agriculture news in marathi Planning of citrus orchards cultivation | Agrowon

नियोजन संत्रा बाग लागवडीचे..

डॉ. सुरेंद्र पाटील, डॉ. अनिता पाटील
शुक्रवार, 29 मे 2020

हलक्‍या जमिनीत निचरा चांगला होतो. मात्र या जमिनीच्या वरील थरातील मातीची धूप होण्याची आणि खालच्या थरातून मूलद्रव्ये झिरपून जाण्याची शक्यता असते. त्यासाठी जमिनीचा प्रकार कसाही असो आणि पुढचा उतार कितीही असला तरी, सपाटीकरण करणे आवश्‍यक आहे.

हलक्‍या जमिनीत निचरा चांगला होतो. मात्र या जमिनीच्या वरील थरातील मातीची धूप होण्याची आणि खालच्या थरातून मूलद्रव्ये झिरपून जाण्याची शक्यता असते. त्यासाठी जमिनीचा प्रकार कसाही असो आणि पुढचा उतार कितीही असला तरी, सपाटीकरण करणे आवश्‍यक आहे.

संत्रा बाग लागवड करण्याआधी लागवगडीची पूर्वतयारी करणे आवश्‍यक आहे. सर्वप्रथम पूर्वतयारीच्या कामांचा आराखडा तयार करून घ्यावा. खालील बाबी विचारात घेऊन लागवडीचे नियोजन करावे. 

संत्रा बाग लागवडीची जागा
यामध्ये विशेषतः स्थानिक हवामानाचा विचार करणे आवश्‍यक आहे. तसेच स्थानिक भागात झाडांची वाढ चांगली होते एवढेच न पाहता त्यांचे उत्पादनही विचारात घ्यावे. यावरून आपल्या परिसरातील हवामान संत्रा लागवडीसाठी योग्य आहे का याची माहिती मिळेल. तसेच संत्रा लागवडीसाठी तज्ञांचा सल्ला घ्यावा.

जमिनीची निवड
लागवडीपूर्वी मातीपरिक्षण करून घेणे आवश्‍यक आहे. जमिनीत काही त्रुटी असल्यास त्या कशा दूर करता येतील याबाबत तज्ञांकडून माहिती घ्यावी. मातीपरिक्षणासोबतच पाणी परिक्षणही करून घेणे आवश्‍यक आहे.

लागवडीसाठी क्षेत्र

  • लागवडीसाठी  साधारणपणे १ हेक्‍टर क्षेत्र निवडावे. अर्धा-अर्धा हेक्टरच्या पटीत क्षेत्र वाढवावे आणि जास्तीत जास्त दोन हेक्‍टर क्षेत्राची निवड करावी. यामुळे संत्रा बागेची जोपासना करताना आणि फायदेशीर उत्पन्न काढताना अडचणी येत नाही.
  • क्षेत्र निवडताना पाण्याची उपलब्धता ही विचारात घ्यावी. बागेची पाण्याची गरज विचारात घ्यावी. जमिन चांगली पण पाणी खराब आणि खराब जमिन पण पाणी चांगले आहे, या दोन्हींचे परिणाम समानच होतात.

लागवडीसाठी प्लॉटचे पट्टे वाढवून घ्यावे
लागवडीसाठी निवडलेले क्षेत्र मोठे असेल तर ते सहजपणे आणि एकच पट्टा समजून लागवड केली जाते. त्या ऐवजी निवडलेल्या क्षेत्राचे १ किंवा २ हेक्टर वाढवून घ्यावे. 

जमिनीचे सपाटीकरण

  • जमिनीचे सपाटीकरण करणे महत्वाचे आहे मात्र याकडे दुर्लक्ष केले जाते. काही भागात लागवडीसाठी निवडलेली जमीन सपाट असते. त्याठिकाणी सपाटीकरण करण्याची गरज नसते असे समजले जाते. याउलट अधिक उतार असलेल्या जमिनीत जवळजवळ बांध घालून जमीन सपाट न करता लागवड केली जाते. या दोन्ही बाबी चुकीच्या आहेत.
  • प्रत्येक प्लॉटमध्ये ठराविक उतार राखूनच सपाटीकरण करायला हवे. पाण्याचा निचरा होणे, त्याचबरोबर पाणी साचू न देण्यासाठी जमिनीच्या उताराला समांतर असा उतार असावा. भारी आणि मध्यम काळ्या जमिनीत  हा उतार १ टक्का एवढा असावा. 
  • हलक्‍या जमिनीत निचरा चांगला होतो. मात्र या जमिनीच्या वरील थरातील मातीची धूप होण्याची आणि खालच्या थरातून मूलद्रव्ये झिरपून जाण्याची शक्यता असते. त्यासाठी जमिनीचा प्रकार कसाही असो आणि पुढचा उतार कितीही असला तरी, सपाटीकरण करणे आवश्‍यक आहे.

