Agriculture news in Marathi Pick up fruit trees in custard apple orchards | Page 2 ||| Agrowon

सीताफळ बागांना फळमाशीचा विळखा

टीम अॅग्रोवन
सोमवार, 2 नोव्हेंबर 2020

सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये सतत झालेला पाऊस, हवेतील वाढती आर्द्रता यांचा परिणाम सीताफळ बागांवर झाला आहे. पुणे जिल्ह्यातील सुमारे दीड हजार हेक्टरहून अधिक बागा फळमाशीच्या विळख्यात सापडल्या आहेत. त्यामुळे उत्पादनात २० ते ३० टक्केहून अधिक घट येत असून, सीताफळ बागायतदारांचे एकरी सुमारे २०० ते ३०० किलो नुकसान झाल्याची स्थिती आहे. त्यामुळे सीताफळ उत्पादक शेतकरी चांगलाच अडचणीत आल्याची स्थिती आहे.

पुणे ः सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये सतत झालेला पाऊस, हवेतील वाढती आर्द्रता यांचा परिणाम सीताफळ बागांवर झाला आहे. पुणे जिल्ह्यातील सुमारे दीड हजार हेक्टरहून अधिक बागा फळमाशीच्या विळख्यात सापडल्या आहेत. त्यामुळे उत्पादनात २० ते ३० टक्केहून अधिक घट येत असून, सीताफळ बागायतदारांचे एकरी सुमारे २०० ते ३०० किलो नुकसान झाल्याची स्थिती आहे. त्यामुळे सीताफळ उत्पादक शेतकरी चांगलाच अडचणीत आल्याची स्थिती आहे.

पुणे जिल्ह्यात सीताफळाचे सुमारे ३० ते ३५ गावांमध्ये सुमारे १ हजार ७३७.८४ हेक्टरवर उत्पादन शेतकरी घेतात. पुंरदर तालुक्यातील सोनोरी, दिवे, काळेवाडी, झेंडेवाडी, गुरोळी, सिंगापूर, पिंपळे, वाघापूर, राजेवाडी, माळशिरस, जेजुरी, वाल्हा, परिंचे, पांगारे, बोपगाव, सासवड, वाळूंज, शिवरी, बेलसर, खळद, खानावडी, पारगाव अशा गावांमध्ये फळमाशीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसून येतो.

सीताफळांवर पडत असलेल्या फळमाशीमुळे शेतकऱ्यांना वारंवार फवारणी करावी लागत आहे. तरीही फळमाशी आटोक्यात येत नसल्याची स्थिती आहे. फळमाशीच्या प्रादुर्भावामुळे फळे काळे पडणे, फळगळ होणे, फळ सडणे, फळांमध्ये अळ्या तयार होणे आदी समस्यांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे सीताफळ उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.  

फळमाशीमुळे सीताफळाचे अतोनात नुकसान होत असून, ग्राहकांपर्यंत चांगल्या प्रतीचा माल पोचवण्यात शेतकऱ्यांना मोठी अडचण निर्माण झाली आहे. त्यातच फळांमध्ये अळ्या निघत असल्याने ग्राहकही ते खरेदी करण्याकडे काणाडोळा करत आहेत. तसेच ढगाळ हवामान व कमी सूर्यप्रकाश यामुळे सीताफळ पिकांच्या झाडाची प्रकाश संश्लेषण क्रिया घटून फळाच्या आकारात घट झाली आहे. त्यामुळे बाजारभाव कमी मिळत आहे. कमी आकाराच्या फळांना बाजारात अत्यल्प मागणी आहे. मोठ्या आकाराचे फळ तयार होत नसल्याने कमी आकाराची फळे लवकर पिकत आहेत. त्यामुळे सीताफळ उत्पादक शेतकऱ्यांपुढे मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे.

