नियोजन औषधी वनस्पती रोपवाटिकेचे...

medicinal plants nursery
medicinal plants nursery

पाण्याची वर्षभर सोय असणाऱ्या ठिकाणी रोपवाटिका उभारावी. पाण्याची टाकी व तुषार सिंचनाची सोय असावी. रोपवाटिकेमध्ये बीजप्रक्रिया, कलम बांधणे, कंद विभाजन, पिशव्या भरणे, पाणी देणे इत्यादी कामांसाठी कुशल मजूर असणे गरजेचे आहे. शेतीसोबत संलग्न व्यवसाय म्हणून वनौषधी वनस्पतींची लागवड केली जाते. लागवडीसाठी लागणारी रोपे, बियाणे किंवा लागवडी योग्य भाग रोपवाटिकेमध्ये तयार केले जातात. वनौषधींचे लागवड क्षेत्र जास्त असणाऱ्या क्षेत्रापासून मध्यवर्ती ठिकाणी रोपवाटिका असावी. स्थानिक मागणीनुसार विविध प्रजातींची रोपे तयार करावीत. पाण्याची वर्षभर सोय असणाऱ्या ठिकाणी रोपवाटिका उभारावी. पाण्याची टाकी व तुषार सिंचनाची सोय असावी. रोपवाटिकेमध्ये बीजप्रक्रिया, कलम बांधणे, कंद विभाजन, पिशव्या भरणे, पाणी देणे इत्यादी कामांसाठी कुशल मजूर असणे गरजेचे आहे. प्रजातीनुसार रोपवाटिकेचे व्यवस्थापन

प्रजातीचे नाव वाढीचा प्रकार औषधी भाग पुनरुत्पादन आवश्यक बीजप्रक्रिया रोपवाटिका तंत्र
काटे रिंगणी हंगामी वनस्पती पंचांग बियांपासून प्रक्रियेची आवश्यकता नसते रोपे गादी वाफ्यावर करावीत.
कोरपड बहुवार्षिक वनस्पती पाने मुळापासून प्रक्रियेची आवश्यकता नसते रोपे गादी वाफ्यावर करावीत.
शतावरी बहुवार्षिक वनस्पती कंद बी व कंदाद्वारे प्रक्रियेची आवश्यकता नसते रोपे गादी वाफ्यावर करावीत.
पुनर्नवा हंगामी वनस्पती मुळे बियांपासून प्रक्रियेची आवश्यकता नसते पिशवीतील रोपे
अनंतमूळ बहुवार्षिक वेल मुळे बियांपासून प्रक्रियेची आवश्यकता नसते रोपे गादी वाफ्यावर करावीत.  
खाजकुहिली हंगामी वेल बिया बियांपासून प्रक्रियेची आवश्यकता नसते रोपे गादी वाफ्यावर करावीत.
गुळवेल बहुवार्षिक वेल खोड बिया व छाट कलम प्रक्रियेची आवश्यकता नसते पिशवीतील रोपे
पिंपळी बहुवार्षिक वेल मुळे मुळे व खोडाद्वारे प्रक्रियेची आवश्यकता नसते पिशवीतील रोपे
गुडमार(बेडकीपाला) बहुवार्षिक वेल खोड, पाने बियांपासून प्रक्रियेची आवश्यकता नसते पिशवीतील रोपे
जेष्ठमध क्षुप खोड, मुळे बिया व कलमाद्वारे प्रक्रियेची आवश्यकता नसते पिशवीतील रोपे
मालकांगणी बहुवार्षिक वेल बिया बियांपासून प्रक्रियेची आवश्यकता नसते पिशवीतील रोपे
मंजिष्ठा हंगामी वेल खोड  बियांपासून प्रक्रियेची आवश्यकता नसते पिशवीतील रोपे
सोनामुखी क्षुप बी किंवा पाने बियांपासून बियाणे थंड पाण्यात १२ तास बुडवावे रोपे गादी वाफ्यावर करावीत.
बकुळ वृक्ष साल/बियांचे तेल बियांपासून बियाणे थंड पाण्यात १२ तास बुडवावे रोपे गादी वाफ्यावर करावीत.

संपर्क- डॉ. विक्रम जांभळे, ०२४२६ २४३२९२ (औषधी व सुगंधी वनस्पती प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com