रब्बीत बुलडाणा जिल्ह्यात हरभरा पिकाचे एक लाख हेक्टरवर नियोजन

रब्बीत बुलडाणा जिल्ह्यात हरभरा पिकाचे एक लाख हेक्टरवर नियोजन
रब्बीत बुलडाणा जिल्ह्यात हरभरा पिकाचे एक लाख हेक्टरवर नियोजन

बुलडाणा  ः गेल्या काही वर्षांत जिल्ह्यात यंदा चांगला पाऊस झालेला असून, प्रकल्पांमध्ये मोठा साठा उपलब्ध झालेला आहे. त्यातच सप्टेंबरमध्ये सर्वत्र पाऊस पडलेला असल्याने रब्बीसाठी सर्वांत पोषक परिस्थिती आहे. यावर्षी रब्बीत हरभऱ्याची लागवड एक लाख १२ हजार ६४१ हेक्टरवर होण्याची शक्यता असून, कृषी विभागाने तसे नियोजन केले आहे. रब्बीसाठी यंदाची पोषक परिस्थिती असून, आगामी दसरा ते दिवाळी या काळात विविध पिकांची पेरणी वेगाने केली जाणार आहे. जिल्ह्यात हरभऱ्याचे ७३९१० हेक्टर सरासरी क्षेत्र असले तरी, यंदा १लाख १२ हजार ६४१ हेक्टरचे नियोजन झाले आहे. जिल्ह्यात गहू हे महत्त्वाचे पीक आहे. गव्हाचे २६ हजार ९९४ हेक्टरचे नियोजन करण्यात आले आहे. मक्याची रब्बीत ५ हजार ९२४ हेक्टरवर लागवड होईल, असा अंदाज आहे. जिल्ह्यात घाटावरील तालुक्यांमध्ये रब्बी ज्वारीची मोठ्या क्षेत्रावर लागवड केली जाते. यंदा ११ हजार ३५१ हेक्टरवर लागवड होईल, असे नियोजन करण्यात आले.  बियाणे नियोजन  रब्बी लागवडीसाठी क्षेत्राचे तसेच बियाण्याचे कृषी विभागाने नियोजन केले. यात रब्बी ज्वारीचे ६८१ क्विंटल, हरभरा ४२ हजा २४० क्विंटल, मका ५९३ क्विंटल, सूर्यफूल ६ आणि करडई ८ असे एकूण ७० हजार ५२२ क्विंटल बियाण्यांची मागणी करण्यात करण्यात आली आहे.  लष्करी अळीची भीती कायम खरिपात लागवड केलेल्या मक्याच्या संपूर्ण क्षेत्रावर जिल्ह्यात लष्करी अळी आढळून आली होती. या पिकाचे अळीने २० ते ३० टक्के नुकसान केले आहे. जिल्ह्यात गेल्या रब्बी हंगामातच लष्करी अळी दिसून आली होती. या वेळी अळीचा प्रादुर्भाव खरिपात वाढल्याने आगामी रब्बीतही अळी येईल काय? याची चिंता शेतकऱ्यांना भेडसावत आहे. अनेक शेतकरी त्यामुळेच रब्बीत मका लागवड करायची किंवा नाही, याचा विचार करीत आहेत.      

पीक सरासरी नियोजित
रब्बी ज्वारी १६२३०     ११३५१
गहू ५२९४० २६९९४
हरभरा ७३९१० ११२६४१
मका   ३२००     ५९२४
एकूण १५१७८०     १५७०७३

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com