माझ्याकडे एक एकरावर सीताफळ बाग आहे. त्यामध्ये सुमारे २००-२५० झाडे आहेत. फळमाशीमुळे वेळोवेळी फवारण्या चालू होत्या. दरवर्षी एकरी दीड ते दोन लाख रुपयांपर्यंत सीताफळातून उत्पन्न घेतो. मात्र यंदा फळमाशीमुळे उत्पादनात मोठी घट झाली असून एकरी सुमारे ५० हजार हजार रुपयांपर्यंत नुकसान झाले आहे.
- नितीन इंगळे, सीताफळ उत्पादक, वाळुंज, ता. पुंरदर  

जास्त पावसामुळे फळमाशीचा प्रादुर्भाव वाढला आहे. फवारणीनंतरही सततच्या पावसामुळे काहीच परिणाम झाला नाही. त्यामुळे सीताफळ पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. फळाचा आकार कमी झाला असून, कमी आकाराच्या फळांना बाजारभावदेखील कमी मिळत आहे. यामुळे उत्पन्नातही घट झाली आहे.
- निवृत्ती फाटे, सीताफळ उत्पादक, वडकी, ता. पुरंदर,  

आत्माअंतर्गत फळमाशीच्या नियंत्रणासाठी २७ गावांत एकूण २७० प्रात्यक्षिक शेतकऱ्यांच्या शेतावर राबविण्यात आली आहेत. यामध्ये प्रति शेतकरी दहा कामगंध सापळे असे एकूण १६२० सापळे मोफत देण्यात आले आहेत. तालुक्यात मोठ्या प्रमाणात लागवड असल्याने किडीचे सार्वजनिकरित्या नियंत्रण मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना कमी खर्चाचे कामगंध सापळे घरीच तयार करून वापरावे, असे आवाहन केले आहे.
- स्मिता वर्पे, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक, आत्मा, पुरंदर


इतर अॅग्रो विशेष
सर्वंकष आढावा घेऊन नुकसान भरपाई जाहीर...रत्नागिरी : ‘‘तुम्हाला पायावर उभे करण्यासाठी...
बहुपीक पद्धतीतून साधले नफ्याचे सूत्रकोल्हापूर जिल्ह्यातील शेंडूर (ता. कागल) येथील...
पावसाची उघडीप; पूरस्थिती कायम पुणे : कोकण, सातारा, कोल्हापूर, सांगली, पुण्यासह...
सांगलीत चौदा हजार जनावरांचे स्थलांतरसांगली : जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पूर पट्यातील...
कोसळलेला प्रसंग मोठा; तुमचं पुनर्वसन...मुंबई ः तुमच्यावर कोसळलेला प्रसंग मोठा आहे....
पावसाचा जोर पंधरा दिवस कमी राहण्याची...पुणे : मुसळधार पावसाने रत्नागिरी, रायगडसह,...
नऊ जिल्हे अतिवृष्टिबाधित मुंबई ः कोकण आणि पश्‍चिम महाराष्‍ट्रातील ९ जिल्हे...
वाशीम जिल्ह्यात ६९९ कोटींचे पीककर्ज वाटपवाशीम : जिल्ह्यात या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना...
कोल्हापुरात पुराची भीती कायम कोल्हापूर : पावसाने शनिवारी (ता.२४) दुपारपर्यंत...
उपलोकायुक्त, सचिव, आयुक्तांनी सांगूनही...पुणे ः जलयुक्त शिवार अभियानावर खर्च दाखवलेल्या...
शेतीला मिळाली दुग्ध प्रक्रियेची जोडघोटावडे (ता. मुळशी, जि. पुणे) प्रियांका जालिंदर...
तुळशी धरणक्षेत्रात उच्चांकी ८९५...कोल्हापूर : जिल्ह्यातील तुळशी (ता.राधानगरी)...
टीका, आरोपांचा समाचार; दुसऱ्या दिवशीही...नवी दिल्ली : संयुक्त किसान मोर्चाने आयोजित शेतकरी...
कोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची...पुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या...
ढगफुटीने हाहाकारपुणे : पश्‍चिम महाराष्ट्रात मॉन्सूनच्या पावसाने...
सांगलीत नदीकाठच्या नागरिकांचे स्थलांतर सांगली ः चांदोली धरणक्षेत्रात अतिवृष्टी सुरू...
पीक विम्यासाठी ७२ तासांच्या आत नुकसान...पुणे ः राज्याच्या काही भागात अतिवृष्टी, पुराने...
कोल्हापुरात पावसाचे थैमान, पुराचा विळखा कोल्हापूर : जिल्ह्यात पावसाचा हाहाकार शुक्रवारीही...
तेवीस वर्षीय युवकाची पोल्ट्रीत दमदार...शिवपूर (जि. अकोला) येथील शुभम महल्ले या तरुणाने...
शेतीसह डाळी, बेसन पीठ प्रक्रिया ठरली...करकंब (ता. पंढरपूर, जि. सोलापूर) येथील सुधीर...