agriculture news in Marathi planning of control onion rate Maharashtra | Page 2 ||| Agrowon

कांदा दर पाडण्याचा डाव

टीम अॅग्रोवन
बुधवार, 28 ऑक्टोबर 2020

जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी कांदा लिलाव बंदच होते. उन्हाळ कांद्याची टिकवणक्षमता संपुष्टात आल्याने प्रतवारी खराब होत आहे. तर खरीप कांदा काढणी तुरळक प्रमाणात सुरु झाली असून विक्रीतील अडचणी कायम आहेत. 

नाशिक : जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी कांदा लिलाव बंदच होते. उन्हाळ कांद्याची टिकवणक्षमता संपुष्टात आल्याने प्रतवारी खराब होत आहे. तर खरीप कांदा काढणी तुरळक प्रमाणात सुरु झाली असून विक्रीतील अडचणी कायम आहेत. काही दिवस बंद राहून अचानक बाजार समित्या सुरू झाल्या तर पुन्हा आवक वाढून दर पडण्याची शक्यता आहे. तसा डाव आखला जातोय, असा आरोप शेतकरी करत आहेत. 

जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी कांदा लिलाव बंदच होते. कांदा खरेदीत घाऊक व्यापाऱ्यांना २५ टन तर किरकोळ व्यापाऱ्यांना २ टनांची साठवणूक मर्यादा आहे. मात्र अगोदरच यापेक्षा अधिक माल खळ्यांवर असल्याने भीतीपोटी व्यापारी खरेदीसाठी धजत नसल्याचे समजते. तर, शेतकऱ्यांच्या हितासाठी असलेल्या अनेक बाजार समित्या व्यापाऱ्यांना ठोस कारण विचारायला तयार नाहीत. 

एकीकडे खरीप हंगामात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सगळी आशा रब्बी हंगामावर असल्याने भांडवलाची जुळवाजुळव सुरू आहे. त्यामुळे ज्यांना कांदा विकायचा त्यांची गैरसोय वाढली आहे. त्यात उन्हाळ कांद्याची टिकवणक्षमता संपुष्टात आल्याने प्रतवारी खराब होत आहे. तर तुरळक खरीप कांदा निघत असताना तोही विक्री करताना अडचणी आहेत. त्यामुळे अचानक बाजार समित्या सुरू झाल्या तर पुन्हा आवक वाढून दर पडण्याची शक्यता आहे. तसा डाव आखला जातोय, असाही आरोप शेतकरी करत आहेत. 

पिंपळगाव बसवंत बाजार समितीत संचालक व व्यापारी यांची बैठक झाली. यात लवकरात लवकर लिलाव सुरू करावेत, अशी भूमिका आमदार बनकर यांनी मांडली. यावर व्यापाऱ्यांनी साठवणूक मर्यादेचे कारण पुढे केले.

लिलाव बंदच
लासलगाव, पिंपळगाव बसवंत, उमराणे, देवळा, सटाणा, नामपूर, येवला, चांदवड, मालेगाव, नांदगाव, मनमाड, सिन्नर, कळवण या प्रमुख बाजार समित्यांसह उपबाजारात कांदा लिलाव बंद होते. सिन्नर बाजार समितीचा उपबाजार असलेल्या नायगाव  येथे ७० क्विंटल कांदा आवक होती. त्यास सरासरी ४५०० क्विंटल दर मिळाला. कांदा वगळता फळे, भुसार लिलाव सुरू होते.

लिलाव सुरू न झाल्यास रास्ता रोकोचा इशारा 
साठवलेला कांदा बाजार समित्यांमध्ये विक्री करणे गरजेचे असून जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यांचे कामकाज बंद असल्याने शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे कांद्याचे लिलाव सुरळीत सुरू न झाल्यास महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना  जिल्हाभर रास्ता रोको आंदोलन करेल, असा इशारा अध्यक्ष भारत दिघोळे यांनी दिला.

