रत्नागिरी जिल्ह्यात नियोजनाचा आराखडा ११४ कोटींनी वाढला

the planning plan has increased by 114 crores in Ratnagiri district
the planning plan has increased by 114 crores in Ratnagiri district

रत्नागिरी ः जिल्हा नियोजन समितीचा आराखडा २०१ कोटींवरून ३१५ कोटीपर्यंत वाढविण्यात आला आहे. पुढील आर्थिक वर्षात वाढीव आराखडा शासनाकडून मंजूर करून मिळावा, अशी मागणी करण्यात येणार आहे. गतवर्षांतील ७४ कोटींच्या कामाला प्रशासकीय मंजूर मिळाली होती. निधी अखर्चिक राहू नये, यासाठी तो नियमात राहून जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्याबाबत जिल्हा नियोजन समितीच्या सर्व सदस्यांचे एकम आहेत, अशी माहिती पालकमंत्री अ‍ॅड. अनिल परब यांनी दिली.

जिल्हा नियोजन मंडळाची बैठक झाल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत परब बोलत होते. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, आमदार राजन साळवी, योगेश कदम आदी उपस्थित होते. 

ॲड. परब म्हणाले, ‘‘जिल्हा नियोजनला गेल्या वर्षी १७१ कोटी प्राप्त झाले. निधी खर्च करण्याचे प्रमाणे ३५ टक्के आहे. खर्चाचे प्रमाण धीम्या गतीने आहे. पुढील वर्षासाठी शासनानेकडे ३१५ कोटी रुपये जिल्हा विकास निधी मागितला आहे. विविध योजनांमधून जिल्ह्याला निधी मिळेल, कारण मुख्यमंत्री शिवसेनेचा आहे. ऑनलाइन सात-बारा उताऱ्यांचे काम १५ फेब्रुवारीपर्यंत पूर्ण होईल. जिल्ह्यातील आंब्याचे चांगले मार्केटिंग व्हावे, यासाठी मुंबई, ठाणे येथे आंबा महोत्सव घेण्यात येईल.’’

‘‘पावसात जमिनिला भेगा गेलेल्या धोकादायक १३३ घरांचे पुनर्वसन करायचे आहे. त्यामध्ये ५ शाळा आणि २ अंगणवाड्यांचा समावेश आहे. सिद्धी विनायक ट्रस्टने ५ कोटी दिली आहेत. त्याचाही योग्य विनियोग होईल. जिल्हा नियोजनचा ७२ दिवसांमध्ये २०१ कोटीपैकी ६५ टक्के निधी खर्च करण्याची कसरत करवी लागेल.’’ राष्ट्रीय महामार्ग ज्या गावांमधून जातो, अशा ग्रामपंचायतींना पाणीपुरवठा योजनांसाठी महामार्ग प्राधिकरण निधी देणार आहे. याचे सर्वेक्षण व्यवस्थित झालेले नाही. सर्व ग्रामपंचायतींना पाणीपुरवठा योजनांसाठी निधी मिळावा, यासाठी नियोजन व पाठपुरावा करण्यात येईल, असेही या बैठकीत ठरले. 

आमदार तटकरे यांनी नदी खोलीकरण व नद्यांमधील गाळ काढण्यासाठी काम केले जावे, अशी मागणी केली. याबाबतीत शासनाच्या यांत्रिकी विभागाकडे असलेल्या जेसीबी पोकलेन यांना नियोजन निधीतून डिझेलचा पुरवठा करून सदर काम पूर्ण करण्यात  येईल.  

त्या अधिकाऱ्‍यांवर कारवाई

उशिरा हजर झालेल्या १९ अधिकाऱ्‍यांवर कारवाई होईल. जिल्ह्याच्या विकासासाठी ही महत्त्वाची बैठक आहे. याला प्रत्येकाने वेळेत येणे अपेक्षित आहे. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत केवळ नियोजन विषयक चर्चा अपेक्षित आहे. लोकप्रतिनिधींचे काही प्रलंबित प्रस्ताव आणि मागण्या असतील, तर त्याकरिता स्वतंत्रपणे आपण बैठक बोलावून त्यावर निर्णय घेऊ, असे बैठकीत जाहीर करण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com