Agriculture news in marathi The pinnacle of FPC on the basis of group farming | Agrowon

गटशेतीच्या पायावर ‘एफपीसी’चा कळस 

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 20 एप्रिल 2021

राज्यात काही वर्षांपूर्वी मोजक्या शेतकरी गटांसह रचला गेलेला गटशेतीचा पाया सतत विस्तार असून आता त्यातून साडेचार हजार एफपीसी तयार झाल्या आहेत. या एफपीसींपैकी काही कंपन्या राज्यातीलच नव्हे; तर देशातील इतर शेतकरी कंपन्यांना दिशादर्शक ठरणारे काम साकारत आहेत. 

पुणे : राज्यात अल्प व अत्यल्प भूधारक शेतक-यांना वरदान ठरणारी गटशेतीची संकल्पना आता शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या (एफपीसी) माध्यमातून विशाल रुप घेण्याच्या टप्प्यात आली आहे. राज्यात काही वर्षांपूर्वी मोजक्या शेतकरी गटांसह रचला गेलेला गटशेतीचा पाया सतत विस्तार असून आता त्यातून साडेचार हजार एफपीसी तयार झाल्या आहेत. या एफपीसींपैकी काही कंपन्या राज्यातीलच नव्हे; तर देशातील इतर शेतकरी कंपन्यांना दिशादर्शक ठरणारे काम साकारत आहेत. 

राज्यातील साडेचार शेतकरी उत्पादक कंपन्यांपैकी सह्याद्री, गोदावरी व्हॅली सारख्या एफपीसी तर आता गटशेतीच्या मंदिराचा कळस रचण्याचे काम करीत आहेत. विशेष म्हणजे गटशेती, एफपीओ व एफपीसीच्या संकल्पना पुढे नेण्यात ‘अॅग्रोवन’कडून गेल्या दीड दशकात बांधावर व सरकार दरबारी खूप मोलाची भूमिका बजावली आहे. 

कधीकाळी १०-२० एकर शेती ही सर्वसाधारण बाब होती. त्यानंतर मोठे धारणा क्षेत्र केवळ विदर्भात शिल्लक राहिले. मात्र, शेतीचे तुकडीकरण झपाट्याने होत राहिल्याने आता ४३ लाख शेतकऱ्यांकडे सव्वा एकरपेक्षा कमी जमीन तर ३४ लाख शेतकऱ्यांकडे सव्वा ते अडीच एकर जमिनीचा तुकडा राहिलेला आहे. त्यामुळेच भविष्यात सामुहिक शेतीच शेतकऱ्यांना तारेल अशी मांडणी राज्यात केली गेली. त्यातून तयार झालेल्या गटांच्या आता मोठ्या प्रमाणात शेतकरी उत्पादक कंपन्या (एफपीसी) व शेतकरी उत्पादक संस्था (एफपीओ) संघटितपणे आकारला येत आहेत. 

‘एफपीसी’ व त्यांचे विविधांगी उपक्रम शेतमाल उत्पादनापासून निर्यातीपर्यंत विस्तारले आहेत. पीकसल्ला, बिजोत्पादन, निविष्ठा पुरवठा, प्रक्रिया, मॉल उभारणी, सेंद्रिय शेती, शेतमाल खरेदी-विक्री अशा विविध भूमिका या संस्थांकडून यशस्वीपणे साकारल्या जात आहेत. त्यात पुन्हा केंद्राने देशभर १० हजार नव्या एफपीओ उघडून सहा कोटींपेक्षा जास्त गुंतवणूक या संकल्पनेत करण्याचे घोषित केले आहे. त्याबाबत राज्यात काम देखील सुरू झाल्याने या चळवळीचा पाया आणखी पक्का होणार आहे. शेतकऱ्यांना समृध्द करण्याचा सर्वात चांगला पर्याय म्हणून एफपीसी व एफपीओंकडे पाहिले जात आहे. 

शेतकरी कंपन्यांना काय हवे... 

