Agriculture news in Marathi Place of Saint Nilobaraya on the Chitraratha of Maharashtra | Agrowon

महाराष्ट्राच्या चित्ररथावर संत निळोबारायांना स्थान

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 26 जानेवारी 2021

प्रजासत्ताकदिनी (ता. २६) नवी दिल्ली येथे होणाऱ्या राजपथावरील सोहळ्यात महाराष्ट्राच्या चित्ररथावर पिंपळनेर (ता. पारनेर) येथील महाराष्ट्राच्या संत परंपरेतील पाचवे स्थान असलेले संत निळोबाराय महाराजांना स्थान मिळाले आहे.

राळेगणसिद्धी, जि. नगर : प्रजासत्ताकदिनी (ता. २६) नवी दिल्ली येथे होणाऱ्या राजपथावरील सोहळ्यात महाराष्ट्राच्या चित्ररथावर पिंपळनेर (ता. पारनेर) येथील महाराष्ट्राच्या संत परंपरेतील पाचवे स्थान असलेले संत निळोबाराय महाराजांना स्थान मिळाले आहे. या चित्ररथावर महाराष्ट्रातील १४ संतांच्या प्रतिकृतींसह श्रीसंत निळोबाराय महाराज यांची प्रतिमा व त्यांच्या अभंगाच्या ओळी झळकणार आहेत.

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, आमदार नीलेश लंके व संत निळोबाराय ट्रस्टचे अध्यक्ष अशोक सावंत यांनी याबाबत आनंद व्यक्त केला. महाराष्ट्रातील संतपरंपरा ही या चित्ररथाची ‘थीम’ आहे. त्यावर सुरुवातीला संत ज्ञानेश्वरांची प्रतिमा असेल. नंतर छत्रपती शिवाजी महाराज व संत तुकाराम महाराज यांच्या भेटीचा सुवर्णक्षण हा फिरता देखावा आहे. रथाच्या चहूबाजूने महाराष्ट्रातील १४ संतांच्या प्रतिमा साकारल्या आहेत. त्यात संत नामदेव, संत एकनाथ, संत निळोबा महाराज, संत सेना महाराज, संत जनाबाई, संत शेख महमंद, संत गोरोबा महाराज आदींचा समावेश आहे. चित्ररथावर संतांच्या अभंगवाणीही साकारली आहे.

 


इतर ताज्या घडामोडी
शेतीच्या उन्नतीसाठी ज्ञानच महत्त्वाचे...पुणे : कृषीप्रधान देश असलेल्या भारतात शेतीला...
अवकाळीच्या तडाख्यात शेवग्याचे पुन्हा...नाशिक : गत जानेवारी महिन्यात झालेल्या अवकाळी...
खानदेशात वीजबिल वसुलीसाठी शेतकऱ्यांमागे...जळगाव : खानदेशात कृषिपंपांची वीजबिल थकबाकी...
खानदेशात मका दर सुधारलेजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...
नांदेड जिल्ह्यात राष्ट्रीयीकृत...नांदेड : जिल्ह्यात खरीप व रब्बी हंगाम २०२०-२१...
‘महाखनिज’मध्ये परराज्यांतील वाळूची...परभणी ः ‘‘राज्य शासनाने परराज्यांतून होणाऱ्या...
पुणे बाजार समितीत पायाभूत सुविधा द्या,...पुणे ः पुणे बाजार समितीमधील भुसार विभागातील...
परभणी : संचालक मंडळाच्या निवडणूकीत...परभणी ः परभणी जिल्हा बॅंक संचालक मंडळाच्या...
सातारा जिल्हा बॅंकेसाठी दोन हजारांवर...सातारा : जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीसाठी सोसायटीसह...
सात वर्षांत हमीभावात ऐतिहासिक वाढ ः...नवी दिल्ली : गेल्या सात वर्षांत केंद्र सरकारने...
सोलापुरात शेतकऱ्यांना थेट कर्जवाटप करणारसोलापूर : आर्थिक स्थितीमुळे गेल्या चार-पाच...
पणनची कापूस खरेदी रविवारपासून बंदनागपूर : बाजारात हमीभावापेक्षा कापसाला मिळणारा...
राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी...सोलापूर : सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा या...
शेतीला दिवसा आठ तास वीजपुरवठा करा :...मुंबई : राज्यात वीजेचे दर कमी करण्याचे व...
मराठा आरक्षणाची सुनावणी सर्वोच्च...मुंबई : ‘‘देशातील अनेक राज्यांमधून त्यांच्या...
शॉर्टसर्किटमुळे आग; अकराशे आंबा, काजू...रत्नागिरी : तालुक्यातील शीळ-सड्यावर वणव्याच्या...
घनकचरा पथदर्शी प्रकल्पांसाठी सिंधुदुर्ग...वैभववाडी : स्वच्छ भारत मिशनच्या दुसऱ्या...
अकोल्यात रब्बीसाठी ५४ कोटींचे पीककर्ज...अकोला : यंदाच्या रब्बी हंगमात जिल्ह्यात लागवड...
भाजपला दिला आयारामांनी झटका...सांगली : सांगली-मिरज-कुपवाड महालिकेवर गेल्या अडीच...
तंत्र कोथिंबीर लागवडीचे...कोथिंबीर पिकास नियमित ४ ते ५ दिवसांनी पाणी द्यावे...