Agriculture news in marathi the planning plan has increased by 114 crores in Ratnagiri district | Page 2 ||| Agrowon

रत्नागिरी जिल्ह्यात नियोजनाचा आराखडा ११४ कोटींनी वाढला

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 23 जानेवारी 2020

रत्नागिरी ः जिल्हा नियोजन समितीचा आराखडा २०१ कोटींवरून ३१५ कोटीपर्यंत वाढविण्यात आला आहे. पुढील आर्थिक वर्षात वाढीव आराखडा शासनाकडून मंजूर करून मिळावा, अशी मागणी करण्यात येणार आहे. गतवर्षांतील ७४ कोटींच्या कामाला प्रशासकीय मंजूर मिळाली होती. निधी अखर्चिक राहू नये, यासाठी तो नियमात राहून जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्याबाबत जिल्हा नियोजन समितीच्या सर्व सदस्यांचे एकम आहेत, अशी माहिती पालकमंत्री अ‍ॅड. अनिल परब यांनी दिली.

जिल्हा नियोजन मंडळाची बैठक झाल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत परब बोलत होते. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, आमदार राजन साळवी, योगेश कदम आदी उपस्थित होते. 

रत्नागिरी ः जिल्हा नियोजन समितीचा आराखडा २०१ कोटींवरून ३१५ कोटीपर्यंत वाढविण्यात आला आहे. पुढील आर्थिक वर्षात वाढीव आराखडा शासनाकडून मंजूर करून मिळावा, अशी मागणी करण्यात येणार आहे. गतवर्षांतील ७४ कोटींच्या कामाला प्रशासकीय मंजूर मिळाली होती. निधी अखर्चिक राहू नये, यासाठी तो नियमात राहून जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्याबाबत जिल्हा नियोजन समितीच्या सर्व सदस्यांचे एकम आहेत, अशी माहिती पालकमंत्री अ‍ॅड. अनिल परब यांनी दिली.

जिल्हा नियोजन मंडळाची बैठक झाल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत परब बोलत होते. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, आमदार राजन साळवी, योगेश कदम आदी उपस्थित होते. 

ॲड. परब म्हणाले, ‘‘जिल्हा नियोजनला गेल्या वर्षी १७१ कोटी प्राप्त झाले. निधी खर्च करण्याचे प्रमाणे ३५ टक्के आहे. खर्चाचे प्रमाण धीम्या गतीने आहे. पुढील वर्षासाठी शासनानेकडे ३१५ कोटी रुपये जिल्हा विकास निधी मागितला आहे. विविध योजनांमधून जिल्ह्याला निधी मिळेल, कारण मुख्यमंत्री शिवसेनेचा आहे. ऑनलाइन सात-बारा उताऱ्यांचे काम १५ फेब्रुवारीपर्यंत पूर्ण होईल. जिल्ह्यातील आंब्याचे चांगले मार्केटिंग व्हावे, यासाठी मुंबई, ठाणे येथे आंबा महोत्सव घेण्यात येईल.’’

‘‘पावसात जमिनिला भेगा गेलेल्या धोकादायक १३३ घरांचे पुनर्वसन करायचे आहे. त्यामध्ये ५ शाळा आणि २ अंगणवाड्यांचा समावेश आहे. सिद्धी विनायक ट्रस्टने ५ कोटी दिली आहेत. त्याचाही योग्य विनियोग होईल. जिल्हा नियोजनचा ७२ दिवसांमध्ये २०१ कोटीपैकी ६५ टक्के निधी खर्च करण्याची कसरत करवी लागेल.’’
राष्ट्रीय महामार्ग ज्या गावांमधून जातो, अशा ग्रामपंचायतींना पाणीपुरवठा योजनांसाठी महामार्ग प्राधिकरण निधी देणार आहे. याचे सर्वेक्षण व्यवस्थित झालेले नाही. सर्व ग्रामपंचायतींना पाणीपुरवठा योजनांसाठी निधी मिळावा, यासाठी नियोजन व पाठपुरावा करण्यात येईल, असेही या बैठकीत ठरले. 

