Agriculture news in Marathi, Pitrupandharwada on hike the vegetables rates | Agrowon

पितृपंधरवाड्यामुळे पुण्यात भाज्यांना उठाव

टीम अॅग्रोवन
सोमवार, 16 सप्टेंबर 2019

पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. १५) भाजीपाल्याची सुमारे १५० ट्रक आवक झाली होती. पितृपंधरवाडा सुरू असल्याने भेंडी, गवार, चवळी, काकडी, कारली, गाजर, घेवडा, तांबडा भोपळा या भाज्यांना उठाव आहे. आवकही चांगली असल्याने या भाजीपाल्याचे दर स्थिर आहेत. तर कांदा, बटाटा, लसूण, मटारचे भाव १० ते २० टक्क्यांनी वधारल्याचे सांगण्यात आले. पालेभाज्यांमध्ये कोथिंबीर सुमारे दोन लाख तर मेथीची एक लाख जुड्या आवक झाली होती. 

पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. १५) भाजीपाल्याची सुमारे १५० ट्रक आवक झाली होती. पितृपंधरवाडा सुरू असल्याने भेंडी, गवार, चवळी, काकडी, कारली, गाजर, घेवडा, तांबडा भोपळा या भाज्यांना उठाव आहे. आवकही चांगली असल्याने या भाजीपाल्याचे दर स्थिर आहेत. तर कांदा, बटाटा, लसूण, मटारचे भाव १० ते २० टक्क्यांनी वधारल्याचे सांगण्यात आले. पालेभाज्यांमध्ये कोथिंबीर सुमारे दोन लाख तर मेथीची एक लाख जुड्या आवक झाली होती. 

विविध भाजीपाल्याच्या आवकेमध्ये परराज्यांतून बंगळूर येथून १ टेम्पो गाजर, आंध्रप्रदेश, तमिळनाडू येथून सुमारे १० टेम्पो हिरवी मिरची, कर्नाटक आणि गुजरात येथून ४ ते ५ ट्रक कोबी, आंध्रप्रदेश आणि तमिळनाडू येथून शेवगा सुमारे ३ टेम्पो, इंदौर येथून गाजर सुमारे ५ ते ६ टेम्पो, कर्नाटकातून घेवडा सुमारे २ टेम्पो, गुजरात, कर्नाटकमधून ३ टेम्पो भुईमूग शेंग, मध्यप्रदेश आणि गुजरातमधून लसणाची सुमारे साडेपाच ते सहा हजार गोणी तर आग्रा आणि इंदौर येथून बटाटा सुमारे ५५ ट्रक आवक झाली होती.

महाराष्ट्राच्या विविध भागांतून झालेल्या आवकेमध्ये सातारी आले सुमारे १ हजार २०० गोणी, टॉमेटो सुमारे साडेचार ते पाच हजार क्रेट, फ्लॉवर सुमारे १० ते १२ तर कोबी सुमारे ८ ते १० टेम्पो, भेंडी ८ ते १० टेम्पो, गवार ७ ते ८ टेम्पो, सिमला मिरची आणि तांबडा भोपळा प्रत्येकी सुमारे १० ते १२ टेम्पो, पुरंदर, पारनेर, वाई, साताऱ्यातून मटार २ टेम्पो, भुईमूग शेंग सुमारे १०० गोणी, कांदा सुमारे १२० ट्रक आवक झाली होती.

फळभाज्यांचे दहा किलोचे भाव 
कांदा : २८०-३२०, बटाटा : १००-१६०, लसूण : ९००-१५००, आले : सातारी ७००-६००, भेंडी : २००-३००, गवार : २००-३००, टोमॅटो : ८०-१२०, दोडका : २००-२५०, हिरवी मिरची : २००-३००, दुधी भोपळा : ८०-१२०, चवळी : १५०-२००, काकडी : ८०-१२०, कारली : हिरवी २००-२५०, पांढरी १५०-२००, पापडी : २००-२००, पडवळ : २४०-२५०, फ्लॉवर : १५०-२००, कोबी : १००-१२०, वांगी : १५०-२००, डिंगरी : १५०-१६०, नवलकोल : १००-१२०, ढोबळी मिरची : १००-१६०, तोंडली : कळी १५०-२००, जाड : ९०-१००, शेवगा : ४००-५००, गाजर : ३५०-४००, वालवर : २५०-३००, बीट : १५०-२००, घेवडा : ४००-५००, कोहळा : १००-१५०, आर्वी : २५०-३००, घोसावळे : १४०-१५०, ढेमसे : १५०-२५०, पावटा : ३००-३५०, भुईमूग शेंग : ४००-५००, मटार : ८००-१०००, तांबडा भोपळा : १००-१५०, सुरण : २४०-१५०, मका कणीस : ६०-१२०, नारळ (शेकडा) : १०००-१६००. 

