Agriculture news in marathi Planning to continue agricultural integrity centers in Washim: Collector Modak | Agrowon

वाशीममधील कृषी निविष्ठा केंद्रे सुरू ठेवण्याचे नियोजन करा ः जिल्हाधिकारी मोडक 

टीम अॅग्रोवन
रविवार, 29 मार्च 2020

वाशीम : ‘कोरोना’ विषाणूच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यामध्ये २५ मार्चपासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यानुसार सर्व खासगी व्यवसाय व आस्थापना बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र, बियाणे व खते या कृषी निविष्ठांचा जीवनावश्यक वस्तू १९५५ अंतर्गत समावेश होतो. स्थानिक पातळीवर शेतकऱ्यांकडून बियाणे, खते व औषधांची मागणी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संचारबंदी काळात आवश्यकतेनुसार बियाणे, खते व औषधे विक्री करणारी दुकाने सुरू ठेवण्याबाबत नियोजन करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी हृषीकेश मोडक यांनी सर्व तहसीलदारांना दिले आहेत. 

वाशीम : ‘कोरोना’ विषाणूच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यामध्ये २५ मार्चपासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यानुसार सर्व खासगी व्यवसाय व आस्थापना बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र, बियाणे व खते या कृषी निविष्ठांचा जीवनावश्यक वस्तू १९५५ अंतर्गत समावेश होतो. स्थानिक पातळीवर शेतकऱ्यांकडून बियाणे, खते व औषधांची मागणी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संचारबंदी काळात आवश्यकतेनुसार बियाणे, खते व औषधे विक्री करणारी दुकाने सुरू ठेवण्याबाबत नियोजन करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी हृषीकेश मोडक यांनी सर्व तहसीलदारांना दिले आहेत. 

जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून बियाणे, खते व औषधांची मागणी होण्याची शक्यता असल्याने सर्व तहसिलदारांनी संबंधित तालुक्याचे तालुका कृषी अधिकारी व पंचायत समितीचे कृषी अधिकारी यांच्याशी चर्चा करून संभाव्य निविष्ठा मागणी लक्षात घेऊन बियाणे व खते दुकाने आवश्यकते नुसार सुरू ठेवण्याबाबत नियोजन करावे. 

या नियोजनाबाबत संबंधित निविष्ठा विक्री सेवा केंद्रास दुकाने चालू ठेवण्याबाबत कळवावे. आवश्यकतेनुसार चालू ठेवण्यात येणाऱ्या कृषी सेवा केंद्रांची नावे संबंधित कार्यक्षेत्राच्या पोलिस प्रशासनाला कळवावीत. जेणे करून शेतकऱ्यांना मागणीनुसार विहित वेळेत निविष्ठा उपलब्ध करून देणे सोयीचे होईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे. 


इतर बातम्या
मराठवाड्यात काही ठिकाणी मुसळधारपुणे : राज्यातील बहुतांशी भागातील पावसाचे...
राज्यात हलक्या पावसाची शक्यतापुणे : काही दिवस राज्यात मुसळधार पाऊस...
खानदेशात पाऊस थांबला, वाफशाची प्रतीक्षाजळगाव : खानदेशात गुरुवारी (ता.२५) पाऊस थांबला....
सांगलीत नियोजनाअभावी थेट शेतमाल विक्री...सांगली : लॉकडाउनच्या काळात संपूर्ण बाजारपेठा बंद...
सोलापुरातील उपबाजार समित्यांचा प्रस्ताव...सोलापूर ः सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या...
कोल्हापुरात शेतकरी संघटनांकडून कृषी...कोल्हापूर : राज्यसभेत मंजूर झालेल्या कृषी...
नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे...सोलापूर ः अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या...
शेतकऱ्यांचे प्रश्‍न शासनाकडे पोचवणार :...नाशिक : ‘‘मी देखील शेतकऱ्याचाच मुलगा आहे. कांदा...
मराठवाड्यात कृषी विधेयकांची होळीऔरंगाबाद / परभणी /  नांदेड :...
इंदापुरातील सिंचन सर्वेक्षणासाठी पाच...पुणे : ‘‘इंदापूर तालुक्यातील प्रलंबित शेती...
वऱ्हाडात विधेयकांविरोधात ‘स्वाभिमानी’...अकोला : केंद्र शासनाने संसदेत नुकतीच...
`अमरावती जिल्ह्यात पीक नुकसानीचे...अमरावती :  जिल्ह्यात संततधार पावसामुळे...
जालना, औरंगाबादमधील दोन मंडळात अतिवृष्टीऔरंगाबाद : काही दिवसांपासून मराठवाड्याच्या...
नगरला निदर्शने, अकोलेत विधेयकांची होळीनगर : केंद्र सरकारने मंजूर केलेल्या तीन शेतकरी...
एक हजार प्राध्यापकांनी वयाची साठी...पुणे: राज्यातील कृषी विद्यापीठांमधील...
सूक्ष्म अन्न उद्योगांना मिळणार आता दहा...पुणे: राज्यात लवकरच पंतप्रधान सूक्ष्म अन्न उद्योग...
कृषी, कामगार विधेयकांची राज्यात...पुणे : केंद्र सरकारने घाईघाईत मंजूर करुन घेतलेली...
शेतकरी आंदोलनाचे सात राज्यांत पडसादचंडीगड ः केंद्र सरकारच्या कृषी विधेयकांना विरोध...
सोयाबीन बियाणे प्लॉटना फटकाऔरंगाबाद: सध्याचे पावसाचे प्रमाण व त्यामुळे...
केळी विमा निकषांबाबत उत्सुकताजळगाव ः राज्य सरकारच्या चुकांमुळे हवामानावर...