  • जाचक करांमधून मुक्ती 
  • वापरासाठी सरकारी जागा 
  • बॅंकांकडून तत्काळ कर्ज - सेवा पुरवठादारांचे पाठबळ 
  • व्यावसायिक प्रशिक्षण

दहा हजार शेतकऱ्यांच्या गोदावरी व्हॅलीने कोणतीही सरकारी मदत न घेता १६० कोटी रुपयांच्या उलाढालीचा टप्पा केव्हाच ओलांडला आहे. यंदा आम्ही २०० कोटींची उलाढाल करणार आहोत. समुहकार्य व कष्ट असल्यास अशा शेकडो गोदावरी व्हॅली राज्यात उभ्या राहू शकतात.
- नितीन चव्हाण, व्यवस्थापकीय संचालक, गोदावरी व्हॅली फार्मर्स प्रोड्युसर कंपनी, हिंगोली 

राज्यातील शेतकरी कंपन्यांची एकूण उलाढाल शेकडो कोटींची आहे. एकट्या बिजोत्पादनातील उलाढाल १०० कोटींवर पोचली आहे. सरकारने या चळवळीचा पाठिंबा अखंडित ठेवला आणि करांच्या जाचापासून सुटका केल्यास ग्रामीण भागात समूह शेतीच सुवर्णपर्व अवतरेल.
– अॅड.अमोल रणदिवे, व्यवस्थापकीय संचालक, उस्मानाबाद डिस्ट्रिक्ट सीडस् फेडरेशन (ओडीएसएफ) 
 


इतर अॅग्रो विशेष
विदर्भात पावसाची शक्यता पुणे : मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व कोकणच्या काही...
कृषी सेवा केंद्रचालक, कर्मचाऱ्यांना लस...पुणे ः राज्यातील सर्व कृषी सेवा केंद्रांचे...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात शेकडो टन कलिंगडे...सिंधुदुर्गनगरी : कोरोना निर्बंधामुळे जिल्ह्यातील...
खानदेशात केळीची कमी दरात खरेदी जळगाव ः खानदेशात नवती केळी बागांची काढणी सुरू...
निर्यातीच्या केळीला १३०० रुपये दर जळगाव ः खानदेशातून आखातात किंवा परदेशात केळी...
शेतीशाळांची ‘एसओपी’ निश्‍चित पुणे ः शेतकऱ्यांना उपयुक्त ठरणाऱ्या शेतीशाळांसाठी...
भुईमूग खर्चालाही महागअकोला ः उन्हाळी हंगामात यंदा लागवड केलेल्या...
वनरोपवाटिकेतून गटाने तयार केली ओळखसांगली जिल्ह्यातील खंडोबाचीवाडी  (ता. पलूस)...
शेती, शिक्षण अन पूरक उद्योगातून शाश्वत...जमीन आरोग्य उपक्रमांबाबत जागृती, आत्महत्याग्रस्त...
जोरदार पावसाची शक्यता पुणे : मराठवाडा ते मध्य प्रदेशचा मध्य भाग या...
बाजार समित्याबंदमुळे खरीप नियोजन ‘...पुणे: कोरोना नियंत्रणासाठी लागू केलेल्या लॉकडाऊन...
शेततळे अनुदानाचे वीस कोटी वितरित नगर ः राज्य शासनाच्या कृषी विभागाच्या ‘मागेल...
साखर कारखान्यांकडून ९२ टक्के ‘एफआरपी’...कोल्हापूर : राज्यात एप्रिलअखेर एकूण रकमेच्या ९२...
ढगाळ वातावरणामुळे शेतकरी चिंतेत पुणे : राज्यातील काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडत...
उद्योजक वृत्तीतून ‘शिवतेज’ची झळाळीशेती टिकवण्याबरोबरच ती अधिक उद्यमशील करण्यासाठी...
फळप्रक्रिया उद्योजक व्हायचेय? चला...सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथील फळसंशोधन...
मॉन्सून यंदा वेळेवर पुणे : सध्या मॉन्सूनच्या प्रगतीसाठी वातावरण पोषक...
शेतकऱ्यांकडे २९ लाख क्विंटल घरचे बियाणे पुणे ः कृषी विभागाने ग्रामबिजोत्पादन मोहिमेतून...
मध्य महाराष्ट्रात तुरळक सरी पुणे : मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत...
पावसाचा प्रभाव वाढणार पुणे : कर्नाटकाच्या उत्तर भागात चक्रीय वाऱ्याची...