Agriculture news in marathi Pick up the grain at the center in Gadchiroli district | Agrowon

गडचिरोली जिल्ह्यातील केंद्रावरील धानाची उचल करा

टीम अॅग्रोवन
शनिवार, 2 मे 2020

गडचिरोली ः जिल्ह्यात हमीभावाने खरेदी करण्यात आलेल्या धानाची पावसाळ्यापूर्वी उचल करावी, अशी मागणी आमदार डॉ. देवराव होळी यांनी केली आहे. आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांच्या केंद्रावर हे धान पडून आहे. वेळीच उचल न झाल्यास ते खराब होण्याची शक्‍यता असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 

गडचिरोली ः जिल्ह्यात हमीभावाने खरेदी करण्यात आलेल्या धानाची पावसाळ्यापूर्वी उचल करावी, अशी मागणी आमदार डॉ. देवराव होळी यांनी केली आहे. आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांच्या केंद्रावर हे धान पडून आहे. वेळीच उचल न झाल्यास ते खराब होण्याची शक्‍यता असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 

या संदर्भात त्यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार व जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली. गडचिरोली जिल्ह्यात शासकीय केंद्रावर धानाची मोठ्या प्रमाणावर खरेदी करण्यात आली. १८३५ रुपयांचा हमीभाव तसेच ७०० रुपये बोनस व सानुग्रह यामुळे दर २५०० रुपयांवर पोचले होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी हमीभाव केंद्रावर धान विकण्यासाठी गर्दी केली. 

सध्या हे धान खरेदी केद्रावर पडून आहे. त्यासोबतच बारदाना तर कधी साठवणुकीचा प्रश्‍न निर्माण झाल्याने बऱ्याच शेतकऱ्यांना आपले धान विकता देखील आले नाही. याची दखल घेत शेतकऱ्यांकडील धानाची हमीभावाने खरेदी व्हावी. त्यासोबतच केंद्रावरील धानाची पावसाळ्यापूर्वी उचल करावी, अशी मागणी आमदार होळी यांनी केली आहे. 


इतर ताज्या घडामोडी
काही भागात पावसाच्या उघडिपीची शक्यता महाराष्ट्रावर बुधवार (ता.२३) पर्यंत  १००४...
राज्य द्राक्ष बागायतदार संघाची ...नाशिक: महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार...
पांगरी परिसरात पिकांवर आस्मानी संकटपांगरी, जि. सोलापूर ः पांगरी (ता. बार्शी) परिसरात...
शेतमाल स्थानिक भागात विकला जाणार : भुजबळनाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यात आदिवासी समाज...
परभणी, हिंगोली जिल्ह्यात पावसाचे थैमाननांदेड : मराठवाड्यातील परभणी, हिंगोली जिल्ह्यात...
नाशिक विभागात कांदा लागवडीत ८ हजार...नाशिक : चालू वर्षी खरीप कांद्याच्या लागवडीपूर्वी...
रावेर तालुक्यात सीएमव्ही नुकसानीचे...जळगाव ः कुकुंबर मोसॅक विषाणूमुळे (सीएमव्ही)...
हिंगोली जिल्ह्यात सोयाबीनच्या पिकाला...हिंगोली : जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांपासून...
मराठवाड्यात अतिपाऊस खरीप पिकांच्या...औरंगाबाद : मराठवाड्यात गत काही दिवसांपासून...
धुळ्यात लाळ्या खुरकूत रोग प्रतिबंधक...धुळे : धुळे जिल्ह्यात ३० सप्टेंबरपर्यंत...
पावसाचा डाळींब पिकाला तडाखाआटपाडी, जि. सांगली ः अवर्षण प्रवण असलेल्या आटपाडी...
मायक्रो फायनान्सचे चक्रव्यूह...मुंबई : ग्रामीण भागातील सूक्ष्म वित्त पुरवठा...
नगर जिल्ह्यात अतिवृष्टीचा चार हजार...नगर ः यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीपासून चांगला...
कोकण कृषी विद्यापीठात बांबू कार्यशाळेचे...दापोली, जि. रत्नागिरी : जगभरात दरवर्षी १८...
अकोला जिल्ह्यातील सहा खत विक्रेत्यांचे...अकोला ः या हंगामात खत विक्रीत मोठ्या प्रमाणात...
सदोष बियाणेमुळे भेंडी बीजोत्पादक अडचणीतबुलडाणा ः लोणार तालुक्यातील शेतकऱ्यांनी या...
भातपीक कापणीत पावसाचा अडसररत्नागिरी : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने...
ठाण्यातील १४ हजार हेक्टर पिकांचा काढला...मुंबई : ठाणे जिल्हा कृषी विभागाने यंदा पंतप्रधान...
औरंगाबादमध्ये कांदा ३०० ते २३०० रूपयेऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
आरोग्यदायी विड्याचे पानकोणत्याही धार्मिक कार्यात, पूजेच्या ठिकाणी...