पिंपळगाव बसवंत येथे कांद्याची विक्रमी आवक

नाशिक : उन्हाळ कांदा काढणीपश्चात साठवणूक क्षमता पूर्ण झाल्यानंतर अनेक शेतकरी कांदा विक्रीसाठी बाजारात येत आहेत. लेट खरीप कांद्याच्या तुलनेत उन्हाळ कांद्याची बाजारात आवक वाढती आहे.
At Pimpalgaon Baswant Record incoming of onions
At Pimpalgaon Baswant Record incoming of onions

नाशिक : उन्हाळ कांदा काढणीपश्चात साठवणूक क्षमता पूर्ण झाल्यानंतर अनेक शेतकरी कांदा विक्रीसाठी बाजारात येत आहेत. लेट खरीप कांद्याच्या तुलनेत उन्हाळ कांद्याची बाजारात आवक वाढती आहे.  सोमवारी (ता.३)पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची ६३ हजार ३०९ क्विंटल इतकी विक्रमी आवक झाली. आजपर्यंत ही सर्वाधिक आवक असल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

जिल्ह्यातील इतर बाजार समित्यांच्या तुलनेत आवार मोठा असल्याने गर्दीचे नियंत्रण होते. यासह सर्वाधिक दिवस कामकाज व व्यापारी संख्या यामुळे खरेदीत स्पर्धा असते. त्यामुळे नाशिक विभागासह औरंगाबाद जिल्ह्यातून आवक येथे होते. जिल्ह्यातील बाजार समित्यांच्या तुलनेत येथे मिळणारा उच्चांकी व सरासरी दर सर्वाधिक आहे. यापूर्वी २६ मे २०१७ रोजी ५९,७९४ क्विंटल आवकेची विक्रमी नोंद झाली  होती. 

सोमवारी उन्हाळ कांद्याला किमान ४०० व कमाल १,७५१ ते सरासरी १,२५१ रुपये दर मिळाले. ज्यामध्ये कमाल व सरासरी दर जिल्ह्यात सर्वाधिक होते. 

दरात पुन्हा सुधारणा 

जिल्ह्यातील बाजार समित्यांचे कामकाज सुरळीत सुरू झाल्यानंतर प्रमुख बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक टिकून आहे. मात्र गेल्या तीन दिवसांत घट होऊन येथे बुधवारी (ता.५) आवक ४४ हजार ३४८ क्विंटलवर आली. मात्र दरात किंचित सुधारणा होऊन ते १२७५ रुपये झाले. तर गुरुवारी (ता.६) आवक घटल्याने पुन्हा दरात सुधारणा होऊन १४०१ रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला आहे. 

कांदा लिलावाला प्राधान्य दिले जात आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व खबरदारी घेतल्याने हे शक्य आहे. वेळेत लिलाव, रोख पैसे देण्याची पद्धत व शेतकऱ्यांना अडचण आल्यास तक्रारीचा निपटारा होत असल्याने शेतकऱ्यांची पसंती मिळत आहे. त्यामुळे हे विक्रम होत आहेत. - दिलीप बनकर, सभापती,  बाजार समिती, पिंपळगाव बसवंत, ता. निफाड.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com