agriculture news in marathi Planning for sugarcane cultivation | Agrowon

नियोजन सुरू ऊस लागवडीचे...

डॉ. पी.एस.देशमुख, पी.पी. शिंदे, समाधान सुरवसे
शनिवार, 21 नोव्हेंबर 2020

सुरू हंगामातील ऊस लागवड १५ डिसेंबर ते १५ फेब्रुवारी या कालावधीत करावी. यालागवडीत हिरवळीचे खत आंतरपीक म्हणून घेऊन बाळ बांधणी करताना जमिनीत गाडावे. त्यामुळे जमीन सुपीकता वाढण्यास मदत होईल.
 

सुरू हंगामातील ऊस लागवड १५ डिसेंबर ते १५ फेब्रुवारी या कालावधीत करावी. यालागवडीत हिरवळीचे खत आंतरपीक म्हणून घेऊन बाळ बांधणी करताना जमिनीत गाडावे. त्यामुळे जमीन सुपीकता वाढण्यास मदत होईल.

ऊस लागवड करण्याअगोदर पहिली फणपाळी देऊन ढेकळे फोडून घ्यावीत. त्यानंतर चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत रोटाव्हेटरच्या साह्याने जमिनीत चांगले मिसळून घ्यावे. उरलेले शेणखत आणि रासायनिक खतांचा पहिला हप्ता लागवडीच्या सरीमध्ये मातीत मिसळावा. शेणखत किंवा कंपोस्ट खत पुरेसे नसल्यास प्रेसमड,  कोंबडी खत, बायोकंपोस्ट उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या पेंडी अशा अनेक पर्यायांनी जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थ मिसळता येतात.

हिरवळीची पिके वाढवून जमिनीत गाडल्यास सेंद्रिय पदार्थांचा मोठ्या प्रमाणात पुरवठा होतो. ताग किंवा धैंचा ही हिरवळीची पिके फायदेशीर ठरतात. सुरू हंगामातील लागवड डिसेंबर महिन्यात सुरू होते. त्यामुळे या कालावधीत ताग किंवा धैंचा ही पिके घेऊन उसाची लागवड करणे शक्य‌ होत नाही. अशावेळी हिरवळीचे खत आंतरपीक म्हणून घेऊन ८ आठवडे म्हणजे बाळ बांधणी करताना जमिनीत गाडावे. त्यामुळे जमीन सुपीकता वाढण्यास मदत होईल.

रासायनिक खतांचा वापर

 • सुरू हंगामातील उसासाठी हेक्टरी २५० किलो नत्र, ११५ किलो स्फुरद आणि ११५ किलो पालाशची शिफारस आहे.
 • रासायनिक खतमात्रेत माती परिक्षण करून योय ते बदल करणे गरजेचे आहे. माती परीक्षणामुळे जमिनीचा सामू, सेंद्रिय कर्ब, नत्र, स्फुरद, पालाश यासोबतच सूक्ष्मअन्नद्रव्यांची स्थितीदेखील समजते. त्यावरून रासायनिक खत मात्रा ठरवणे सोपे होते.
 • को- ८६०३२ या मध्यम उशीरा पक्व होणाऱ्या जातीस अन्नद्रव्यांची जास्त गरज असते. या जातीस नत्र, स्फुरद आणि पालाशयुक्त खतांची २५ टक्के जास्त मात्रा लागते (नत्र ३१३ किलो, स्फुरद व पालाश प्रत्येकी १४४ किलो).
 • खताचा पहिला हप्ता म्हणजेच १० टक्के नत्र लागवडीपूर्वी, मुळांच्या व अंकुराच्या वाढीसाठी स्फुरद व पालाश प्रत्येकी ५० टक्के फायदेशीर ठरते.
 • लागवडीनंतर ६ ते ८ आठवड्यांत उसाला फुटवा येण्यास सुरुवात होते. फुटव्यांची वाढ अधिक जोमदार होण्यासाठी नत्र खताची ४० टक्के मात्रा द्यावी. त्यानंतर अवजाराच्या साह्याने बाळबांधणी करावी. बाळबांधणी केल्यामुळे खते व्यवस्थितरित्या जमिनीमध्ये गाडली जातात. तसेच उसाच्या मुळाला हलकीशी भर दिली जाते. त्यामुळे फुटवा चांगला लागतो आणि जोमदार वाढ होते.
 • पीक १२ ते १४ आठवड्यांचे झाल्यानंतर उसाला कांड्या सुटण्यास सुरुवात होते. त्यावेळी नत्रयुक्त खताचा तिसरा हप्ता म्हणजे शिफारशीत १० टक्के नत्राची मात्रा द्यावी.
 • अवजाराच्या साह्याने हातपेरणी करावी किंवा उसाच्या बुडाला खत देऊन तीन दातेरी अवजार चालवावे. म्हणजे खत मातीआड होईल व जमीन मोकळी होईल.
 • लागवडीनंतर ३.५ ते ४ महिन्यांत उसाची पक्की बांधणी करून घ्यावी. मोठी बांधणी करताना प्रथम शिफारशीप्रमाणे नत्रयुक्त खतांची ४० टक्के, स्फुरद व पालाशची उर्वरीत प्रत्येकी ५० टक्के मात्रा उसाच्या बुडाला देऊन तीन दातेरी अवजार चालवावे. त्यानंतर रिझरच्या साह्याने बांधणी करावी, म्हणजे उसाला चांगली भर लागेल.
 • रासायनिक खतांच्या मात्रा प्रत्येक वेळी सेंद्रिय खतांबरोबर दिल्यास फायदेशीर ठरते. उन्हाळ्यामध्ये पाण्याची कमतरता भासल्यास द्रवरूप खतांची फवारणी करावी. आणि पाऊस पडल्यानंतर लगेच खतांचा शेवटचा हप्ता द्यावा.

