आटपाडीत तीनशे हेक्‍टरवर फुलणार डाळिंब बागा

या वर्षी पांडुरंग फुंडकर फळबाग लागवड योजनेतून ३०० हेक्‍टर क्षेत्राला मंजुरी दिली आहे. तसेच अन्यही इच्छुक शेतकऱ्यांनी लागवडीसाठी प्रस्ताव सादर करावेत. - राहुल जितकर,तालुका कृषी अधिकारी, आटपाडी
Plant pomegranates on three hundred hectares in Attapadi
Plant pomegranates on three hundred hectares in Attapadi

आटपाडी, जि. सांगली : पांडुरंग फुंडकर फळबाग लागवड योजनेतून आटपाडी तालुक्‍यात नवीन डाळिंब लागवडीसाठी या वर्षी ३०० हेक्‍टर क्षेत्राला कृषी विभागाने मंजुरी दिली आहे. ‘टेंभूचे पाणी आल्यामुळे तालुक्‍यात डाळिंब व द्राक्ष लागवडीच्या क्षेत्रात वाढ होत चालली आहे. 

आटपाडी तालुका अवर्षणप्रवण क्षेत्रात येतो. तालुक्‍यात पावसाचे प्रमाण कमी असते आणि हवामान पूर्ण कोरडे असते. कोरड्या हवामानात आणि कमी पाण्यात अत्यंत दर्जेदार डाळिंब येतात. आजपर्यंत तालुक्‍यात दहा हजार हेक्टर क्षेत्रावर डाळिंबाची लागवड झाली आहे. 

तालुक्‍यातील शेतकऱ्यांचे मुख्य आणि हमखास पैसे देणारे पीक म्हणून डाळिंब बनले आहे. यापूर्वी विविध योजनांतून डाळिंबाची लागवड झाली आहे. गेल्या दोन वर्षांपासून राज्य सरकारने पांडुरंग फुंडकर फळबाग लागवड योजना आणली. यामधून डाळिंब, पेरू, चिकू, सीताफळ यांसारख्या फळपिकांच्या लागवडीसाठी अनुदान दिले जाते. डाळिंब लागवडीसाठी हेक्‍टरी एक लाख सात हजार रुपये अनुदान दिले जाते. 

पहिल्या वर्षी ५०, दुसऱ्या वर्षी तीस आणि तिसऱ्या वर्षी वीस टक्के असे तीन वर्षांत अनुदान विभागून दिले जाते. तालुक्‍यात या वर्षासाठी पहिल्या टप्प्यात २७० हेक्‍टर आणि दुसऱ्या टप्प्यात नुकतेच ३४ हेक्‍टरला कृषी विभागाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे या वर्षी ३०० हेक्‍टर क्षेत्रावर नवीन डाळिंब लागवडीची भर पडणार आहे. याशिवाय इच्छुक शेतकऱ्यांनी पांडुरंग फुंडकर फळबाग लागवड योजनेतून डाळिंब लागवड करण्यासाठी प्रस्ताव द्यावेत, असे आव्हान तालुका कृषी अधिकारी राहुल जितकर यांनी केले आहे. 

‘रोहयो‘तूनही डाळिंब लागवडीला मान्यता द्यावी 

दोन हेक्‍टर क्षेत्रावरील डाळिंब लागवडीसाठी पांडुरंग फुंडकर फळबाग लागवड योजनेतून मान्यता दिली जाते. तर आतील क्षेत्रातील शेतकरी रोहयोतून डाळिंबासाठी मंजुरी दिली जात होती. पण, या वर्षीपासून रोहयो पूर्ण बंद ठेवली आहे. अल्प, मध्यम आणि पाच एकरांवरील सर्व शेतकऱ्यांना पांडुरंग फुंडकर फळबाग लागवड योजनेतून मधून फळबाग लागवडीसाठी मंजुरी देणे सुरू केले आहे. तसे न करता अल्पभूधारक शेतकऱ्यांना रोहयोतून डाळिंब लागवडीसाठी मंजुरी द्यावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com