पुणे : दुपारी बारा वाजेपर्यंत मतमोजणीचे नियोजन

दुपारी बारा वाजेपर्यंत मतमोजणीचे नियोजन
दुपारी बारा वाजेपर्यंत मतमोजणीचे नियोजन

पुणे ः पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांच्या निवडणुकीसाठी मतमोजणी गुरुवारी (ता. २४) सकाळी आठ वाजल्यापासून सुरवात होणार आहे. त्यानंतर पहिला निकाल सकाळी दहा वाजेपर्यंत अपेक्षित असून, साधारणपणे दुपारी १२ च्या दरम्यान सर्व निकाल हाती येतील, असे नियोजन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

मतदान केंद्र आणि उमेदवारांची संख्या पाहता कसबापेठ विधानसभा मतदारसंघाचा निकाल दहा वाजेपर्यंत लागण्याची शक्यता आहे. तर भोर मतदारसंघात सर्वाधिक मतदान केंद्र असल्याने या ठिकाणी थोडा वेळ लागण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात २४६ उमेदवार उतरले आहेत. त्यातील २१ उमेदवारांचे नशीब खुलणार आहे. ग्रामीण भागातील विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी संबंधित तालुक्याच्या ठिकाणी होणार आहे. विधानसभा मतदारसंघात किती मतदान केद्र आहेत. त्यावरून मतमोजणीला किती टेबल आणि किती फेऱ्या ठेवायच्या याची आकडेवारी निश्‍चित होते. मतमोजणीला सकाळी सात वाजता प्रत्यक्ष सुरवात होणार आहे. 

प्रथम टपाली मतांची मोजणी केली जाणार आहे. टपाली मते मोजणीसाठी स्वतंत्र टेबल ठेवली जाणार आहेत. टपाली मतपत्रिकांची मोजणी झाल्यानंतर सकाळी आठ वाजता इलेक्ट्रॅानिक मतदान यंत्रावरील (ईव्हीम) मोजणी सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रत्येक मतदार संघात १४ ते २२ टेबल्स आहेत. या टेबलावर एकावेळी एक ईव्हीएमची मोजणी केली जाणार आहे.

मतदारसंघनिहाय मतदान केंद्र व एकूण फेऱ्या ः
मतदार संघ मतदान केंद्र संख्या  टेबल संख्या  एकूण फेऱ्या
जुन्नर  ३५६ १४  २६
आंबेगाव  ३३६  १४ २४
खेड  ३७९ १४  २८
शिरूर  ३८९  १४  २८
दौंड ३०६ १४ २२
इंदापूर ३२९ १४ २४
बारामती ३६८ १४ २७
पुरंदर ३८० १८ २२
भोर  ५२९ २२ २५
मावळ  ३७० १४ २७

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com