पाण्याच्या निचऱ्याची व्यवस्था
जमिनीचा मगदुर आणि उताराचे अवलोकन करून प्लॉटमध्ये आणि बाजूने चर काढावेत. किती अंतरावर किती मापाचे आणि किती चर काढावेत हे नीट समजून घ्यावे. उतारास समांतर, आडवे चर खोदून ते एकमेकांशी मिळतील आणि त्यातील पाण्याचा निचरा एकाच ठिकाणी जमा होईल याचा अंदाज घेऊन चर काढावेत.

कुंपण 

  • जनावरे आणि चोरांपासून संरक्षणासाठी बागेभोवती कुंपण असणे गरजेचे आहे. याशिवाय कुंपनामुळे हिवाळ्यातील थंडीच्या लाटा आणि उन्हाळ्यातील उष्ण वाऱ्यापासून संत्रा पिकांचे संरक्षण होते. बागेच्या दक्षिण-पश्‍चिम बाजूला कुंपण करावे. यामुळे या दिशेने येणाऱ्या वाऱ्यापासून होणारे नुकसान टाळले जाते.
  • वारारोधक झाडांची बागेभोवती लागवड करणे फायद्याचे ठरते. काटेरी व बिन काटेरी झाडांची वारारोधक म्हणून लागवड करता येते.

बिन काटेरी झाडे-झुडपे
खडसणी (सुरू), ड्रूपिंग अशोका, कडुलिंब, जांभूळ, ग्लिरीसिडिया, कान्हेर, मलबेरी, गुल मेहंदी, सिल्वर ओक इ.

काटेरी झुडपे 
विलायती चिंच, रामकाठी बाभूळ, निवडुंग, बोरा, वाघाटी वेली, सागरगोटी, चिलार, घायपात, करवंद, बोगनवेल इ.

संपर्क - डॉ. सुरेंद्र पाटील, ९८८१७३५३५३
(उद्यानविद्या विभाग,डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला


इतर फळबाग
केळीवरील करपा रोगाचे नियंत्रणसध्या केळी पिकाच्या पील बागेत करपा रोगाचा...
पावसाळी स्थितीतील द्राक्षबागेचे नियोजनगेल्या आठवड्यापासून सर्वच भागात पावसाची नोंद झाली...
प्रयोगशील शेतीतून पीक बदलनोकरीच्या निमित्ताने संजय साळवे यांना गाव सोडावे...
केळी पिकातील खत नियोजनप्रति झाड २०० ग्रॅम नत्र, ६० ग्रॅम स्फुरद व २००...
पावसाळी वातावरणातील द्राक्षबागेतील...गेल्या आठवड्यात ठिकठिकाणी पाऊस झाला, तर काही...
आरोग्यदायी फणसवरून काटेरी पण आतून गोड.. असे म्हटले की फणस हे फळ...
पावसाळी वातावरणातील द्राक्षबागेचे...गेल्या आठवड्यात बऱ्यापैकी पाऊस झालेला आहे....
डाळिंबातील बुरशीजन्य मररोगाचे व्यवस्थापनडाळिंब बागेमध्ये सूत्रकृमी, वाळवी, शॉर्ट होल बोरर...
डाळिंब पिकातील बहारनिहाय नियोजनमृगबहार अ) अन्नद्रव्य व्यवस्थापन फळबागेची...
तंत्र करवंद लागवडीचेकरवंदाच्या भरपूर जाती आढळतात. डॉ. बाळासाहेब सावंत...
उशिरा खरड छाटणीच्या बागेतील सूक्ष्मघड...सध्याचे वातावरण ः सध्या द्राक्ष विभागामध्ये...
सुधारित तंत्राने शेवगा लागवडशेवग्याची लागवड करताना दोन झाडांतील व ओळीतील...
वेलीचा वाढता जोम नियंत्रणात ठेवण्याकडे...द्राक्षबागेत गेल्या दोन दिवसापासून वातावरण...
आधुनिक पद्धतीने करा संत्रा लागवडविशिष्ट अशी आंबट गोड चवीबरोबर प्रतिकारशक्ती...
उन्हाळ्यातील केळी बागेचे व्यवस्थापनउष्णलाटांमुळे बागेतील तापमान वाढते, आर्द्रता कमी...
नियोजन संत्रा बाग लागवडीचे..हलक्‍या जमिनीत निचरा चांगला होतो. मात्र या...
असे करा द्राक्षबागेतील स्ट्रोमॅशिअम...खोडकिडीचे प्रौढ भुंगेरे साधारणतः मान्सूनपूर्व,...
दर्जेदार पेरू, सीताफळाच्या उत्पादनावर भरमाझ्याकडे पेरू आणि सीताफळाची लागवड आहे. पेरूच्या...
गावोगावी फिरून विकली पंधरा टन द्राक्ष कोरोनामुळे बाजार समित्या बंद झाल्या, व्यापारीही...
जास्तीच्या ओलाव्यामुळे येणाऱ्या ...गेल्या आठवड्यात बऱ्याच भागात पाऊस झाला व काही...