कृषीभुषण पिसोरे यांचा तीनशे लोकांना आधार 

बीड जिल्ह्यात येणाऱ्या सर्व लोक, तपासणी नाक्यावरील कर्मचारी, अधिकारी यांच्या जेवनाची पंधरा दिवसांपासून सोय केलेली आहे. शेतकऱ्यांनी लोकांची भूक भागवणे हे शेतकऱ्यांचे काम आहे. जो पर्यंत तपासणी नाका सुरु राहिल तोपर्यंत सेवा सुरुच ठेवणार आहे. - बाबासाहेब पिसोरे, कृषीभुषण शेतकरी, दौलावडगाव ता. आष्टी जि, बीड
कृषीभुषण पिसोरे यांचा तीनशे लोकांना आधार 
कृषीभुषण पिसोरे यांचा तीनशे लोकांना आधार 

नगर  ः कोरोना संसर्गामुळे लॉकडाऊन असताना कृषीभुषण बाबासाहेब पिसोर हे दररोज सुमारे तीनशे लोकांना आधार देत आहेत. नगर-बीड जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या दौडावडगाव (ता. आष्टी) येथील तपासणी नाक्यावर गेल्या पंधरा दिवसापासून दररोज तीनशे लोकांना जेवनाची सोय करत आहेत. कोरोनाच्या संकटात शेतकरी स्वतःची अडचण बाजूला ठेवून लोकांसाठी मदतीचा हाथ पुढे करत जगाचा पोशिंदा शेतकरी आहे, हे दाखवून दिले जात आहे.  कोरोना संसर्ग टाळण्यासाठी जिल्हा बंदी केली आहे. त्यामुळे कृषीभुषण बाबासाहेब पिसोरे यांचे गाव असलेल्या दौला वडगाव (ता. आष्टी ) येथे तपासणी नाका करण्यात आलेला आहे. या नाक्यावर बाहेरुन येणाऱ्या लोकांची तपासणी करण्यासाठी आरोग्य, महसुल विभागाचे चे अधिकारी, कर्मचारी, पोलिस अशा १०५ कर्मचाऱ्यांची नियुक्ती आहे. याशिवाय बाहेरु येणारे जाणारे तसेच दोनच्या जवळपास लोक दिवसभरात ये-जा करतात. काही दिवसापासून ऊसतोड कामगार, मजुरांचीही या रस्त्यावरुन वर्दळ आहे. तपासणी अन्य बाबी पुर्ण करताना लोकांचा वेळ जातो. 

मात्र अनेकांना यामुळे उपाशी रहावे लागत असल्याने कृषीभूषण बाबासाहेब पिसोरे पुढे आले. आष्टी तालुक्यातील वाकी, वाघळुज, दौलावडगांव व खडकत येथे ऊसतोड मजुरांची तपासणी केली जाते. दौलावडगाव येथील तपासणी केंद्राजवळच पिसोरे यांची जमीन येथेच असून त्यांनी येथे मंगलकार्यालय बांधलेले आहे. ते मंगल कार्यालय तपासणी केंद्रासाठी दिलेले आहेच, पण मंडप उभारुनही दिला आहे. ऊसतोड मजुरांची वैद्यकीय तपासणी करणे, त्यांची गाव वार नोंद करण्याचे काम प्रशासनाच्या वतीने रात्रंदिवस सुरू आहे. यासाठी वैद्यकीय विभागाचे कर्मचारी, महसुल, पोलिस आणि शिक्षक असे मिळुन सुमारे १०५ कर्मचारी तसेच काही सामाजिक कार्यकर्ते मिळुन १२५ आणि बाहेरुन येणाऱ्या ऊसतोड मजुरांसह अन्य मिळून दररोज तीनशेच्या जवळपास लोकांच्या जेवणाची सोय केली आहे. 

ऊसतोड मजूर आणि कर्मचाऱ्यांना बाबासाहेब पिसोरे यांच्या वतीने दोन वेळचे भोजन तसेच चहा नाष्ट्याची सोय करण्यात आली आहे. सर्व कर्मचाऱ्यांची देखभाल करण्यासाठी बाबासाहेब पिसोरे, किरण पिसोरे, रविंद्र पिसोरे यांनी पुढाकार घेतला आहे. संकटकाळी शेतकरी स्वतःच्या अडचणी बाजूला ठेवत धावून जातो हे पिसोरे यांनी दाखवून दिले आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com