agriculture news in marathi, Pikvima protection has uneffective | Page 2 ||| Agrowon

येवल्यात पीकविमा सुरक्षेचे कवच ठरले कुचकामी
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 27 जुलै 2018

पीकविमा काढला तरी जाचक अटी दाखवून शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपासून वंचित ठेवले जाते. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये उदासीनता आहे. पीकविमा एजंटची गावोगाव नियुक्ती केल्यास सर्व शेतकऱ्यांना पीकविमा संकल्पना समजेल. नुकसानभरपाई देताना अटी शिथिल करणे गरजेचे आहे.
- बापूसाहेब पगारे, शेतकरी संघटना नेते

येवला : अवकाळी पाऊस, गारपीट, अवर्षण, दुष्काळ या संकटकाळात पीकविमा नक्कीच आधारवड मानला जातो; पण विम्याचे हे कवच केवळ गाजर असून, कंपन्या मालामाल करणारे असल्याने शेतकरी याकडे काणाडोळा करत आहेत. तालुक्यात तर यंदा अद्याप एकानेही पिकाचा विमा उतरवलेला नसल्याचे धक्कादायक वास्तव आहे. खरिपात पीककर्ज न मिळाल्यानेदेखील आकडे घटले आहेत, हेही कारण यामागे आहे.
 
खरीप हंगामातील भात, ज्वारी, बाजरी, नाचणी, मका, तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमूग, तीळ, सूर्यफूल, कारळे, कापूस, कांदा इत्यादी पीक उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार आहे. बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ही योजना ऐच्छिक तर कर्जदारांना सक्तीचा आहे. पण विमा भरला, पिकांचे नुकसान झाले, मात्र हाती एक कवडीही आली नसल्याचा अनुभव शेतकऱ्यांनी घेतला आहे.
वर्षानुवर्षे भरलेले पैसे वाया जात असल्याचा अनुभव असल्याने शेतकरी आता याकडे उघडपणे काणाडोळा करत आहेत. तालुक्यात विम्याचा लाभ घेऊ शकणारे सभासद सुमारे २४ हजार आहेत.
जिल्हा बँकां अडचणीत अडकल्याने शेतकऱ्यांना खरीप हंगामात पीककर्ज मिळालेले नाही. याचा पीकविमा योजनेला मोठा फटका बसला आहे. मुळात पीककर्ज घेताना कर्जातूनच विम्याची रक्कम कपात केली जाते; पण कर्जच नाही म्हणून विमा नसल्याचे चित्र आहे. खरीप पिकांचे संरक्षणाचे कवच कवडीमोल ठरत आहे.

जिल्ह्यातूनच होतोय काणाडोळा
२०१६ मध्ये जिल्ह्यातील ८९ हजार ३३६ शेतकऱ्यांनी पीकविमा घेतला होता. त्यापैकी १ हजार ६४१ शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळाला. तर २०१७ मध्ये जिल्ह्यात ७ लाख ९७ हजार ६९७ खातेदार शेतकरी असून, यापैकी केवळ ४ हजार ६४२ शेतकऱ्यांनीच पीकविम्याचा लाभ घेतला आहे. म्हणजेच ७ लाख ९३ हजार शेतकऱ्यांनी याकडे पाठ फिरवली होती. यंदाचे आकडे तर अधिकच गंभीर राहणार, असेच चित्र आहे.

 
 

इतर बातम्या
थंडीचे आगमन लांबणारपुणे   : राज्यात मॉन्सूनोत्तर पाऊस पडत...
पुणे जिल्हयात हलक्या ते मध्यम पावसाची...पुणे : गेल्या दोन दिवसांपासून पावसासाठी पोषक...
मंगळ, चंद्रसदृश मातीमध्ये पिकांचे...नासा या अमेरिकन अवकाश संशोधन संस्थेने चंद्र आणि...
पुणे जिल्ह्यात तीन लाख हेक्टरवर रब्बी...पुणे : मॉन्सूनच्या अंतिम टप्प्यातील पावसाने...
नगर जिल्हा परिषदेमध्ये दूरध्वनीवरील...नगर  : पाणी येत नाही. शिक्षक शाळेत उशिरा...
विधानसभा निवडणुकीसाठी प्रचारतोफा...मुंबई : चौदाव्या विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी...
घाटशीळ पारगाव प्रकल्प कोरडानगर : जिल्ह्यात यंदा पावसाळा संपत आला तरी अजून...
सातारा जिल्ह्यात सर्वदूर पाऊससातारा : जिल्ह्यात शुक्रवारी (ता.१८) सर्वदूर...
उमेदवारी देऊन केलेली चूक सुधारा : पवारसातारा : ‘‘वरुणराजानेही आपल्याला आशीर्वाद दिले...
राज्यात सुगीची वेळ, अन्‌ पावसाचा खेळपुणे  : अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र...
मराठवाड्यातील ३३५ मंडळांत पाऊस; खरीप...औरंगाबाद, परभणी : परतीच्या पावसाने मराठवाड्यातील...
काकडा परिसरात सोयाबीन काढणीच्या...काकडा, अमरावती ः परिसरात सोयाबीन...
अकोला येथे पावसाळी वातावरणाने...अकोला ः गेल्या २४ तासांपासून या भागात...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात वावडिंग खरेदी सुरू सिंधुदुर्ग  ः बहुउपयोगी वावडिंग खरेदीला...
पट्टणकोडोलीला ‘इट्टल-बिरोबाच्या नावानं...पट्टणकोडोली, जि. कोल्हापूर  : ‘इट्टल-...
विश्रांतीनंतर सोलापुरात पुन्हा सर्वदूर...सोलापूर  ः गेल्या काही दिवसांच्या...
शेतकरी, जनतेच्या प्रश्नांची उत्तरे...नगर  : राज्यात पाच वर्षांत १६ हजार शेतकरी...
महायुतीला ऐतिहासिक विजय मिळेल ः...मुंबई ः केंद्र आणि महाराष्ट्रातील भाजप-शिवसेना...
आपण विजयाचा जल्लोष साजरा करू ः...नागपूर : मतदानाचा दिवस युद्धदिन समजून...
भाजप-शिवसेनेने पाच वर्षे  फक्त थापा...मुंबई : पाच वर्षे ज्यांनी विविध आश्वासने...