पितृपंधरवाड्यामुळे पुण्यात भाज्यांना उठाव

पितृपंधरवाड्यामुळे पुण्यात भाज्यांना उठाव
पितृपंधरवाड्यामुळे पुण्यात भाज्यांना उठाव

पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. १५) भाजीपाल्याची सुमारे १५० ट्रक आवक झाली होती. पितृपंधरवाडा सुरू असल्याने भेंडी, गवार, चवळी, काकडी, कारली, गाजर, घेवडा, तांबडा भोपळा या भाज्यांना उठाव आहे. आवकही चांगली असल्याने या भाजीपाल्याचे दर स्थिर आहेत. तर कांदा, बटाटा, लसूण, मटारचे भाव १० ते २० टक्क्यांनी वधारल्याचे सांगण्यात आले. पालेभाज्यांमध्ये कोथिंबीर सुमारे दोन लाख तर मेथीची एक लाख जुड्या आवक झाली होती. 

विविध भाजीपाल्याच्या आवकेमध्ये परराज्यांतून बंगळूर येथून १ टेम्पो गाजर, आंध्रप्रदेश, तमिळनाडू येथून सुमारे १० टेम्पो हिरवी मिरची, कर्नाटक आणि गुजरात येथून ४ ते ५ ट्रक कोबी, आंध्रप्रदेश आणि तमिळनाडू येथून शेवगा सुमारे ३ टेम्पो, इंदौर येथून गाजर सुमारे ५ ते ६ टेम्पो, कर्नाटकातून घेवडा सुमारे २ टेम्पो, गुजरात, कर्नाटकमधून ३ टेम्पो भुईमूग शेंग, मध्यप्रदेश आणि गुजरातमधून लसणाची सुमारे साडेपाच ते सहा हजार गोणी तर आग्रा आणि इंदौर येथून बटाटा सुमारे ५५ ट्रक आवक झाली होती.

महाराष्ट्राच्या विविध भागांतून झालेल्या आवकेमध्ये सातारी आले सुमारे १ हजार २०० गोणी, टॉमेटो सुमारे साडेचार ते पाच हजार क्रेट, फ्लॉवर सुमारे १० ते १२ तर कोबी सुमारे ८ ते १० टेम्पो, भेंडी ८ ते १० टेम्पो, गवार ७ ते ८ टेम्पो, सिमला मिरची आणि तांबडा भोपळा प्रत्येकी सुमारे १० ते १२ टेम्पो, पुरंदर, पारनेर, वाई, साताऱ्यातून मटार २ टेम्पो, भुईमूग शेंग सुमारे १०० गोणी, कांदा सुमारे १२० ट्रक आवक झाली होती.

फळभाज्यांचे दहा किलोचे भाव  कांदा : २८०-३२०, बटाटा : १००-१६०, लसूण : ९००-१५००, आले : सातारी ७००-६००, भेंडी : २००-३००, गवार : २००-३००, टोमॅटो : ८०-१२०, दोडका : २००-२५०, हिरवी मिरची : २००-३००, दुधी भोपळा : ८०-१२०, चवळी : १५०-२००, काकडी : ८०-१२०, कारली : हिरवी २००-२५०, पांढरी १५०-२००, पापडी : २००-२००, पडवळ : २४०-२५०, फ्लॉवर : १५०-२००, कोबी : १००-१२०, वांगी : १५०-२००, डिंगरी : १५०-१६०, नवलकोल : १००-१२०, ढोबळी मिरची : १००-१६०, तोंडली : कळी १५०-२००, जाड : ९०-१००, शेवगा : ४००-५००, गाजर : ३५०-४००, वालवर : २५०-३००, बीट : १५०-२००, घेवडा : ४००-५००, कोहळा : १००-१५०, आर्वी : २५०-३००, घोसावळे : १४०-१५०, ढेमसे : १५०-२५०, पावटा : ३००-३५०, भुईमूग शेंग : ४००-५००, मटार : ८००-१०००, तांबडा भोपळा : १००-१५०, सुरण : २४०-१५०, मका कणीस : ६०-१२०, नारळ (शेकडा) : १०००-१६००. 

पालेभाज्या पालेभाज्यांचे भाव (शेकडा जुडी) :  कोथिंबीर : ५००-१०००, मेथी : ४००-९००, शेपू : ४००-७००, कांदापात : ५००-१०००, चाकवत : ५००-८००, करडई : ५००-८००, पुदिना : ३००-४००, अंबाडी : ५००-८००, मुळे : १०००-१५००, राजगिरा : ४००-५००, चुका : ८००-१०००, चवळई : ५००-८००, पालक : ६००-५००.

