नगर जिल्ह्याचा ६६४ कोटींचा नियोजन आराखडा

plan of Rs. 664 crore for the Nagar district
plan of Rs. 664 crore for the Nagar district

नगर : जिल्ह्याच्या विकासाला चालना देण्यासाठी जिल्हा वार्षिक नियोजन आराखडा आता ६६४ कोटी ८० लाखांचा झाला आहे. आगामी वर्षासाठी जिल्हा नियोजन समितीचा (डीपीसी) एकूण ५७१ कोटी ८० लाख रुपयांचा आराखडा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी मंजूर केला होता. त्यात सर्वसाधारण आराखड्यात तब्बल ९३ कोटींच्या वाढीला अर्थमंत्री अजित पवार यांनी मान्यता दिली. सर्वसाधारणचा आराखडा ३८१ कोटींचा होता, तो आता वाढीमुळे ४७५ कोटींचा झाला आहे. 

नाशिक येथे शुक्रवारी (ता. ३१) जिल्हा नियोजन विषयक आढावा बैठक झाली. मुश्रीफ, जिल्हा परिषद अध्यक्ष राजश्री घुले, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज पाटील, आमदार आशुतोष काळे, डॉ. किरण लहामटे व लहू कानडे, जिल्हा नियोजन अधिकारी नीलेश भदाणे आदी उपस्थित होते.  मुश्रीफ यांनी जिल्हा परिषदेच्या शाळा, रस्ते, शहरातील प्रलंबित असलेल्या नाट्यगृहाची उभारणी आदी प्रश्‍नांकडे पवार यांचे लक्ष वेधले. जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी ऐतिहासिक वास्तूंच्या संवर्धनाचा प्रश्‍न उपस्थित करून निधी मिळणे गरजेचे असल्याचे नमूद केले.

ऐतिहासिक वास्तूंच्या संवर्धनाबाबत जिल्हा नियोजन अधिकाऱ्याने बनवलेले सूत्रबद्ध सादरीकरण अर्थमंत्री पवार यांच्यासमोर मांडण्यात आले. त्यास लागलीच पवार यांनी ९३ कोटींची वाढ करीत मान्यता दिली, असे जिल्हा नियोजन अधिकारी नीलेश भदाने यांनी सांगितले. 

ऐतिहासिक वास्तूंसाठी १० कोटी

जिल्ह्याच्या मिळणाऱ्या ९३ कोटींच्या वाढीव निधीतील पाच कोटी रुपये नाट्यगृहासाठी, दहा कोटी शासकीय विश्रामगृहासाठी आहेत. ऐतिहासिक वास्तूंच्या संवर्धनासाठी दहा कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली. शाळांचा परिसर, रस्त्यालगत असलेल्या वीज खांबांच्या शिफ्टिंगसाठी पाच ते दहा कोटी रुपये खर्च करण्याचे निश्‍चित करण्यात आले. उर्वरित निधीतून जिल्हा वार्षिक योजना आराखड्यातून शाळा व रस्त्यांची कामे केली जाणार आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com