ‘सकाळ अॅग्रोवन’च्या आठव्या सरपंच महापरिषदेला श्री क्षेत्र आळंदीत शनिवारी अमाप उत्साहात सुरवात झाली. आळंदी येथील या ग्राममंथनात उच्चशिक्षित, युवा सरपंच सहभागी झाले. विशेष म्हणजे गावच्या आदर्श कारभारीण असलेल्या महिला सरपंच वही-पेन, डायरी या सामग्रीसह सकाळपासून ग्रामविकासाच्या नोंदी टिपत होत्या. आपल्या गावशिवारातील दुष्काळाचे मळभ दूर करण्यासाठी दिशादर्शक माहितीसाठी शुक्रवारी (ता. २३) मध्यरात्री आळंदीत सरपंच दाखल होत होते. त्यानंतर पुन्हा पहाटेपासून सरपंचांची रीघ लागली. सरपंचांच्या स्वागतासाठी आळदींच्या चारही दिशांना मोठे ‘फ्लेक्स’ लावण्यात आले होते. यातील शनिवारची (ता.२४) काही क्षणचित्रे...