Agriculture news in marathi, Plan for irrigation of Rs 21 crore 50 lacs is approved in Nanded | Page 2 ||| Agrowon

नांदेड जिल्ह्यात कृषी सिंचनाचा २१ कोटी ५० लाखांचा आराखडा मंजूर
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 10 सप्टेंबर 2019

नांदेड : पंतप्रधान कृषी सिंचन योजनेअंतर्गत जिल्ह्याचा यंदाचा २१ कोटी ५० हजार रुपये तरतुदीच्या आराखडा मंजूर करण्यात आला. या योजनेअंतर्गत गतवर्षी (२०१८-१९) जिल्ह्यातील ६ हजार ६५९ शेतकऱ्यांना ठिबक आणि तुषार संचासाठी १४ कोटी ३६ लाख रुपये अनुदान वितरित आले आहे. 

नांदेड : पंतप्रधान कृषी सिंचन योजनेअंतर्गत जिल्ह्याचा यंदाचा २१ कोटी ५० हजार रुपये तरतुदीच्या आराखडा मंजूर करण्यात आला. या योजनेअंतर्गत गतवर्षी (२०१८-१९) जिल्ह्यातील ६ हजार ६५९ शेतकऱ्यांना ठिबक आणि तुषार संचासाठी १४ कोटी ३६ लाख रुपये अनुदान वितरित आले आहे. 

जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये शनिवारी (ता. ७) कृषी विभागाच्या विविध योजनांची जिल्हास्तरीय आढावा बैठक घेण्यात आली. जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे, कापूस संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ पवन ढोके, पोखर्णी कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ देविकांत देशमुख, व्यंकट शिंदे आदी उपस्थित होते. 

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना २०१८-१९ मध्ये एकात्मिक फलोत्पादन अभियानांतर्गत ४४ सामूहिक शेततळ्यांना अनुदान देण्यात आले. २०१९-२० मध्ये एकात्मिक फलोत्पादन अभियान आणि राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत एकूण १० कोटी ७ लाख रुपये खर्चाचे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. त्यामध्ये सामूहिक शेततळे, हरितगृह, शेडनेट, कांदाचाळ, कोल्ड स्टोरेज आदींचा समावेश आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी डोंगरे यांनी मान्यता दिली.

मागेल त्याला शेततळे योजनेअंतर्गत जिल्ह्यात ४ हजार शेततळे निर्मितीचे उद्दिष्ट प्राप्त आहे. आजवर जिल्ह्यात २ हजार ६७८ शेततळ्यांची कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित शेततळ्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे निर्देश क्षेत्रीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहेत. प्रगत शेती समृद्ध शेतकरी मोहिमेतून यांत्रिकीकरणांतर्गत २०१८-१९ मध्ये १ हजार ४०७ शेतकऱ्यांना ९ कोटी २५ लाख रुपयांची अवजारे खरेदीसाठी अनुदान देण्यात आले.

यंदा ९ कोटी रुपये तरतूद आहे. याअंतर्गत आजवर २०० पेरणी यंत्रांसाठीचे अनुदान शेतकऱ्यांना वितरित करण्यात आले. उर्वरित यंत्र ट्रॅक्टर, मळणीयंत्र, रोटाव्हेटर आदी यंत्राची शेतकऱ्यांनी खरेदी केल्यानंतर अनुदानाची रक्कम बँक खात्यावर वर्ग करण्यात येईल. राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत कोरडवाहू क्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत २०१९-२० मध्ये जिल्ह्यातील ६ गावांची निवड करण्यात आली. १ कोटी ३७ लाख १४ हजार रुपयाच्या आराखड्यास मंजुरी देण्यात आली. 

आत्मांतर्गत नाळेश्वर येथील आदिशक्ती महिला शेतकरी गटाला १ लाख रुपयांच्या रोपवाटिका, महिला सक्षमीकरणासाठी फुलशेती प्रात्यक्षिकास मंजुरी देण्यात आली. गटशेतीस चालना देण्याच्या योजनेंतर्गत २०१७-१८ मधील मंजूर गटांचा प्रगतीचा आढावा घेण्यात आला. 

२०१८-१९ मधील प्राथमिक निवड करण्यात आलेल्या गटांच्या प्रकल्प अहवालाचे सादरीकरण झाले. उमरी जहागीर (ता. हदगाव) येथे एकाच गावात ६० शेततळी तयार केल्याबद्दल तालुका कृषी अधिकारी आर. डी. रणवीर यांचा, तर गटशेतीमध्ये उत्कृष्ट काम केल्याबद्दल विजय किनाळकर यांचा सत्कार करण्यात आला.

इतर ताज्या घडामोडी
कापूस उत्पादकांचा दसऱ्याचा मुहूर्त...अकोला  ः ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यापासून...
पहुर्जीरा गावात पाण्यात बैलगाडी उलटलीबुलडाणा  : जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात...
चांदा ते बांदा योजनेअंतर्गत विविध करारः...मुंबई: राज्यात चांदा ते बांदा योजनेअंतर्गत...
पुणे जिल्ह्यात हलक्या ते मध्यम...पुणे ः गेल्या चार ते पाच दिवसांपासून पुणे...
मालेगाव तालुक्यात पावसामुळे पिके भुईसपाटनाशिक : मालेगाव तालुक्यातील सौंदणे गावाच्या...
पुणे जिल्ह्यात दोन हजार ३५४ पीककापणी...पुणे ः पिकांची उत्पादकता आणि पीकविमा नुकसानभरपाई...
छावण्या सुरू ठेवण्यासाठी शेवगावात आंदोलननगर ः शेगाव तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये अजूनही...
आघाडीचे सरकार आल्यास सरसकट कर्जमाफी ः...जालना : केंद्र आणि राज्य सरकारच्या चुकीच्या...
नगरमध्ये कांदा प्रतिक्विंटल कमाल पाच...नगर : नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
नाशिकच्या सभेत पंतप्रधानांकडून ज्वलंत...नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या...
साताऱ्याच्या दुष्काळी भागात दुसऱ्या...सातारा : जिल्ह्यातील दुष्काळी माण, खटाव तालुक्‍...
विधानसभा निवडणुकीसाठी मनसे १०० जागा...मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र...
विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेची...मुंबई ः चौदाव्या विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता...
परभणीत शेवगा ३५०० ते ५००० रुपये...परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
उन्हाळ कांद्याचा आलेख चढाचनाशिक : मागील दोन आठवड्यांपासून उन्हाळ कांद्याची...
औरंगाबाद, जालना जिल्ह्यांत पावसाचा कमी-...औरंगाबाद  : मराठवाड्यातील ४२१ पैकी तब्बल २७५...
कोल्हापूर, सिंधुदुर्गात पावसाची रिपरिपकोल्हापूर, सिंधुदुर्ग : सप्टेंबरच्या पहिल्या...
शेतीमाल तारण कर्ज योजनेसाठी एक कोटीपरभणी : ‘‘परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे...
पाचोरा, जामनेरातही १०० टक्के पाऊसजळगाव ः खानदेशात जळगाव, धुळ्यात या...
‘टेंभू‘चे पाणी आटपाडीत, शेतकऱ्यांना...आटपाडी जि. सांगली :  टेंभू पंपगृहातील पंपात...