agriculture news in Marathi, Pink bowlworm attack in Parbhani and Nanded District, Maharashtra | Agrowon

नांदेड, परभणी जिल्ह्यात गुलाबी बोंड अळीने आर्थिक नुकसान पातळी ओलांडली

टीम अॅग्रोवन
रविवार, 18 ऑगस्ट 2019

गुलाबी बोंड अळीच्या प्राद्रुर्भावाने आर्थिक नुकसान पातळी ओलांडल्याचे आढळून आले आहे. यंदा बीटी कपाशीच्या बियाणामध्ये रेफ्युजी कपाशीचे बियाणे मिसळून देण्यात आले आहे. याबाबत पडताळणी करण्यासाठी कपाशीच्या पानांचे नमुने परिक्षणासाठी घेतले आहेत.
- डॉ. व्ही. चिन्ना बाबू नाईक, कीटकशास्त्रज्ञ, केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर.

परभणी: परभणी, नांदेड जिल्ह्यांतील बीटी कपाशीवरील गुलाबी बोंड अळीच्या प्राद्रुर्भावाची पाहणी नुकतेच नागपूर येथील केंद्रीय कापूस संशोधन संस्थेतील कीटकशास्त्रज्ञ तसेच वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठअंतर्गत कापूस संशोधन केंद्राच्या शास्त्रज्ञांनी केली.

या दोनही जिल्ह्यांमध्ये कपाशीवरील गुलाबी बोंड अळीच्या प्राद्रुर्भावाने आर्थिक नुकसान पातळी ओलांडली असल्याचे सर्वेक्षणावरून आढळून आले आहे. नागपूर येथील केंद्रीय कापूस संशोधन संस्थेतील कीटकशास्त्रज्ञ डॉ. व्ही. चिन्नी बाबू नाईक हे गुलाबी बोंड अळीच्या प्राद्रुर्भावाची पाहणी करण्यासाठी मराठवाडा दौऱ्यावर आले आहेत. नांदेड जिल्ह्यातील गोकुळ (ता. माहूर) येथील तसेच जांभरुण (ता. अर्धापूर) येथील शेतातील लागवड केलेल्या कपाशीवरील गुलाबी बोंड अळीचा प्राद्रुर्भावाची पाहणी केली.

या वेळी डॉ. शिवाजी तेलंग, तालुका कृषी अधिकारी श्री. शिंगाडे, शेतकरी उपस्थित होते. या वेळी गुलाबी बोंड अळीचा १० ते १२ टक्के प्राद्रुर्भाव आढळून आला. दुपारी मांडाखळी (ता. परभणी) येथील शेख मोबीन यांच्या शेतातील ७ जून रोजी ६ एकरवर लागवड करण्यात आलेल्या कपाशीच्या पिकांवरील गुलाबी बोंड अळीच्या प्राद्रुर्भावाचे सर्वेक्षण केले. या वेळी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठअंतर्गत नांदेड येथील कापूस संशोधन केंद्रातील कीटकशास्त्रज्ञ डॉ. शिवाजी तेलंग, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील डॉ. पी. बी. केदार शेतकरी मो. अन्वर, मो. मोबीन उपस्थित होते.

सर्वेक्षणादरम्यान कपाशीच्या पिकांमध्ये १० ते १५ टक्के डोमकळ्या आढळून आल्या. गुलाबी बोंड अळी आर्थिक नुकसान पातळी ओलांडली आहे. शेतक-यांनी गुलाबी बोंड अळीच्या नियंत्रणासाठी डोमकळ्या तोडून नष्ट कराव्यात. निंबोळी अर्काची फवारणी करावी. पिकांमध्ये योग्य उंचीवर कामगंध सापळे लावावेत. तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार शिफारशीत कीटकनाशकांची फवारणी करावी, असे आवाहन केले.


इतर अॅग्रो विशेष
विदर्भात पावसाची शक्यतापुणे: पूर्व आणि पश्चिमेकडील वाऱ्यांचा संगम होत...
सांगली जिल्ह्यातून सव्वादोन हजार टन...सांगली ः दुष्काळ, अवकाळी आणि अतिवृष्टीच्या...
शेती, पूरक उद्योग अन् आरोग्याचा जागरशेतकरी आणि ग्रामीण महिलांच्या जीवनात आश्वासक बदल...
ई-पीक पाहणी प्रकल्पाची प्रायोगिक...सिल्लोड : हंगामनिहाय किती क्षेत्रावर कोणत्या...
अठ्ठेचाळीस कृषी महाविद्यालयांची...पुणे : विद्यार्थ्यांकडून लक्षावधी रुपये शुल्क...
सिंधुदुर्गच्या पूर्व पट्ट्यात आंब्याला...सिंधुदुर्ग: फेब्रुवारी महिना संपत आला तरी...
पशुधनाचे मार्चमध्ये होणार लसीकरणपुणे ः गाई, म्हशी, शेळ्या, कालवडी आजारी पडू नये...
निर्धारित निर्यातीनंतरच बफर स्टॉकवरील...नवी दिल्ली: देशातील ज्या साखर कारखान्यांनी...
खारपाण पट्ट्यातील येऊलखेड बनले कृषी...अकोला: विदर्भाची पंढरी शेगाव हे संपूर्ण...
जळगाव ः कापसाच्या खेडा खरेदीला कमी...जळगाव ः कापसाची खेडा खरेदी मागील आठवड्यात...
इंडोनेशियात कच्च्या साखरेची जादा...कोल्हापूर : भारताच्या दृष्टीने साखर निर्यातीसाठी...
चांगदेव यात्रेला प्रारंभ; दिंड्या दाखलचांगदेव, जि. जळगाव ः सिद्धेश्वर योगिराज चांगदेव...
सर्व्हर डाउनच्या गोंधळामुळे द्राक्ष...नाशिक : केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क...
विदर्भात पावसाला पोषक हवामान पुणे: राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात वाढ...
चारशे अधिकाऱ्यांच्या कृषी विभागात...पुणे ः कृषी विभागात गेल्या दोन ते तीन दिवसांत ३९९...
परराज्यापर्यंत विस्तारला ऊसरोपे...मुखई (जि. पुणे) येथील अभिजित धुमाळ या तरुण...
केळी ‘रायपनिंग चेंबर’चा यशस्वी केला...कोल्हापूर जिल्ह्यातील ऊसबहुल क्षेत्रात केळी...
शेतकऱ्यांवर अन्यायकारक करार नकोचअमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आपल्या...
ऐच्छिक पीकविम्याचे इंगितकें द्र सरकारने पीकविमा योजना शेतकऱ्यांसाठी...
नैसर्गिक नव्हे, सेंद्रिय शेतीची धरा काससुभाष पाळेकरांच्या पद्धतीनुसार बाह्य निविष्ठा...