कृत्रिम पावसासाठी अखेर विमान उडाले; ३८ ठिकाणी नळकांड्या फोडल्या

कृत्रिम पाऊस
कृत्रिम पाऊस

औरंगाबाद  : कृत्रिम पावसाच्या प्रयोगासाठी औरंगाबादेत दाखल झालेले विमान अखेर मंगळवारी (ता. २०) सायंकाळी व बुधवारी (ता. २१) दुपारी आकाशात झेपावले. पाऊस पडण्यायोग्य ढगांची उपलब्धता झाल्याने विमानाने आकाशात झेप घेतल्याची माहिती प्रशासनाच्या सूत्रांनी दिली. विमानाने दुपारी ३.५६  ते सायंकाळी ५.५० दरम्यान जालना आणि नगर जिल्ह्यात मिळून ३८ ठिकाणी पावसासाठीचे सीडलिगं केले. औरंगाबाद येथे दाखल झालेल्या कृत्रिम पावसासाठीच्या प्रयोगाचे विमान डीजीसी क्लीअरन्समुळे आकाशात झेपावू शकत नसल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने सोमवारी देण्यात आली होती. मंगळवारी सायंकाळी अखेर सोलापूर येथून फ्लेअर्स घेऊन परतलेल्या विमानाला रडार यंत्रणेकडून जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यात आकाशात पावसायोग्य ढग दिसत असल्याची माहिती देण्यात आली. त्या माहितीच्या आधारे मंगळवारी सायंकाळी ५.२५ ते ५.४६ वाजेदरम्यान आकाशात झेपावलेल्या विमानाने अपेक्षित ढगांवर पाऊस पाडण्यासाठी सीडलिंग केले.   ९ ऑगस्ट २०१९ ला विमानाने घेतला हाता पहिला टेक ऑफ.. पहा video बुधवारी (ता. २१) पुन्हा रडार यंत्रणेने दिलेल्या माहितीनंतर आधी जालना आणि नगर जिल्ह्यातील काही भागांत पावसायोग्य ढगावर सीडलिंगचा प्रयोग केला. त्यानंतर कृत्रिम पावसासाठीच्या विमानाने नगर जिल्ह्यातील पाथर्डी व बीड जिल्ह्यांतील आष्टी या दोन तालुक्यांच्या दिशेने पुन्हा ढगांवर सीडलिंगसाठी धाव घेतली होती. या प्रयोगातून नेमका किती प्रमाणात पाऊस झाला याची माहिती मात्र प्राप्त होणे बाकी असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

‘तो’ संदेश चुकीचा विविध व्हॉट्सॲप ग्रुप, सोशल मीडियातून आपल्या भागात पावसायोग्य ढग असल्यास विभागीय आयुक्तालयाला फोनद्वारे कळवा, असा दिला जाणारा संदेश चुकीचा असल्याचे विभागीय आयुक्तालयांच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.  फ्लेअर्स बर्न केलेले गावे...(काही ठिकाणी दोनदा) जालना जिल्हा - अंबड, रुई (अंबड), शकाली बाबा दर्गा, तनवाडी, गुरू पिंपरी, पीरगैबवाडी (घनसांगवी), पराडा (अंबड), ममदाबाद, कार्ला, खोडेपुरी, भीलपूरी

नगर जिल्हा : खोरडगाव, मोहरी, पाथर्डी, वसू, (पाथर्डी), अमरापूर (शेवगाव)  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com