agriculture news in Marathi, plane takeoff for artificial rain test, Maharashtra | Page 2 ||| Agrowon

कृत्रिम पावसासाठी अखेर विमान उडाले; ३८ ठिकाणी नळकांड्या फोडल्या

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 22 ऑगस्ट 2019

औरंगाबाद  : कृत्रिम पावसाच्या प्रयोगासाठी औरंगाबादेत दाखल झालेले विमान अखेर मंगळवारी (ता. २०) सायंकाळी व बुधवारी (ता. २१) दुपारी आकाशात झेपावले. पाऊस पडण्यायोग्य ढगांची उपलब्धता झाल्याने विमानाने आकाशात झेप घेतल्याची माहिती प्रशासनाच्या सूत्रांनी दिली. विमानाने दुपारी ३.५६  ते सायंकाळी ५.५० दरम्यान जालना आणि नगर जिल्ह्यात मिळून ३८ ठिकाणी पावसासाठीचे सीडलिगं केले.

औरंगाबाद  : कृत्रिम पावसाच्या प्रयोगासाठी औरंगाबादेत दाखल झालेले विमान अखेर मंगळवारी (ता. २०) सायंकाळी व बुधवारी (ता. २१) दुपारी आकाशात झेपावले. पाऊस पडण्यायोग्य ढगांची उपलब्धता झाल्याने विमानाने आकाशात झेप घेतल्याची माहिती प्रशासनाच्या सूत्रांनी दिली. विमानाने दुपारी ३.५६  ते सायंकाळी ५.५० दरम्यान जालना आणि नगर जिल्ह्यात मिळून ३८ ठिकाणी पावसासाठीचे सीडलिगं केले.

औरंगाबाद येथे दाखल झालेल्या कृत्रिम पावसासाठीच्या प्रयोगाचे विमान डीजीसी क्लीअरन्समुळे आकाशात झेपावू शकत नसल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने सोमवारी देण्यात आली होती. मंगळवारी सायंकाळी अखेर सोलापूर येथून फ्लेअर्स घेऊन परतलेल्या विमानाला रडार यंत्रणेकडून जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यात आकाशात पावसायोग्य ढग दिसत असल्याची माहिती देण्यात आली. त्या माहितीच्या आधारे मंगळवारी सायंकाळी ५.२५ ते ५.४६ वाजेदरम्यान आकाशात झेपावलेल्या विमानाने अपेक्षित ढगांवर पाऊस पाडण्यासाठी सीडलिंग केले.  

९ ऑगस्ट २०१९ ला विमानाने घेतला हाता पहिला टेक ऑफ.. पहा video

बुधवारी (ता. २१) पुन्हा रडार यंत्रणेने दिलेल्या माहितीनंतर आधी जालना आणि नगर जिल्ह्यातील काही भागांत पावसायोग्य ढगावर सीडलिंगचा प्रयोग केला. त्यानंतर कृत्रिम पावसासाठीच्या विमानाने नगर जिल्ह्यातील पाथर्डी व बीड जिल्ह्यांतील आष्टी या दोन तालुक्यांच्या दिशेने पुन्हा ढगांवर सीडलिंगसाठी धाव घेतली होती. या प्रयोगातून नेमका किती प्रमाणात पाऊस झाला याची माहिती मात्र प्राप्त होणे बाकी असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

‘तो’ संदेश चुकीचा
विविध व्हॉट्सॲप ग्रुप, सोशल मीडियातून आपल्या भागात पावसायोग्य ढग असल्यास विभागीय आयुक्तालयाला फोनद्वारे कळवा, असा दिला जाणारा संदेश चुकीचा असल्याचे विभागीय आयुक्तालयांच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. 

फ्लेअर्स बर्न केलेले गावे...(काही ठिकाणी दोनदा)
जालना जिल्हा - अंबड, रुई (अंबड), शकाली बाबा दर्गा, तनवाडी, गुरू पिंपरी, पीरगैबवाडी (घनसांगवी), पराडा (अंबड), ममदाबाद, कार्ला, खोडेपुरी, भीलपूरी

नगर जिल्हा : खोरडगाव, मोहरी, पाथर्डी, वसू, (पाथर्डी), अमरापूर (शेवगाव)
 


इतर अॅग्रो विशेष
‘भीमाघोड’ने उभारली सर्वांत मोठी कांदा...पुणे: भीमाघोड शेतकरी उत्पादक कंपनीने महाओनियन...
पावसाचा जोर आजपासून वाढणारपुणे ः उत्तर महाराष्ट्र ते अरबी समुद्रातील पूर्व...
कापसाचे ६१४ कोटी थकीतनागपूर : राज्यात खरेदी करण्यात आलेल्या कापसाची...
वैद्यांनी जपला यांत्रिकीकरणाचा वारसागरज ही शोधाचा जननी असते. त्यातूनच निंभोरा बोडखा (...
प्रतिकूल हवामानात घडवली बीबीएफ’...जालना कृषी विज्ञान केंद्र, खरपुडी-जालना (केव्हीके...
बदलत्या व्यापार समिकरणांचा अन्वयार्थशेती क्षेत्रात नुकत्याच आम्ही काही सुधारणा केल्या...
शरद जोशींचे शिक्षण स्वातंत्र्यशरद जोशींचे तत्वज्ञान एका शब्दात सांगायचे म्हटले...
अभियान नको, योजना हवीकेंद्र सरकारने आत्मनिर्भर योजनेंतर्गत शेतमाल...
इर्व्हिनिया रॉट रोगाची केळी पिकात समस्या जळगाव ः जिल्ह्यात केळी पिकात...
`पोकरा`मधून शेतमजुरांना प्रशिक्षण द्याऔरंगाबाद: नानाजी देशमुख कृषी संजीवनी...
ऑगस्टमध्ये प्रथमच भरले सीना धरण नगर: दुष्काळी कर्जत, श्रीगोंदा आणि आष्टी...
कोल्हापूर : जनावरे बाजारातील...कोल्हापूर: `कोरोना’च्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनमुळे...
साखर निर्यातवाढीसाठी केंद्राची ‘रॅपिड अ...कोल्हापूर: देशातून जास्तीत जास्त साखर निर्यात...
परभणीत सोळा हजार शेतकऱ्यांचे आधार...परभणी ः महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
सोयाबीन बियाणेप्रकरणात शेतकऱ्यांना एक...अमरावती : विभागातील पाच जिल्ह्यांत सोयाबीन बियाणे...
‘ई-नाम’, शीतसाखळी बळकट करण्याची गरज;...पुणे: चीनशी व्यापारी संबंध डळमळीत झाल्यानंतर...
‘सिट्रस नेट’वर केवळ दोनशे शेतकऱ्यांची...नागपूर : प्रशासकीय यंत्रणांच्या उदासीनतेमुळे ‘...
मका खरेदी केंद्रांवर शेतकरी ठाण मांडून औरंगाबाद: हमीभावाने खरेदीसाठी ३१ जुलैपर्यंत...
पावसाचा जोर वाढण्याची शक्यता  पुणे ः  बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे...
भाजीपाला शेतीतून अर्थकारणाला गतीडोंगरगाव (ता.जि.अकोला) शिवारातील योगेश नागापुरे...