Agriculture news in Marathi, pink-bowl-worm detect in Amravati | Agrowon

अमरावतीत पुन्हा गुलाबी बोंड अळीचा शिरकाव

टीम अॅग्रोवन
सोमवार, 12 ऑगस्ट 2019

अमरावती ः गेल्या दोन वर्षांपूर्वी जिल्ह्यात गुलाबी बोंड अळीचा कापसावर मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला होता. त्यानंतर आता हंगामाच्या सुरवातीलाच पुन्हा अमरावती पाठोपाठ भातकुली व अचलपूर तालुक्‍यातही बोंड अळी दिसून आल्याने नियंत्रणात्मक उपाय योजनांचे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

अमरावती ः गेल्या दोन वर्षांपूर्वी जिल्ह्यात गुलाबी बोंड अळीचा कापसावर मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला होता. त्यानंतर आता हंगामाच्या सुरवातीलाच पुन्हा अमरावती पाठोपाठ भातकुली व अचलपूर तालुक्‍यातही बोंड अळी दिसून आल्याने नियंत्रणात्मक उपाय योजनांचे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

विदर्भातील प्रमुख कापूस उत्पादक जिल्ह्यांसह अमरावती जिल्ह्यातही गेल्या दोन वर्षांपूर्वी बीटी कापसावर मोठ्या प्रमाणात गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव झाला होता. संपूर्ण पीक या किडीने गिळंकृत केल्याने कापूस उत्पादक हवालदील झाले होते. बोंड अळी नियंत्रणात येत नसल्याने अनेक भागांत कापूस काढून टाकावा लागला होता. याची दखल घेत शासनस्तरावरुन गुलाबी बोंड अळीच्या नियंत्रणासाठी व्यापक जनजागृती करण्यात आली. त्याचे परिणाम २०१८-१९ या वर्षाच्या हंगामात दिसून आले. 

गेल्यावर्षी काही जिल्ह्यांमध्येच किरकोळ प्रमाणात बोंड अळीचा प्रादुर्भाव होता. त्यावरून यावर्षी तो होणार नाही, अशी शक्‍यता वर्तविली जात होती. परंतु, हंगामाच्या सुरवातीलाच पूर्वहंगामी लागवड केलेल्या शेतकऱ्यांच्या शेतात गुलाबी बोंड अळीच्या डोमकळ्या आढळून आल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

भातकुली तालुक्‍यातील कानफोडी, अमरावती तालुक्‍यांतील सुकळी येथे कृषी विभाग तसेच दुर्गापूर केव्हीकेच्या तज्ज्ञांकडून या संदर्भाने पाहणी करण्यात आली. उपविभागीय कृषी अधिकारी प्रिती रोडगे, दुर्गापूर केव्हीकेचे तज्ज्ञ डॉ. के. पी. सिंग, तालुका कृषी अधिकारी अशोक यांचा या पथकात समावेश होता. शेतकऱ्यांना या वेळी मार्गदर्शन करण्यात आले. निबोंळी अर्काचा उपयोग करण्याचे आवाहन या वेळी तज्ज्ञांनी केले.


इतर ताज्या घडामोडी
या आठवड्यात ढगाळ, थंड, कोरडे हवामान...महाराष्ट्राच्या मध्य भागावर पूर्व व पश्‍चिम...
सकस चाऱ्या‍साठी बीएचएन - १० संकरित...महाग खुराकातील काही भाग स्वस्त चाऱ्या‍मधून देणे...
माथाडी कामगारांच्या प्रश्‍नांसाठी लवकरच...पुणे  ः माथाडी आणि कामगार कायदा गुंतागुंतीचा...
नगर, नाशिकला पुढील वर्षी ऊसदरात फटका ?नगर ः नगर, नाशिकसह राज्याच्या अनेक भागांत उशिरा...
धरण कालवा सल्लागार समितीची आज नगरला बैठकनगर  : मुळा, भंडारदरा व निळवंडे धरणांच्या...
परभणीत मूग, उडदाचा पीकविमा परतावा मंजूरपरभणी  ः पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत खरीप...
सिंचन सुविधा बळकटीकरणावर भर देणार :...चंद्रपूर   ः ‘‘शेतकऱ्यांच्या जीवनात...
नांदेड, परभणी, हिंगोलीत चार हजारांवर...नांदेड : किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत...
इराण–भारतादरम्यान कृषी उत्पादनांचा...मुंबई : महाराष्ट्र हे देशातील औद्योगिक...
छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचे...कोल्हापूर  : या देशात राजे अनेक झाले, पण...
नाशिकच्या वैभवशाली इतिहासाला मिळणार...नाशिक : नाशिक जिल्ह्याच्या स्थापनेस दीडशे वर्ष...
स्मार्टसिटी वादात शेतकऱ्यांवर अन्याय...नाशिक : नाशिक शिवारातील हनुमानवाडी व मखमलाबाद...
धुळे जिल्हा परिषदेत आता सभापती निवडीकडे...धुळे ः अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीनंतर जिल्हा...
सांगली जिल्ह्यात ९३८ कोटींची ऊसबिले थकीतसांगली ः जिल्ह्यातील बहुसंख्य साखर...
शेतमालाला मार्केटिंगची जोड दिल्याने...अकोला : जो शेतमाल पिकवला त्याची स्वतः विक्री...
पुण्यात कांदा, लसूण, बटाट्याच्या दरात...पुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
पुणे जिल्ह्यात `कृषी, उद्योग, ऊर्जा’...पुणे : जिल्ह्याच्या २०२०-२१ च्या प्रारूप वार्षिक...
‘टेंभू’चे आवर्तन पुढील आठवड्यात...सांगली : टेंभू उपसा सिंचन योजनेचे आवर्तन सुरू करा...
भंडारा : केवळ खरेदी केंद्रांवरच मिळतोय...भंडारा : महाविकास आघाडीकडून ५०० रुपयांचे बोनस आणि...
जळगाव जिल्ह्यात शासकीय धान्य खरेदीला...जळगाव : जिल्ह्यातील तीन केंद्रांमध्ये सोयाबीनची व...