वाशीम जिल्ह्यात पीककर्ज वितरण उद्दिष्टपूर्तीसाठी नियोजन करा ः पालकमंत्री देसाई

वाशीम : जिल्ह्यात या खरीप हंगामात १६०० कोटी रुपये पीककर्ज वितरित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून प्रत्येक पात्र शेतकऱ्याला हे कर्ज उपलब्ध होण्यासाठी बँकांनी पुढाकार घ्यावा. सर्व बँकांना देण्यात आलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सूक्ष्म नियोजन केले जावे, असे निर्देश पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी दिले.
Plan to achieve Crop loan disbursement target: Guardian Minister Desai
Plan to achieve Crop loan disbursement target: Guardian Minister Desai

वाशीम : जिल्ह्यात या खरीप हंगामात १६०० कोटी रुपये पीककर्ज वितरित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून प्रत्येक पात्र शेतकऱ्याला हे कर्ज उपलब्ध होण्यासाठी बँकांनी पुढाकार घ्यावा. सर्व बँकांना देण्यात आलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सूक्ष्म नियोजन केले जावे, असे निर्देश पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी दिले. 

श्री. देसाई यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय खरीप हंगाम पूर्व तयारीचा आढावा घेण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक झाली.  यावेळी केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री संजय धोत्रे हे अकोला येथून या बैठकीत सहभागी झाले. वाशीम येथून जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, खासदार भावना गवळी, आमदार अमित झनक, जिल्हाधिकारी हृषिकेश मोडक, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना, पोलिस अधीक्षक वसंत परदेशी, अमरावती येथून कृषी सहसंचालक सुभाष नागरे हे सुद्धा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये सहभागी झाले होते. सहभागी झाले.

श्री. देसाई म्हणाले, जिल्ह्यात गतवर्षी झालेल्या अवेळी पावसामुळे सोयाबीन पिकांचे नुकसान झाल्याने आगामी हंगामात पेरणीसाठी शेतकऱ्यांना पुरेसे घरगुती बियाणे उपलब्ध होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे कृषी विभागाने योग्य नियोजन करून जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे आवश्यक पुरेशा प्रमाणात उपलब्ध द्यावे. सध्या शेतकऱ्यांकडे उपलब्ध असलेल्या घरगुती बियाणांची उगवण क्षमता तपासणीसाठी कृषी विभागाने विशेष मोहीम राबवावी. हंगामात बोगस बियाणे, खते व कीटकनाशकांची विक्री होवू नये, यासाठी प्रत्येक तालुक्यात भरारी पथके नेमावीत, अशा प्रकारे विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी.

श्री. धोत्रे म्हणाले, शेतकऱ्यांना खरीप हंगामात योग्य वेळी कर्ज उपलब्ध होणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने सर्व बँकांनी कर्ज वाटपाचे नियोजन करून त्यानुसार प्रत्येक पात्र शेतकऱ्याला पीक कर्ज मिळेल. बैठकीत शंकर तोटावार यांनी पेरणी व कृषी निविष्ठांबाबत माहिती दिली.

अशी असेल पेरणी आणि बियाणे 
पेरणी क्षेत्र ४ लाख १५ हजार
बियाणे गरज २ लाख १२ हजार ७२८ क्विंटल
सोयाबीन क्षेत्र २ लाख ९६ हजार हेक्टर
आवश्‍यक सोयाबीन बियाणे ७७ हजार ७१६ क्विंटल
तूर क्षेत्र ५३ हजार ९०० हेक्टर
रासायनिक खतांची मागणी ५० हजार टन
मंजुरी ५६ हजार २९० टन

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com