लोणच्याच्या कैरीचे उत्पादन घटले

चालू वर्षीच्या हंगामात नैसर्गिक आपत्तीमुळे लोणच्याच्या कैऱ्यांचे उत्पादन घटल्याने तुरळक आवक होत असल्याची माहिती नाशिक बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. त्यामुळे या कैरीच्या दरात वाढ झाली आहे.
mango
mango

नाशिक : चालू वर्षीच्या हंगामात नैसर्गिक आपत्तीमुळे लोणच्याच्या कैऱ्यांचे उत्पादन घटल्याने तुरळक आवक होत असल्याची माहिती नाशिक बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. त्यामुळे या कैरीच्या दरात वाढ झाली आहे. यामुळे लोणचे अजूनच आंबट झाले असल्याची स्थिती आहे.  पहिला पाऊस पडल्यानंतर लोणचे बनविण्याची लगबग सुरू होते. मात्र चालू वर्षी नैसर्गिक आपत्तीमुळे कैऱ्यांच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाल्याने आवक घटली आहे. त्यातच मध्यंतरीच्या काळात लॉकडाउनमुळे बाहेरून मागणीनुसार पुरवठा होऊ शकला नाही. त्यामुळे मागणीनुसार चांगल्या कैऱ्यांची काही शेतकऱ्यांनी थेट बांधावर विक्री केली. मात्र अलीकडे वाहतूक सुरळीत असली तरी आवक तुरळक असल्याने लोणच्याच्या कैऱ्यांच्या दरात तेजी आली आहे. चालू वर्षी नाशिक बाजार समितीमध्ये लोणच्याच्या कैऱ्यांची आवक जेमतेम झाली आहे. एकंदरीत नैसर्गिक आपत्तीसह लॉकडाउनचा परिणाम आवकेवर पाहायला मिळत आहे. सध्या स्थानिक ठिकाणावरून येणाऱ्या कैऱ्यांची आवक थांबली असून गुजरात राज्यातून व्यारा, बलसाड या भागातून या कैऱ्यांची आवक होत आहे. 

निसर्ग चक्रीवादळामुळे नुकसान जिल्ह्यातील शेतकरी कैऱ्या बाजारात विक्रीसाठी आणतात. मात्र निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यात नाशिक, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, निफाड, येवला, सिन्नर या तालुक्यातील कैऱ्यांचे नुकसान झाले आहे. लोणच्याच्या कैऱ्याबरोबर लोणच्यासाठी लागणारा मसाला, मातीचे मडके व बरण्या मिळवण्यासाठी यंदा शोधाशोध करावी लागत आहे. तसेच लोणच्याच्या कैऱ्या फोडणारे कमी असून त्यांनी प्रतिकिलोमागे कैरी फोडण्याच्या दरात वाढ केली आहे. कैऱ्यांचे दर (रुपये, शेकडा) लहान आकाराची कैरी:  २५० ते ३०० मोठी कैरी : ४०० ते ४५० प्रतिकिलो दर असे  घाऊक बाजारातील पूर्वीचे दर:  २० ते २५ रुपये  सध्याचे दर:  ३५ ते ४५ रुपये  किरकोळ विक्रीसाठी दर:  ६० ते ८० रुपये  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com