पावसाळ्यापूर्वीच कापूस खरेदीचे नियोजन 

गेल्या हंगामात पावसामुळे कापसाचे नुकसान झाले होते. परिणामी येत्या हंगामात केवळ ३० केंद्राच्या माध्यमातूनच नियोजनबद्धरीत्या कापूस खरेदीची भूमिका महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन महासंघाने घेतली आहे.
cotton procurement
cotton procurement

अमरावती : गेल्या हंगामात पावसामुळे कापसाचे नुकसान झाले होते. परिणामी येत्या हंगामात केवळ ३० केंद्राच्या माध्यमातूनच नियोजनबद्धरीत्या कापूस खरेदीची भूमिका महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन महासंघाने घेतली आहे. पुढील वर्षी मे (२०२१) पर्यंतच नोंदणीकृत शेतकऱ्यांकडील कापूस खरेदी केला जाईल, असा दावाही पणन महासंघाने केला आहे. 

महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाने गेल्या हंगामात ९२ केंद्र तसेच १९२ जिनिंग च्या माध्यमातून खरेदी केली होती. तब्बल ९५ लाख क्विंटल इतक्या विक्रमी कापसाची खरेदी करण्यात आली. या वर्षी कापसाचा हमीभाव ५ हजार ८२५ रुपये आहे. त्यामुळे या हंगामात देखील सीसीआय तसेच पणन महासंघाला बाजारात राहून कापसाची खरेदी करावी लागणार आहे. त्या पार्श्वभूमीवर पणन महासंघाने कापूस खरेदीची तयारी आत्तापासूनच चालविली आहे. ग्रेडरची कमतरता असल्याने या हंगामात केवळ तीस केंद्र तसेच ६० ते ७० जिनिंगच्या माध्यमातून कापूस खरेदी करण्याची भूमिका पणन महासंघाने घेतली आहे.  असे आहे नियोजन  तीस केंद्रांच्या माध्यमातून दररोज ८५ ते ९० हजार क्विंटल कापूस खरेदी केला जाईल. त्यावर त्याच दिवशी प्रक्रिया करण्याचे नियोजन असून सरासरी ७५ हजार क्विंटल कापसावर प्रक्रिया करुन पाचशे गाठी उपलब्ध होतील. त्यानुसार तीस केंद्राच्या माध्यमातून १५००० गाठी रोज तयार होतील.  प्रतिक्रिया ऑक्‍टोबर महिन्याच्या अखेरीस कापूस खरेदी सुरू करण्याचे प्रस्तावित आहे. पुढील वर्षी मे पर्यंत म्हणजेच पावसाळ्यापूर्वी नोंदणीकृत शेतकऱ्यांकडील संपूर्ण कापूस खरेदी केला जाईल. सध्या केवळ तीस केंद्र सुरू करण्याचा आमचा विचार आहे. खरेदीची तारीख व केंद्राची संख्या निश्चित करण्याकरिता लवकरच संचालक मंडळाची बैठक बोलावली जाणार आहे.  - अनंतराव देशमुख, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघ.  ग्रेडरची संख्या कमी असल्याने केंद्र वाढविल्यास गोंधळ उडतो. यंदाच्या हंगामात कमी केंद्राच्या माध्यमातून नियोजनबद्ध पद्धतीने शेतकऱ्यांकडील संपूर्ण कापूस खरेदी केला जाईल.  - शिरीष धोत्रे, संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघ.  दृष्टिक्षेपात राज्याची स्थिती 

  • राज्यातील कपाशीचे क्षेत्र ४१ लाख हेक्टर 
  • कपाशीचा दहा हजार हेक्टरपेक्षा अधिक पेरा असलेले १४० तालुके 
  • जूनअखेर सीसीआयकडून १२७.७९ लाख क्विंटल, तर कापूस पणन महासंघाकडून ९४ लाख क्विंटल विक्रमी कापसाची खरेदी 
  • सद्यःस्थितीत बाजारातील कापसाचे दर ३,५०० ते ४,५०० रुपये प्रतिक्विंटल 
  • २०२०-२१ करिता कापसाचा हमीभाव ५ हजार ८२५ प्रतिक्विंटल 
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com