Agriculture news in marathi At Pimpalgaon Baswant Record incoming of onions | Page 2 ||| Agrowon

पिंपळगाव बसवंत येथे कांद्याची विक्रमी आवक

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 7 मे 2021

नाशिक : उन्हाळ कांदा काढणीपश्चात साठवणूक क्षमता पूर्ण झाल्यानंतर अनेक शेतकरी कांदा विक्रीसाठी बाजारात येत आहेत. लेट खरीप कांद्याच्या तुलनेत उन्हाळ कांद्याची बाजारात आवक वाढती आहे.  

नाशिक : उन्हाळ कांदा काढणीपश्चात साठवणूक क्षमता पूर्ण झाल्यानंतर अनेक शेतकरी कांदा विक्रीसाठी बाजारात येत आहेत. लेट खरीप कांद्याच्या तुलनेत उन्हाळ कांद्याची बाजारात आवक वाढती आहे.  सोमवारी (ता.३)पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची ६३ हजार ३०९ क्विंटल इतकी विक्रमी आवक झाली. आजपर्यंत ही सर्वाधिक आवक असल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

जिल्ह्यातील इतर बाजार समित्यांच्या तुलनेत आवार मोठा असल्याने गर्दीचे नियंत्रण होते. यासह सर्वाधिक दिवस कामकाज व व्यापारी संख्या यामुळे खरेदीत स्पर्धा असते. त्यामुळे नाशिक विभागासह औरंगाबाद जिल्ह्यातून आवक येथे होते. जिल्ह्यातील बाजार समित्यांच्या तुलनेत येथे मिळणारा उच्चांकी व सरासरी दर सर्वाधिक आहे. यापूर्वी २६ मे २०१७ रोजी ५९,७९४ क्विंटल आवकेची विक्रमी नोंद झाली 
होती. 

सोमवारी उन्हाळ कांद्याला किमान ४०० व कमाल १,७५१ ते सरासरी १,२५१ रुपये दर मिळाले. ज्यामध्ये कमाल व सरासरी दर जिल्ह्यात सर्वाधिक होते. 

दरात पुन्हा सुधारणा 

जिल्ह्यातील बाजार समित्यांचे कामकाज सुरळीत सुरू झाल्यानंतर प्रमुख बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक टिकून आहे. मात्र गेल्या तीन दिवसांत घट होऊन येथे बुधवारी (ता.५) आवक ४४ हजार ३४८ क्विंटलवर आली. मात्र दरात किंचित सुधारणा होऊन ते १२७५ रुपये झाले. तर गुरुवारी (ता.६) आवक घटल्याने पुन्हा दरात सुधारणा होऊन १४०१ रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला आहे. 

कांदा लिलावाला प्राधान्य दिले जात आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व खबरदारी घेतल्याने हे शक्य आहे. वेळेत लिलाव, रोख पैसे देण्याची पद्धत व शेतकऱ्यांना अडचण आल्यास तक्रारीचा निपटारा होत असल्याने शेतकऱ्यांची पसंती मिळत आहे. त्यामुळे हे विक्रम होत आहेत.
- दिलीप बनकर, सभापती,  बाजार समिती, पिंपळगाव बसवंत, ता. निफाड.


इतर बातम्या
औरंगाबाद :सोयाबीनची सरासरीच्या दीडपट...औरंगाबाद : सोयाबीनची सरासरी क्षेत्राच्या दीडपट...
जळगाव जिल्ह्यात ५७ टक्के पाऊसजळगाव : जिल्ह्यात आतापर्यंत ५७ टक्के पाऊस झाला...
शनिवारपर्यंत सुरू राहणार मका, ज्वारीची...औरंगाबाद : राज्यात रब्बीतील मका व ज्वारी खरेदीला...
परभणी जिल्ह्यात पीकविमा तक्रारींचा...परभणी ः पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गंत टोल फ्री...
नाशिक जिल्ह्यात धरणसाठा ४६ टक्क्यांवरनाशिक : गत सप्ताहात जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट...
सोलापूर ःविमा कंपनी शेतकऱ्यांपर्यंत...सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात पीकविम्यासाठी भारती...
अकोला ः नैसर्गिक आपत्तीनंतर पीकविमा...अकोला ः पीकविमा हा आपत्तीच्या काळात शेतकऱ्यांना...
मराठवाड्यात एक लाख हेक्टरवर पीकनुकसानऔरंगाबाद : मराठवाड्यातील आठपैकी सहा जिल्ह्यांत...
मंगळवेढ्यात सूर्यफूल पीकविम्यातून वगळलेमंगळवेढा, जि. सोलापूर ः मंगळवेढा तालुक्यात...
कोल्हापूर : पीकविम्याच्या ऑनलाइन...कोल्हापूर : विमा योजनेत सहभागाबाबतीत राज्यात...
नाशिक : पीकविम्याबाबत तक्रारींचा पाढानाशिक : पीकविमा कंपन्यांची असक्षम यंत्रणा......
सिंधुदुर्गात कार्यालय; पण शेतकऱ्यांना...सिंधुदुर्गनगरी : विमा कंपनीचे सिंधुदुर्गनगरी येथे...
रत्नागिरी : पूरबाधित शेतकऱ्यांची...रत्नागिरी : जिल्ह्यातील नदी किनारी भागात पुरामुळे...
नांदेडमध्ये विमा कंपनीचे जिल्ह्याच्या...नांदेड : पंतप्रधान पीकविमा योजनेत जिल्ह्यासाठी...
पावसाची उसंत, सावरण्याची धडपड सुरु पुणे : पावसासाठी पोषक वातावरण नसल्याने पावसाचा...
नगर : विमा कार्यालय, हेल्पलाइन नंबरची... नगर : नुकसानीची शेतकऱ्यांना भरपाई मिळावी,...
कोल्हापूर : पूर फुटाने वाढला, इंचाने...कोल्हापूर : जिल्ह्यातील पूरस्थिती हळूहळू कमी होत...
विमा कंपन्यांचा राज्यभर सावळागोंधळ पुणे ः पंतप्रधान पीकविमा योजनेतील खासगी विमा...
कोकणात मुसळधारेची शक्यता पुणे : कोकणसह संपूर्ण राज्यात पावसाचा जोर कमी...
राजकीय नेत्यांनी पूरग्रस्त भागांचे दौरे...मुंबई : राजकीय नेत्यांनी पूरग्रस्त भागाचे दौरे...