सिंचन आवर्तनांचे योग्य नियोजन करा : भुजबळ

Plan irrigation rotations properly: Bhujbal
Plan irrigation rotations properly: Bhujbal

नाशिक : ‘‘विभागातील रब्बी व उन्हाळा हंगामांसाठी सिंचन व बिगर सिंचन आवर्तनासाठी पाण्याचा दुरुपयोग होणार नाही, याकडे लक्ष देऊन सिंचन आवर्तनाचे योग्य नियोजन करावे,’’ अशा सूचना अन्न, नागरी पुरवठामंत्री, पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या. 

भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली विभागातील रब्बी व उन्हाळा हंगाम कालवा सल्लगार समितीची बैठक (ता. १४) मंत्रालयात नुकतीच पार पडली. या वेळी कृषिमंत्री दादा भुसे उपस्थित होते. खासदार डॉ. भारती पवार, सदाशिव लोखंडे, आमदार राधाकृष्ण विखे-पाटील, आशुतोष काळे, लहुजी कानडे, राहुल डिकळे, हिरामण खोसकर, सरोज आहिरे,  नरहरी झिरवळ, दिलीप बनकर, नितीन पवार, मुफ्ती मोहम्मद इस्माईल, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, जलसंपदाचे मुख्य अभियंता किरण कुलकर्णी, अधीक्षक अभियंता अलका आहेरराव उपस्थित होते.

भुजबळ म्हणाले, ‘‘पालखेड डावा कालव्यावर रब्बी हंगामात सिंचन/बिगर सिंचनाचे २ आवर्तने देण्याचे नियोजन करा, उन्हाळा हंगामामध्ये बिगर सिंचन व आकस्मिक आरक्षणाचे १ आवर्तन व जून अखेरीस पावसाळ्याने ओढ दिल्यास येवला, मनमाड ३८ गावे यांच्यासाठी १ आवर्तने देण्याचे ठरले आहे. ओझरखेड कालव्यावर रब्बीचे आवर्तन देण्याचे नियोजन आहे. रब्बीच्या दुसऱ्या आवर्तनासोबत आकस्मितचे आवर्तन देण्यात येईल.’’

‘‘दारणा प्रकल्प गोदावरी कालव्याचे रब्बी हंगामात १ आवर्तन व उन्हाळा हंगामात उपलब्ध पाण्यातून ३ आवर्तने देण्याचे नियोजन करा, गंगापूर प्रकल्प नाशिक डावा कालवा रब्बी हंगामात २ व उन्हाळा हंगामात ३ आवर्तने देण्याचे निश्‍चित करण्यात आले आहे. कडवा प्रकल्प कडवा उजव्या कालव्यास रब्बी हंगामात व उन्हाळा हंगामात पिण्याचे १ आवर्तन मिळेल. चणकापूर प्रकल्प-गिरणा डाव्या व उजव्या कालव्यास रब्बी हंगामात १ आवर्तन मिळेल. सिंचन व बिगर सिंचन आवर्तन एकत्रितपणे नियोजन करून होणाऱ्या बचतीतून मर्यादित क्षेत्रासाठी उन्हाळ्यात १ आवर्तन द्यावे,’’ असे भुजबळ म्हणाले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com