आमदार तटकरे यांनी नदी खोलीकरण व नद्यांमधील गाळ काढण्यासाठी काम केले जावे, अशी मागणी केली. याबाबतीत शासनाच्या यांत्रिकी विभागाकडे असलेल्या जेसीबी पोकलेन यांना नियोजन निधीतून डिझेलचा पुरवठा करून सदर काम पूर्ण करण्यात 
येईल.  

त्या अधिकाऱ्‍यांवर कारवाई

उशिरा हजर झालेल्या १९ अधिकाऱ्‍यांवर कारवाई होईल. जिल्ह्याच्या विकासासाठी ही महत्त्वाची बैठक आहे. याला प्रत्येकाने वेळेत येणे अपेक्षित आहे. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत केवळ नियोजन विषयक चर्चा अपेक्षित आहे. लोकप्रतिनिधींचे काही प्रलंबित प्रस्ताव आणि मागण्या असतील, तर त्याकरिता स्वतंत्रपणे आपण बैठक बोलावून त्यावर निर्णय घेऊ, असे बैठकीत जाहीर करण्यात आले.


इतर ताज्या घडामोडी
सोलापूर, नगर जिल्ह्यांतील ‘माळढोक’चे...सोलापूर : जिल्ह्यातील नान्नज (ता. उत्तर सोलापूर)...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ऊस उत्पादन घटणारसिंधुदुर्ग : जिल्ह्यात १५२० हेक्टर क्षेत्र ऊस...
सातारा जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांसाठी...सातारा  : राज्याच्या अर्थसंकल्पातून...
पीकपद्धतीनुसार शेतकरी उत्पादक कंपन्या...नाशिक  : आपल्या विभाग, जिल्ह्यातील...
राज्यात तूर्त मध्यावधी निवडणूक नाही :...मुंबई  : राज्यात तूर्तास तरी मध्यावधी...
एलईडीच्या मदतीने केल्या जाणाऱ्या...मुंबई  : समुद्रात एलईडीच्या मदतीने...
शेतीमाल विषाणूमुक्त असल्याचे प्रमाणपत्र...पुणे  ः कोरोना विषाणूबाबत देशात भीतीचे...
नगर, नाशिक जिल्ह्यात साखर उताऱ्यात दीड...नगर  ः नगर, नाशिक जिल्ह्यांत यंदाच्या गाळप...
मुंबई बाजार समिती निवडणूकीसाठी ५८...मुंबई  : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
पैठण येथे होणार मोसंबी क्‍लस्टर ः ‘...पैठण, जि. औरंगाबाद  : ‘‘मोसंबीमधील लागवडीचे...
औरंगाबादेत बटाटे ८०० ते १६०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
विकासकामांमध्ये लोकसहभाग महत्त्वाचा ः...अकोला  ः ‘‘महाराष्ट्र शासन व भारतीय जैन...
वाघी खुर्द येथे तुरीची सुडी जळून खाक शिरपूरजैन  ः येथून जवळच असलेल्या वाघी खुर्द...
जळगाव जिल्ह्यात ३६९ टंचाईग्रस्त गावेजळगाव  ः जिल्ह्यात यंदा १३९ टक्के पाऊस...
'कांद्याची निर्यातबंदी हटवून हमीभाव...अमरावती  ः निर्यातबंदी हटवून कांद्याला प्रति...
वाई येथील ‘ते’ ठरलेय स्वच्छतादूतयवतमाळ : संत गाडगे महाराज यांनी हातात झाडू घेऊन...
सांगली जिल्ह्यात साखर उत्पादन नीचांक...सांगली : जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी अडीच...
नगर जिल्हाभरातआवक वाढल्याने कांदा दरात...नगर : नगर कृषी उत्पन्न बाजार समितीसह जिल्हाभरात...
ढेबेवाडी खोऱ्यात रानडुकरांकडून ज्वारीचे...ढेबेवाडी, जि. सातारा : रानडुकरे आणि...
परभणीत २० हजार ६५१ हेक्टरवर ऊस लागवडपरभणी  ः यंदा (२०१९-२०) परभणी जिल्ह्यात...