पालेभाज्या
पालेभाज्यांचे भाव (शेकडा जुडी) :  कोथिंबीर : ५००-१०००, मेथी : ४००-९००, शेपू : ४००-७००, कांदापात : ५००-१०००, चाकवत : ५००-८००, करडई : ५००-८००, पुदिना : ३००-४००, अंबाडी : ५००-८००, मुळे : १०००-१५००, राजगिरा : ४००-५००, चुका : ८००-१०००, चवळई : ५००-८००, पालक : ६००-५००.

फुलबाजार
फुलांचे प्रतिकिलोचे दर पुढीलप्रमाणे : झेंडू : ५-२०, गुलछडी : ६-२०, बिजली : ५-२०, कापरी : ५-२०, शेवंती : १६-३०, अ‍ॅस्टर : ६-१२, (गड्डीचे भाव) गुलाबगड्डी : ५-१५, गुलछडी काडी : १०-२०, डच गुलाब (२० नग) : ४०-६०, लिली बंडल : ३-६,  जरबेरा : १०-३०, कार्नेशियन : २०-४०.

फळबाजार 
रविवारी (ता. १५) मोसंबी सुमारे ५५ टन, संत्री १० टन, डाळिंब २५० टन, पपई २५ ते ३० टेम्पो, लिंबे सुमारे दोन हजार गोणी, चिक्कू १ हजार डाग, कलिंगड ३० टेम्पो, खरबूज ५ टेम्पो इतकी आवक झाली होती.
फळांचे भाव पुढीलप्रमाणे : लिंबे (प्रतिगोणी) : ३००-१२००, अननस (डझन) : ७०-२७०,  मोसंबी : (३ डझन) : १५०-३५०, (४ डझन) : ६०-१५०, संत्रा : (३ डझन) : १५०-३५०, (४ डझन) : ६०-१५०, डाळिंब (प्रतिकिलोस) : भगवा : ४०-१४०, गणेश १०-४०, आरक्ता १५-५०. कलिंगड : ५-१५, खरबूज : १०-३०, पपई : १०-३०, चिक्कू : १००-५००, सफरचंद : सिमला (२५ किलो) - १२००- २२००, किन्नोर (२५ किलो) १८००-२५००, काश्मीर डेलीशिअस (१५ किलो) ९००-१८००. 

मटण-मासळी 
गणेशोत्सवानंतर सुरमई, हलवा, रावस व बांगड्याच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. बाजारात दाखल होत असलेल्या मालाच्या तुलनेत मागणी वाढल्याने मासळीचे भावात दहा ते वीस टक्क्यांनी वधारले असल्याचे व्यापारी ठाकूर परदेशी यांनी सांगितले. चिकन, मटणासह गावरान व इंग्लिश अंड्याला मागणी वाढल्याने चिकनच्या भावात किलोमागे दहा रुपये, गावरान अंड्याच्या भावात शेकड्यामागे वीस रुपये तर इंग्लिश अंड्याच्या भावात ३० ते ३५ रुपयांनी वाढ झाली आहे. मटणाचे भाव स्थिर असल्याचे सांगण्यात आले. गणेश पेठ येथील मासळीबाजारात रविवारी बाजारात खोल समुद्रातील मासळीची ८ ते १० टन, खाडी ४०० ते ५०० किलो तर नदीच्या मासळीची दीड ते दोन टन आवक झाली. आंध्रप्रदेश येथून रहू, कतला आणि सिलनची मिळून दहा ते बारा टन आवक झाली.

