agriculture news in marathi Pink bond warm on 60 percent cotton in Marathwada | Agrowon

मराठवाड्यात साठ टक्के कपाशीवर गुलाबी बोंड अळी

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 30 ऑक्टोबर 2020

नांदेड : ‘‘मराठवाड्यात लवकर येणारे कापूस वाण एका वेचणीत संपले. तर, काही शेतकऱ्यांनी मध्यम कालावधीमध्ये येणाऱ्या वाणाची लागवड केली होती. त्यांची दुसरी वेचणी सुरू आहे. या कपाशीवर सध्या ४० ते ६० टक्के गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव आढळून आला आहे.

नांदेड : ‘‘मराठवाड्यात लवकर येणारे कापूस वाण एका वेचणीत संपले. तर, काही शेतकऱ्यांनी मध्यम कालावधीमध्ये येणाऱ्या वाणाची लागवड केली होती. त्यांची दुसरी वेचणी सुरू आहे. या कपाशीवर सध्या ४० ते ६० टक्के गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव आढळून आला आहे.

शेतकऱ्यांनी लवकर कपाशी पिकाची काढणी करावी. फरदड ठेवू नये’’, असे आवाहन नांदेड येथील कापूस संशोधन केंद्राच्या शास्त्रज्ञांनी केले.

औरंगाबाद, जालना, बीड, नांदेड, परभणी जिल्ह्यातील कपाशी पिकाची सध्या वेचणी सुरू आहे. त्याची पाहणी नांदेड कापूस संशोधन केंद्रातील कापूस विशेषज्ञ डॉ. खिजर बेग, कापूस कीटकशास्त्रज्ञ डॉ. शिवाजी तेलंग, वनस्पती विकृती शास्त्रज्ञ डॉ. आनंद दौंडे व कृषी विद्यावेता अरविंद पंडागळे यांनी केली. यावेळी आढळून आलेल्या गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्यांनी मार्गदर्शन केले. 

हिरव्या बोंडावर गुलाबी बोंड अळीच्या नियंत्रणासाठी लिंबोळी अर्काची (५ टक्के) फवारणी करावी. ट्रायकोकार्ड उपलब्ध असलेल्या परिसरात ४ ट्रायकोकार्ड प्रति एकर क्षेत्रावर सोडावे. ट्रायकोकार्ड उपलब्ध नसल्यास क्विनालफास २५ ईसी २० मिली प्रतिदहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. डिसेंबरअखेर काढणी करावी आणि फरदड ठेवू नये. 


इतर अॅग्रो विशेष
केंद्राचा चर्चेचा प्रस्ताव नाकारला;...नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारच्या वतीने...
...येथे कांदा रोपे राखणीसाठी...विसापूर, जि. सातारा  : सोन्याचे दाग-दागिने,...
कृषी विभागात आगामी बदल्या समुपदेशनाने...पुणे : कोविड-१९ साथीमुळे कृषी विभागात यंदा...
बंगालच्या उपसागरात तीव्र कमी दाबाच्या...पुणे :  निवार चक्रीवादळाचा प्रभाव निवळत...
कृषी पदव्युत्तर पदवीच्या प्रवेश...पुणे : राज्यातील चारही कृषी विद्यापीठाअंतर्गत...
सातत्य राखलेले पशुपालन ठरले शेतीलाही...यवतमाळ जिल्ह्यातील लोही (ता. दारव्हा) येथील...
अतिदुर्गम भागात दुग्धव्यवसायातून...आदिवासी व अतिदुर्गम असलेल्या शेलद- मुंढेवाडी (ता...
प्रक्रिया उद्योगाअभावी संत्रा...नागपूर : राज्यात सध्या संत्र्याखालील सर्वाधिक...
वीस हजार अन्न प्रक्रिया उद्योग होणार...पुणे : प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न उद्योग उन्नयन...
महाबळेश्वरमध्ये प्रायोगिक तत्त्वावर...मुंबई : महाराष्ट्राचे मिनी काश्मीर आता...
पदवीच्या दुसऱ्या वर्षाच्या प्रवेश...पुणे ः कृषी व मत्स्य विद्याशाखेच्या पदवी...
दुर्गम भागातील गावकऱ्यांनी स्वतःच केला...जामली, जि. अमरावती ः चिखलदरा तालुक्‍यातील...
बारदान्याच्या ६५ कोटींची शेतकऱ्यांना...भंडारा: गेल्या खरीप व रब्बी हंगामात स्वतःचा...
ढगाळ वातावरणामुळे द्राक्ष उत्पादक...सांगली ः : मागील दोन दिवसांतील थंड वारे, ढगाळ...
ऊस तोडणीसाठी हार्वेस्टरला पसंती पुणे : मजूर टंचाईमुळे राज्यातील साखर...
‘ऑपरेशन ग्रीन’ डिसेंबरपर्यंत चालणार पुणे : ‘ऑपरेशन ग्रीन’अंतर्गत भाजीपालावर्गीय...
शासकीय केंद्रातं खरेदीत कापूस कटतीतून...जळगाव ः शासकीय कापूस खरेदीने शेतकऱ्यांना आधार...
गगनबावड्यात यंदा सर्वाधिक पाऊस पुणे ः देशात यंदा परतीचा मॉन्सून अधिक काळ...
ढगाळ वातावरणामुळे आंबा, काजू बागायतदार...सिंधुदुर्ग : जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले...
आश्वासक रब्बीही ठरतोय आव्हानात्मकखरीप हंगामात झालेली अतिवृष्टी आणि लांबलेल्या...