खते, बियाणे, कीटकनाशके वेळेत देण्याचे नियोजन करा : भरणे

सोलापूर ः ‘‘जिल्ह्यात खरिपाचे क्षेत्र वाढत आहे. शेतकऱ्यांना खरीप हंगामात खते, बी-बियाणे आणि कीटकनाशके कमी पडणार नाहीत. गुणवत्तापूर्ण बी-बियाणे आणि खते वेळेत मिळण्यासाठी योग्य नियोजन करा,’’ अशा सूचना पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी येथे दिल्या.
Plan to deliver fertilizers, seeds, pesticides on time : Bharne
Plan to deliver fertilizers, seeds, pesticides on time : Bharne

सोलापूर ः ‘‘जिल्ह्यात खरिपाचे क्षेत्र वाढत आहे. शेतकऱ्यांना खरीप हंगामात खते, बी-बियाणे आणि कीटकनाशके कमी पडणार नाहीत. गुणवत्तापूर्ण बी-बियाणे आणि खते वेळेत मिळण्यासाठी योग्य नियोजन करा,’’ अशा सूचना पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी येथे दिल्या.

जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व बैठकीत भरणे बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे, प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने, ‘आत्मा’चे उपसंचालक मदन मुकणे, जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे, महावितरणचे अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक प्रशांत नाशिककर आदी उपस्थित होते.

भरणे म्हणाले, ‘‘यंदा पावसाचे प्रमाण चांगले आहे. त्यामुळे योग्य नियोजन करावे. रब्बी पिकाचा जिल्हा आता खरिपाचा झाला. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळू लागली आहे. ५८ हजार हेक्टर क्षेत्रावरून ३ लाख ७४ हजार हेक्टर क्षेत्र वाढले आहे. शेतकऱ्यांना बी-बियाण्यांची गुणवत्ता चांगली मिळण्यासाठी गुणवत्ता नियंत्रण कक्षाने कडक कारवाई करावी. बी-बियाणे निकृष्ट किंवा बनावट असतील. इतर कृषी निविष्ठांबाबत शेतकऱ्यांच्या तक्रारी असतील, तर दोषींवर कृषी, महसूल विभागाने कडक कारवाई करावी.’’

‘‘बी-बियाणे आणि खतासोबत इतर कीटकनाशके खरेदी करणे शेतकऱ्यांना बंधनकारक नाही. शेतकऱ्यांना कोणी खरेदीची जबरदस्ती केल्यास संबंधित विक्रेत्यांचा परवाना निलंबित करा’’, अशा सूचनाही भरणे यांनी दिल्या.

पीककर्जासाठी पुढाकार घ्या

शेतकऱ्यांना खरीप पीक कर्ज मिळण्यासाठी जिल्हा बँकेसह राष्ट्रीयीकृत बँकांनी तयारी करावी. पीक कर्जाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी बँक प्रतिनिधींची बैठक घेऊन पाठपुरावा करण्याच्या सूचनाही भरणे यांनी दिल्या.

विविध योजनांबाबत सूचना

लोकप्रतिनिधींनी भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड अनुदान योजना, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना, खतांची दरवाढ, वीज जोडणी, शेततळे, नादुरुस्त बंधारे याबाबत मांडलेल्या सूचना, उपस्थित केलेले प्रश्न शासन दरबारी मांडून मार्गी लावणार असल्याचे भरणे यांनी सांगितले.

फेसबुक पेजद्वारेही मार्गदर्शन

‘‘यंदा ४०० शेती शाळांचे नियोजन आहे. यामध्ये २० महिलांसाठी असणार आहेत. आजपासून krushivibhagsolapur या फेसबुक पेजद्वारेही शेतकऱ्यांना कृषी विभाग मार्गदर्शन करणार आहे’’, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी माने यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com