महापुराच्या मुकाबल्यासाठी प्रशासनामार्फत नियोजन ः सतेज पाटील

कोल्हापूर : जिल्ह्यातील प्रलंबित मागण्यांसाठी शासनस्तरावर धोरणात्मक निर्णय घ्यावा लागणार आहे. अशा सर्व मागण्यांसाठी विशेषत: नुकसान भरपाईसाठी वित्त मंत्र्यांकडे पाठपुरावा करू, अशी ग्वाही ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. तर मागील महापुराचा अनुभव लक्षात घेता संभाव्य महापुराच्या मुकाबल्यासाठी प्रशासनामार्फत योग्य नियोजन करण्यात येत आहे. प्रत्येक तालुक्यात बोटींची व्यवस्था केली जाईल, अशी माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली.
Planning through administration for flood relief: Satej Patil

आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रमुख उपस्थितीत माॅन्सूनपूर्व आढावा बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगव्दारे झाली. बैठकीस खासदार संजय मंडलिक, आमदार चंद्रकांत जाधव, आमदार प्रकाश आबिटकर उपस्थित होते.

श्री. देसाई यांनी संगणकीय सादरीकरण करून माहिती दिली. २०१९ ला तालुकानिहाय पडलेल्या पावसामुळे १९६३.६० मिमी सरासरी वाढली आहे. गेल्या वर्षी या तारखेला धरणांमध्ये सरासरी १९ टक्के पाणीसाठा होता. आज त्यामध्ये २१ टक्के वाढ आहे. सध्या सगळी यंत्रणा कोरोनावर लक्ष देत आहे. यामध्ये अलगीकरणासाठी शाळा, सभागृह आदी घेण्यात आली आहेत. पाटबंधारे विभागाकडून पावसाबाबत आधी सूचना मिळाल्यास धोका टाळण्यास मदत होईल. त्याबाबत नियोजन सुरू आहे.

पूर्वनियोजनाचा भाग म्हणून एनडीआरएफची २ पथके बोटींसह मागविण्यासाठी पत्र पाठविण्यात आले आहे. स्वयंसेवी संस्था, आपदा मित्र अशा ८०८ स्वयंसेवकांना पूर्णबाधित असणारी २७ गावे वाटून देण्याबाबत नियोजन केले जाईल, असे सांगून बाधित कुटुंबे, शिबिरांची संख्या शासनस्तरावर धोरणात्मक निर्णयाच्या बाबी आदीबाबत सविस्तर माहिती दिली.

महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनीही तयारी विषयी माहिती दिली. पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता महेश सुर्वे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय सोनवणे, महावितरणचे कार्यकारी अभियंता सागर मारूलकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, बीएसएनएलचे महाप्रबंधक शिवराम कुलकर्णी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे या सर्वांनी आपापल्या विभागाच्या पूर्वतयारीबाबत आणि नियोजनाविषयी सविस्तर आढावा घेतला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com