सुरू हंगामासाठी प्रति हेक्‍टर खत वापरण्याची पद्धत (किलो/ हेक्‍टर)
 

 खते देण्याची वेळ  सरळ खते   मिश्र किंवा संयुक्त खते  मिश्र किंवा संयुक्त खते 
 युरिया    सिंगल सुपर फॉस्फेट  म्युरेट ऑफ पोटॅश १०:२६:२६     युरिया  युरिया  डी.ए.पी.(१८ः४६ः००)    म्युरेट ऑफ पोटॅश
लागणीच्या वेळी ५४   ३५९   ९६  २२१   --   --  १२५   ९६
६ ते ८ आठवड्यांनी  २१७ --  --  --   २१७  २१७ -- --
१२ ते १४ आठवड्यांनी  ५४  --  --  --  ५४  ५४   --  --
मोठी बांधणी करताना   २१७   ३५९  ९६   २२१     १६८ १६८ १२५     ९६
वरील खत मात्रा उदाहरणादाखल दिल्या आहेत. अन्नद्रव्याचे प्रमाण आणि खतांतील अन्नद्रव्यांचे प्रमाण लक्षात घेऊन प्रमाणित खतांची निवड करावी.
माती  परीक्षण करूनच खतांचा वापर करावा.

ठिबक सिंचनाद्वारे खतांचा वापर 
विद्राव्य खतांचा वापर ठिबक सिंचनाद्वारे केल्यास खतांची उपयुक्तता वाढते. तसेच खतांची ४० टक्केपर्यंत बचत शक्य होते. मुळांजवळ खते दिल्‍यामुळे उत्पादनामध्ये वाढ होते.

ठिबक सिंचनाद्वारे खतांचा वापर करण्याचे वेळापत्रक
 

खते देण्याच्या वेळा नत्र स्फुरद     पालाश
युरिया (कि/हे)  फॉस्फोरिक  आम्ल (कि/हे) म्युरेट ऑफ पोटॅश (कि/हे)
लागणीच्या वेळी ३     १.१५     १.१६
२ आठवड्यांनी  ६     २.३० २.३२
४ आठवड्यांनी   ६  २.३०  २.३२
६ आठवड्यांनी  १२  ४.६० २.३२
८ आठवड्यांनी   २०  ६.८२  ३.४८
१० आठवड्यांनी २० ६.८२    ४.६४
१२ आठवड्यांनी  २६     ९.१८     ५.८०
१४ आठवड्यांनी   २६     ९.१८     ६.९६

उसासाठी गंधकाचा वापर 
महाराष्ट्रातील ऊस जमिनीत गंधकाची कमतरता आढळून येते. त्यासाठी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने शाश्‍वत उत्पादकतेसाठी गंधकयुक्त खतांचा वापर करण्याची शिफारस केली आहे. त्यासाठी ऊस लागवडीच्या वेळी हेक्टरी ६० किलो मुलद्रवी गंधक द्यावे. त्यामुळे ऊस उत्पादनात १० ते २४ आणि १५ ते ३० टक्के साखर उत्पादनात वाढ झालेली दिसून येते.

