Agriculture news in Marathi Plan to give seeds, fertilizers on the dam | Agrowon

बियाणे, खते बांधावर देण्याचे नियोजन करा

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 7 मे 2021

कृषी सेवा केंद्रांवर शेतकऱ्यांची होणारी गर्दी टाळण्यासाठी आतापासूनच नियोजन करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांना बांधावरच बियाणे, खते देण्याचे नियोजन करावे, अशी सूचना जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी केली.

वाशीम : आगामी खरीप हंगामाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील सर्व कृषी सेवा केंद्र सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत उघडण्यास मुभा देण्यात आली आहे. मात्र मे अखेरीस किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात कृषी सेवा केंद्रांवर शेतकऱ्यांची होणारी गर्दी टाळण्यासाठी आतापासूनच नियोजन करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांना बांधावरच बियाणे, खते देण्याचे नियोजन करावे, अशी सूचना जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी केली.

जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी बुधवारी (ता. ५) दुरदृश्‍य प्रणालीद्वारे तालुकास्तरीय अधिकाऱ्यांसोबत संवाद साधला. आगामी हंगामात शेतकऱ्यांना बांधावर खते, बियाणे मिळण्यासाठी तहसीलदार, गटविकास अधिकारी व तालुका कृषी अधिकाऱ्यांनी तालुकास्तरावर संयुक्त बैठक तातडीने घ्यावी. यामध्ये खते, बियाणे वितरणाचे नियोजन करावे. कुठल्याही परिस्थितीत कृषी केंद्रावर गर्दी होणार नाही, याची खबरदारी घेण्याचे निर्देशही दिले.

कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी गर्दी टाळणे आवश्यक असून, याकरिता जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. संचारबंदी नियमांची शहरी व ग्रामीण भागात काटेकोरपणे अंमलबजावणी आवश्यक आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देशही षण्मुगराजन एस यांनी दिले. एखाद्या गावामध्ये गर्दी होणारा कार्यक्रम घेतल्यास संबंधितांवर कारवाई केली जावी. कारवाई होत नसेल, तर संबंधित गावस्तरीय कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशारासुद्धा त्यांनी दिला.

जिल्ह्यातील काही गावांमध्ये अजूनही लग्न समारंभ, अंत्यसंस्कार प्रसंगी गर्दी होत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व ग्रामस्तरीय समित्या, गावस्तरीय कर्मचारी यांनी अधिक सतर्क राहून गर्दी होणारे कार्यक्रम आयोजित केले जाणार नाहीत, याची दक्षता घेणे आवश्यक आहे. तसेच कोणीही असा कार्यक्रम आयोजित केल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई करण्याचे निर्देश दिले.

निवासी उपजिल्हाधिकारी श्री. हिंगे म्हणाले, की बँक आणि एटीएमच्या वेळांमध्ये बदल करण्यात आला असून, आता बँक सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत, तर एटीएम सकाळी ७ ते दुपारी ३ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. या कालावधीत बँकांमध्ये ग्राहकांची गर्दी होऊ नये, यासाठी उपाययोजना कराव्यात, असे त्यांनी सांगितले.


इतर बातम्या
फळपीक विमा योजनेत त्रुटी, गोंधळसोलापूर ः पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा...
पूर्व विदर्भात मुसळधार शक्य पुणे : कोकण ते केरळ दरम्यान असलेले कमी दाबाचे...
पूर्वहंगामी द्राक्षाचे विमा कवच चारपट...नाशिक : गेल्या काही वर्षांत नैसर्गिक आपत्तीमुळे...
‘एचटीबीटी’ बियाण्याची पाळेमुळे...पुणे ः देशात अवैध तणनाशक सहनशील ‘एचटीबीटी’ कापूस...
डाळिंब विमा अर्जासाठी १४ जुलैपर्यंत...सांगली : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत पुनर्रचित...
उसासाठी यंदाची ‘एफआरपी’ जाहीर कराकोल्हापूर : यंदाच्या गळीत हंगामातील उसाची एफआरपी...
कांदा व्यापाऱ्याकडून शेतकऱ्याला मारहाण नाशिक : जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याची...
शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड  ...नाशिक : राज्यात खरीप हंगामास सुरुवात झाली असून,...
अमरावती जिल्हा परिषदेची सभा...अमरावती : पीकविमा भरपाई, समृद्धी महामार्गाच्या...
संत्रा आयात शुल्क कपातीसाठी प्रयत्न करा...नागपूर : विदर्भाचे मुख्य फळपीक असलेल्या...
दूधदरप्रश्‍नी वैजापूर बाजार समितीच्या...औरंगाबाद : दूध उत्पादकांच्या मागण्याच्या...
खेडमध्ये बटाटा लागवडीस वेगचास, जि. पुणे : खेड तालुक्यात बटाटा लागवडीस...
स्थानिक काजूची आवक आजरा तालुक्यात...आजरा, जि. कोल्हापूर : आजरा बाजारपेठेत स्थानिक...
लाभार्थी शेतकऱ्यांचे अनुदान तातडीने अदा...बुलडाणा : शासन शेतकऱ्यांचा जीवनस्तर उंचविण्यासाठी...
पुणे बाजार समितीची ‘प्रादेशिक’ अधिसूचना...पुणे : पुणे बाजार समितीची निवडणूक टाळून सत्ता एका...
कांद्याची २५ दिवसांत विक्रमी अकरा लाख...नाशिक : जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार...
खानदेशात युरियाप्रश्नी प्रशासनाची धावपळजळगाव :  खानदेशात खरिपाला सुरवात होत असतानाच...
‘डीएससी’त अडथळे  आणल्यास कारवाई करापुणे ः राज्यातील सरपंच व ग्रामसेवकांचे संगणकीय...
खानदेशात बाजार समित्यांचे कामकाज पूर्ववतजळगाव :  खानदेशात बाजार समित्यांचे कामकाज...
विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन ५, ६ जुलै... मुंबई : कोरोना संकटाची सध्याची स्थिती पाहता आणि...