खोल समुद्रातील मासळी 
(प्रतिकिलोचे भाव) : पापलेट : कापरी : १५००-१६००, मोठे १४००-१५००, मध्यम : ८००-९५०, लहान ७००, भिला : ७५०, हलवा : ६००-६५०, सुरमई : ७५०-८००, रावस : ५००-८००, घोळ : ५५०, भिंग : ३६०, करली : ३२०, करंदी : २८०, पाला : ७००-१२००, वाम : ४८०-५५०, ओले बोंबील : १२०-१६०, कोळंबी : १८०-४८०, जंबोप्रॉन्स : १४००, किंगप्रॉन्स : ७५०, लॉबस्टर : १३००, मोरी : २४०, मांदेली : १२०-१४०, राणीमासा : १८०-२००, खेकडे : २००-२४०, चिंबोऱ्या : ४८०-५५०. 

खाडीची मासळी 
सौंदाळे : २४०, खापी : २००, नगली : ३२०-७००, तांबोशी : ४८०, पालू : २८०, लेपा : १२०-२४०, शेवटे : २४०, बांगडा : १४०-२८०, पेडवी : १००, बेळुंजी : २००, तिसऱ्या : १६०-१८०, खुबे : १४०, तारली : १८०.

नदीची मासळी 
रहू : १४०, कतला : १६०, मरळ : ३२०, शिवडा : २८०, चिलापी : ८०, खवली : २८०, आम्ळी : १६०, खेकडे : २००, वाम : ५२०.

मटण 
बोकडाचे : ५००, बोल्हाईचे : ५००, खिमा : ५००, कलेजी : ५६०.

चिकन 
चिकन : १४०, लेगपीस : १७०, जिवंत कोंबडी : ११०, बोनलेस : २४०. 

अंडी 
गावरान : शेकडा : ५२० डझन : ८४ प्रती नग : ७. इंग्लिश : शेकडा : ४०० डझन : ६० प्रतिनग : ५.


इतर बाजारभाव बातम्या
परभणीत भेंडी १००० ते १५०० रूपये क्विंटल परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
राज्यात मोसंबी १००० ते ४००० रुपये...औरंगाबादमध्ये १००० ते २५०० रुपये प्रतिक्विंटल...
नाशिकमध्ये वांगी २००० ते ५००० रूपये नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
जळगावात गवार २५०० ते ४००० रुपयेजळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी (...
सोलापुरात ढोबळी मिरची, टोमॅटो दरात...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
नाशिकमध्ये हिरवी मिरचीला मागणी...नाशिक : येथील नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
कांदा, बटाट्याच्या दरात सुधारणा,...पुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
औरंगाबादेत हिरवी मिरची प्रतिक्विंटल...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
परभणीत काकडी ६०० ते १२०० रुपये क्विंटलपरभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे, भाजीपाला...
राज्यात उडीद २५०० ते ८००० रूपयेनगरमध्ये ४५०० ते ५५०० रूपये नगर  : नगर...
नाशिकमध्ये कारले १००० ते २६६७ रूपयेनाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (ता.८...
जळगावात आले ३५०० ते ५२०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नगर बाजार समितीत कांद्याचे दर टिकूननगर ः नगर जिल्ह्यामध्ये कांद्याचे दर गेल्या पंधरा...
सोलापुरात टोमॅटो, वांगी, हिरवी मिरचीत...सोलापूर ः सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या...
नाशिकमध्ये डाळिंबांच्या आवकेत घट, दरात...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
नगरमध्ये गवार, शेवग्याच्या दरात तेजी नगर ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न...
पुण्यात भाजीपाल्याच्या आवक, मागणीत वाढपुणे : गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
औरंगाबादमध्ये बटाटे २५०० ते २८०० रूपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
परभणीत गवार १५०० ते २५०० रुपये क्विंटलपरभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे, भाजीपाला...
राज्यात मूग १५०० ते ८९४० रूपये क्विंटलपुण्यात ब्रॅंडेड मुगाला ७५०० ते ८५०० रुपये...