प्रतिक्रिया
स्थानिक व परराज्यातील व्यापाऱ्यांकडे अगोदरच साठवणूक मर्यादेपेक्षा अधिक माल असल्याने व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे ग्राहक व शेतकरी या दोन्ही घटकांचा विचार करून केंद्र सरकारने साठवणूक मर्यादेची अट रद्द केली तरच कोंडी फुटेल, अन्यथा अडचण वाढत जाईल. 
- आमदार दिलीप बनकर, सभापती, पिंपळगाव बसवंत बाजार समिती

साठवणूक मर्यादा निर्णयाअगोदरचा माल व सध्याचा माल २५ क्विंटलपेक्षा अधिक आहे. त्यामुळे चौकशी झाल्यास अडचणीत येऊ. त्यामुळे खळ्यावरचा कांदा मर्यादेच्या खाली आल्यास कामकाजात सहभागी होऊ. तांत्रिक अडचण होण्याची भीती व्यापाऱ्यांमध्ये आहे.
- नंदकुमार डागा, अध्यक्ष, लासलगाव व्यापारी असोसिएशन

शेतमाल विक्री व्यवस्था ऐन सणासुदीच्या तोंडीवर अडचणीत आणली आहे. व्यापाऱ्यांची तांत्रिक अडचण समजू शकतो, मात्र पूर्वकल्पना न देता बंद पुकारला. त्यातच बाजार समित्यांचे पदाधिकारी व प्रशासन सुस्त आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना वेठीस धरणाऱ्या व्यापाऱ्यांचे परवाने निलंबन करावेत.
-निवृत्ती गारे, कांदा उत्पादक, कोळगाव, ता.निफाड 
 


इतर अॅग्रो विशेष
ढगाळ वातावरणामुळे आंबा, काजू बागायतदार...सिंधुदुर्ग : जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले...
आश्वासक रब्बीही ठरतोय आव्हानात्मकखरीप हंगामात झालेली अतिवृष्टी आणि लांबलेल्या...
खासगीकरणाचा वारू किती उधळणार?सरकारने उद्योगधंद्यात सामील असता कामा नये, अशी...
खानदेशात पपई दराचा पुन्हा तिढाजळगाव : खानदेशात पपईचे पीक बऱ्यापैकी काढणीवर आले...
आंदोलक शेतकऱ्यांचा दिल्लीत तळनवी दिल्ली  : दिल्ली पोलिसांनी परवानगी...
राज्यातील आठ जिल्ह्यांत बिबट्याची दहशतनगर : कोरोनामुळे, त्यानंतर पावसाने अडचणीत आलेल्या...
आई-वडिलांकडे दुर्लक्ष केल्यास ३० टक्के...नगर ः आई-वडिलांचा सांभाळ न करणाऱ्या जिल्हा परिषद...
कापूस गाठींच्या दरात सुधारणाजळगाव ः जगातील वस्त्रोद्योग ९५ ते ९७ टक्के...
सोयाबीनचे ३६ लाख क्विंटल बियाणे...पुणे : राज्यातील शेतकरी बाजारातून दहा लाख क्विंटल...
काही ठिकाणी हलक्या सरी पुणे : निवार चक्रिवादळ निवळत असताना जमिनीवरून...
सामाजिक दायीत्वातून जीवनात फुलले ‘...आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवा पत्नी आणि...
सोयाबीन दरात मंदीची शक्यता नाही पुणे ः केंद्र सरकारने गुरुवारी (ता.२७) कच्च्या...
राज्यात १०९ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन पुणे : राज्यात चालू गाळप हंगामात आतापर्यंत १४९...
शेतकरी मोर्चावर केंद्राकडून दडपशाही :...नगर : केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांच्या...
सव्वा दोन हजार कोटी रब्बीसाठी कर्जवाटप पुणे : रब्बी हंगामासाठी राज्यातील शेतकऱ्यांना १६...
हिंद महासागरात कमी दाबाचे क्षेत्र पुणे:  ‘निवार’ चक्रीवादळ निवळत नाही तोच...
ऐंशी प्रकारचा प्रक्रियायुक्त कोकणमेवासिंधुदुर्ग जिल्ह्यातील दहिबाव (ता.देवगड) येथील...
मार्केटिंग, ब्रॅंडिंगद्वारे अळिंबी...बेलखेड (जि. अकोला) येथील विलास व छायाताई या कुयटे...
‘सूक्ष्म सिंचन’प्रकरणी चौकशी...औरंगाबाद/जालना : जालना जिल्ह्यात सूक्ष्म सिंचन...
बीजोत्पादन क्षेत्र नोंदणीला मुदतवाढपुणे : राज्यात रब्बी हंगामासाठी घेतल्या जाणाऱ्या...