फुलबाजार फुलांचे प्रतिकिलोचे दर पुढीलप्रमाणे : झेंडू : ५-२०, गुलछडी : ६-२०, बिजली : ५-२०, कापरी : ५-२०, शेवंती : १६-३०, अ‍ॅस्टर : ६-१२, (गड्डीचे भाव) गुलाबगड्डी : ५-१५, गुलछडी काडी : १०-२०, डच गुलाब (२० नग) : ४०-६०, लिली बंडल : ३-६,  जरबेरा : १०-३०, कार्नेशियन : २०-४०.

फळबाजार  रविवारी (ता. १५) मोसंबी सुमारे ५५ टन, संत्री १० टन, डाळिंब २५० टन, पपई २५ ते ३० टेम्पो, लिंबे सुमारे दोन हजार गोणी, चिक्कू १ हजार डाग, कलिंगड ३० टेम्पो, खरबूज ५ टेम्पो इतकी आवक झाली होती. फळांचे भाव पुढीलप्रमाणे : लिंबे (प्रतिगोणी) : ३००-१२००, अननस (डझन) : ७०-२७०,  मोसंबी : (३ डझन) : १५०-३५०, (४ डझन) : ६०-१५०, संत्रा : (३ डझन) : १५०-३५०, (४ डझन) : ६०-१५०, डाळिंब (प्रतिकिलोस) : भगवा : ४०-१४०, गणेश १०-४०, आरक्ता १५-५०. कलिंगड : ५-१५, खरबूज : १०-३०, पपई : १०-३०, चिक्कू : १००-५००, सफरचंद : सिमला (२५ किलो) - १२००- २२००, किन्नोर (२५ किलो) १८००-२५००, काश्मीर डेलीशिअस (१५ किलो) ९००-१८००. 

मटण-मासळी  गणेशोत्सवानंतर सुरमई, हलवा, रावस व बांगड्याच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. बाजारात दाखल होत असलेल्या मालाच्या तुलनेत मागणी वाढल्याने मासळीचे भावात दहा ते वीस टक्क्यांनी वधारले असल्याचे व्यापारी ठाकूर परदेशी यांनी सांगितले. चिकन, मटणासह गावरान व इंग्लिश अंड्याला मागणी वाढल्याने चिकनच्या भावात किलोमागे दहा रुपये, गावरान अंड्याच्या भावात शेकड्यामागे वीस रुपये तर इंग्लिश अंड्याच्या भावात ३० ते ३५ रुपयांनी वाढ झाली आहे. मटणाचे भाव स्थिर असल्याचे सांगण्यात आले. गणेश पेठ येथील मासळीबाजारात रविवारी बाजारात खोल समुद्रातील मासळीची ८ ते १० टन, खाडी ४०० ते ५०० किलो तर नदीच्या मासळीची दीड ते दोन टन आवक झाली. आंध्रप्रदेश येथून रहू, कतला आणि सिलनची मिळून दहा ते बारा टन आवक झाली.

खोल समुद्रातील मासळी  (प्रतिकिलोचे भाव) : पापलेट : कापरी : १५००-१६००, मोठे १४००-१५००, मध्यम : ८००-९५०, लहान ७००, भिला : ७५०, हलवा : ६००-६५०, सुरमई : ७५०-८००, रावस : ५००-८००, घोळ : ५५०, भिंग : ३६०, करली : ३२०, करंदी : २८०, पाला : ७००-१२००, वाम : ४८०-५५०, ओले बोंबील : १२०-१६०, कोळंबी : १८०-४८०, जंबोप्रॉन्स : १४००, किंगप्रॉन्स : ७५०, लॉबस्टर : १३००, मोरी : २४०, मांदेली : १२०-१४०, राणीमासा : १८०-२००, खेकडे : २००-२४०, चिंबोऱ्या : ४८०-५५०. 

खाडीची मासळी  सौंदाळे : २४०, खापी : २००, नगली : ३२०-७००, तांबोशी : ४८०, पालू : २८०, लेपा : १२०-२४०, शेवटे : २४०, बांगडा : १४०-२८०, पेडवी : १००, बेळुंजी : २००, तिसऱ्या : १६०-१८०, खुबे : १४०, तारली : १८०.

नदीची मासळी  रहू : १४०, कतला : १६०, मरळ : ३२०, शिवडा : २८०, चिलापी : ८०, खवली : २८०, आम्ळी : १६०, खेकडे : २००, वाम : ५२०.

मटण  बोकडाचे : ५००, बोल्हाईचे : ५००, खिमा : ५००, कलेजी : ५६०.

चिकन  चिकन : १४०, लेगपीस : १७०, जिवंत कोंबडी : ११०, बोनलेस : २४०. 

अंडी  गावरान : शेकडा : ५२० डझन : ८४ प्रती नग : ७. इंग्लिश : शेकडा : ४०० डझन : ६० प्रतिनग : ५.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com