agriculture news in marathi, Pilbag in place of damaged banana | Agrowon

नुकसानग्रस्त केळीच्या जागी पिलबागा
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 5 जुलै 2018

जळगाव ः जिल्ह्यात वादळग्रस्त केळीबागांमध्ये अनेक शेतकऱ्यांनी पिलबागांचे नियोजन केले आहे.  नुकसान कमी खर्चात भरून काढण्याचा प्रयत्न रावेर, चोपडा, यावल भागांतील शेतकऱ्यांनी केला आहे. जिल्ह्यात मे व जून महिन्यांत वादळाचा मोठा फटका बसला. रावेरात सुमारे १८०० हेक्‍टरवरील केळी १ ते ३ जूनदरम्यानच्या पावसात जमीनदोस्त झाली. नंतरही वादळ झाले. त्यात चोपडा, यावल तालुक्‍यातील बागांना फटका बसला. जिल्ह्यात एकूण

जळगाव ः जिल्ह्यात वादळग्रस्त केळीबागांमध्ये अनेक शेतकऱ्यांनी पिलबागांचे नियोजन केले आहे.  नुकसान कमी खर्चात भरून काढण्याचा प्रयत्न रावेर, चोपडा, यावल भागांतील शेतकऱ्यांनी केला आहे. जिल्ह्यात मे व जून महिन्यांत वादळाचा मोठा फटका बसला. रावेरात सुमारे १८०० हेक्‍टरवरील केळी १ ते ३ जूनदरम्यानच्या पावसात जमीनदोस्त झाली. नंतरही वादळ झाले. त्यात चोपडा, यावल तालुक्‍यातील बागांना फटका बसला. जिल्ह्यात एकूण

तीन हजार ८०० हेक्‍टर केळीचे नुकसान झाले. यात कापणीवरील बागांचा अधिक समावेश असून, या बागांमध्ये पिलबाग आहेत. नुकसानग्रस्त केळीची झाडे कापून ती बागेबाहेर फेकण्यासाठी मजुरी लागली. घडही पशुधनाला खाऊ घालावे लागले. ६० ते ७० टक्‍क्‍यांवर नुकसान अनेक शेतकऱ्यांना झाले. ते भरून काढण्यासाठी नुकसानग्रस्त बागेत फुटवे वाढवून त्याचा पिलबाग घेण्याचा पर्याय शेतकऱ्यांनी शोधला आहे.
जिल्ह्यात एरवी पिलबाग फक्त रावेरात घेतले जातात. त्याचा फारसा खर्च नाही. नव्याने कंद आणणे, ठिबक टाकणे, शेणखत पसरविणे, अधिकची रासायनिक खते देणे हा खर्च नाही. झाड कापून त्याच्या नजीक फुटव्यांचे संगोपन करायचे आहे. त्यासाठी अधिकचा खर्च नाही. त्यात नुकसानग्रस्त झाडांचे अवशेषही अधिक असून, त्याचे आच्छादन करण्यातस आले आहे.

शिवाय फुटव्यांची वाढ जोमात असते. नऊ ते १० महिन्यांत हे पीक हाती येईल. पिलबागांना दरही नवतीप्रमाणेच मिळतात. पुढील मार्च महिन्यापर्यंत कापणी सुरू होईल, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

वादळाचा मोठा फटका केळीला बसला. त्यातून सावरण्यासाठी शेतकऱ्यांनी पिलबागांचे नियोजन केले. नुकसानग्रस्त घड व झाडे कापून त्यांची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावली. आता पिलबागांची वाढ जोमात आहे.
- अतुल पाटील,
केळी उत्पादक, केऱ्हाळे, ता. रावेर

इतर ताज्या घडामोडी
...अन् आमचं स्वप्नच पुरानं खरडून नेलं पटवर्धन कुरोली, पंढरपूर, जि. सोलापूर : आधीच दोन...
जायकवाडी कालव्याच्या पाण्यामुळे पीक...परभणी : जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून...
एमएआयडीसी’च्या सक्षमीकरणासाठी...मुंबई : महाराष्ट्र कृषी उद्योग विकास...
उस्मानाबाद जिल्ह्यात राष्ट्रीयीकृत...उस्मानाबाद  ः खरीप हंगामासाठी पीककर्ज वाटपात...
गंगापूर धरण क्षेत्रात पावसाचे पुनरागमन...नाशिक  : गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात...
कृषी सहायकांच्या अडचणी न सोडविल्यास २०...अकोला ः अमरावती विभागातील कृषी सहायक ते कृषी...
हवामान बदलाचा शेती, शेतकऱ्यांच्या ...नांदेड  ः हवामान बदलामुळे येत असलेल्या...
अमरावती कृषी विभागातील ३२ टक्के पदे...अमरावती  :  रिक्‍त पदांमुळे...
शेतकरी राजकारण अन् जाती-धर्मात अडकला :...नाशिक ः शेतकऱ्यांचे प्रश्न कमी होण्यापेक्षा ते...
शिरसाईचे पाणी लाभार्थ्यांसाठी मृगजळचउंडवडी, जि. पुणे : पावसाळा सुरु होवून अडीच महिने...
विम्याचे दावे निकाली काढा; आयआरडीएआयचे...नवी दिल्ली : पुराचा फटका बसलेल्या कर्नाटक,...
उत्तर भारतात मुसळधार पाऊस सुरूचसिमला/धर्मशाला : उत्तर भारतात विशेषतः हिमालयाच्या...
आता चर्चा फक्त व्याप्त काश्‍मीरवर :...काल्का, हरियाणा : पाकिस्तानप्रती कठोर भूमिका घेत...
पुण्यात वांगी, तोंडली, गाजरासह...पुणे   ः राज्यातील पूरस्थिती...
सिंधूताई विखे पाटील यांचे निधनशिर्डी, जि. नगर : दिवंगत माजी खासदार बाळासाहेब...
महाजनादेश यात्रेला बुधवारपासून नंदूरबार...नंदुरबार ः राज्यातील पूरस्थितीमुळे स्थगित झालेली...
पुणे बाजार समिती प्रशासकपदी वर्णी...पुणे  : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे...
प्रतिकूल हवामानामुळे जुन्नर तालुक्यातील...नारायणगाव, जि. पुणे  : दोन महिन्यांपासून...
नगर जिल्ह्यातील दहा ते अकरा तालुक्यांवर...नगर  ः राज्याच्या काही भागांत जोरदार पावसाने...
पीक नुकसानीबाबत शेतकऱ्याने मांडली कृषी... कऱ्हाड, जि. सातारा ः घरात हुतं नव्हतं...