खते देण्याच्या पद्धती व काळजी 

 • रासायनिक खते कुदळीने चळी घेऊन किंवा खते देण्याच्या अवजाराच्या साह्याने द्यावीत.
 • उभ्या पिकात खते देतांना जमिनीत थोडासा ओलावा म्हणजे वाफसा असावा.
 • खते दिल्यानंतर लगेच पाणी देऊ नये. दुसऱ्या दिवशी हलके पाणी द्यावे.
 • स्फुरदयुक्त खते मुळांच्या सान्निध्यात किंवा कंपोस्ट खतात मिसळून द्यावीत. हेक्‍टरी २.५ लिटर द्रवरूप स्फुरद विरघळविणाऱ्या जिवाणू खतांचा वापर केल्यास स्फुरदाची उपलब्धता वाढते.
 • पालाशुक्त खते सरीमध्ये रांगोळी पद्धतीने द्यावीत. शक्यतो ही खते नत्रयुक्त खतांबरोबर दिल्यास नत्राच्या उपलब्धतेवर चांगला परिणाम होतो.

संपर्क ः डॉ. पी.एस.देशमुख, ९९२१५४६८३१  (वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, मांजरी (बु.) पुणे)


इतर कृषी सल्ला
उत्तम भाजीपाला उत्पादनासाठी पोषक हवामानवाटाणा वाटाणा हे थंड हवामानातील पीक असून या...
पिकाच्या संवेदनशील अवस्थेनुसार पाणी...रब्बी हंगामामध्ये घेतल्या जाणाऱ्या पिकांसाठी...
गहू, ज्वारी पिकांवरील खोडमाशीचे...बहुतांश ठिकाणी गहू व ज्वारी पिकाची पेरणी झाली आहे...
व्यवस्थापन ऊस पाचटाचे ...पाचट आच्छादनामुळे जमिनीचा ओलावा टिकून राहतो. तसेच...
कीड व्यवस्थापनासाठी करा जैविक पद्धतीचा...एकात्मिक कीड व्यवस्थापनामध्ये जैविक कीड...
आंब्यावरील कीड, रोग नियंत्रण व्यवस्थापनकोकणातील हवामानाची सद्यःस्थिती जाणून घेता काही...
कांद्यावर फुलकिडे,करपा रोगाचा... सध्या शेतात रोपवाटिकांमध्ये रब्बी कांद्याची...
ज्वारीवरील खोडकिडीचे नियंत्रण सध्या ज्वारीवर खोडकिडीचा प्रादुर्भाव आढळून येत...
ठिबक सिंचनातून खतांचा कार्यक्षम वापरठिबक सिंचन संचाची आखणी आणि उभारणी, जमिनीचे भौतिक...
कृषी सल्ला (कापूस, तूर, रब्बी ज्वारी,...मराठवाड्यात पुढील पाच दिवसांत आकाश स्वच्छ ते ढगाळ...
अमेरिकन लष्करी अळीचे एकात्मिक...मागील दोन वर्षांपासून ज्वारी, मका पिकांवर अमेरिकन...
थंडी वाढण्यास अनुकूल हवामान या आठवड्यात महाराष्ट्रातील हवेचे दाब १०१२...
सुरू उसातील सूक्ष्मअन्नद्रव्य व्यवस्थापनमाती परीक्षण अहवालानुसार जमिनीत या सूक्ष्म...
नियोजन सुरू ऊस लागवडीचे...सुरू हंगामातील ऊस लागवड १५ डिसेंबर ते १५...
ऊस पिकावरील तांबेरा रोगाचे व्यवस्थापनपश्‍चिम महाराष्ट्रामध्ये जुलै महिन्यापासून ते...
करडईवरील मावा किडीचे नियंत्रणकरडईचे उत्पादन कमी येण्यासाठी किडीचा प्रादुर्भाव...
राज्यात वाढणार थंडीचे प्रमाणसध्याची परिस्थिती पहातामहाराष्ट्रावर १०१०...
कांद्यावरील फुलकिडीचे व्यवस्थापनकांदा पीक हे प्रामुख्याने खरीप, रब्बी हंगामात...
कृषी सल्ला (कापूस, तूर, कांदा, गहू,...कपाशी पिकातील २० ते ३० टक्के बोंडे फुटल्यानंतर...
विविध पिकांच्या उत्तमवाढीसाठी आवश्यक...गहू पिकासाठी थंडी आवश्यक असते. गव्हाच्या...